* श्रीकृष्ण ...*🌹 छबीतला श्रीकृष्ण खुपच मोहक जाणवला.. चिंतनशिलतेकडे नेणारी ही छबी बरेच संवाद साधून गेली.. आमच्या संस्कारी मनावरचा श्रीकृष्ण मला नवीन काही सांगत होता.. श्रीकृष्ण... मानवी मनाचे स्वप्न.. संपन्नत्व शोधायचे असेल तर श्रीकृष्णाइतके त्रुप्त व्यक्तीमत्व दुसरे नसावे..श्रीकृष्णाला ईश्वरीय अवताराची झुल जरी पांघरली असली तरी त्यातले संपन्न पुरुषत्वच मनाला भावणारे आहे.. जन्माचा उद्येशच मुळात मनाला प्रसन्न ठेवणे असावा.. किंबहुना आम्ही धारण करावा असा धर्म म्हणजे "प्रसन्नत्व राखणे" एवढाच.. आता प्रसन्नत्व राखण्यासाठी काय करावे असा प्रश्न मनात आला तर त्याचे उत्तर एकच आणि ते म्हणजे येथे प्रत्येक आत्म्याने श्रीकृष्ण होऊन जगावे.. जगातली सारी मुळ प्रश्नेच ही स्त्री मनाशी निगडित असावीत हे सत्य कदाचित श्रीकृष्णाला उमजलेले असावे.. पुरुषी अंहकाराच्या गर्तेत स्त्री मनांची होणारी कुचंबणा आणि त्यामुळे निर्माण होणारे नात्यातले तणाव हे प्रेमधर्मच विसरून वा प्रेम संकल्पनेची गल्लत करुन जगली जातात.. आणि यातुनच प्रश्नांचा प्रारंभ होतो.. या दुर्मीळ सत्याचे विस्मरण होण्याचा शाप मानव...