Skip to main content

Posts

खरंच, व्यक्त होणं एवढं अवघड असतं का?*

📄 *आठवडा 135 वा*   *14 जून  ते  20 जून 2020*   ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *विषय क्रमांक 1* *खरंच, व्यक्त होणं एवढं अवघड असतं का?* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *प्रदीप महाजन🙏😊* *वि४* ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ मानव प्राणी भावनाशील आहे, भावना प्रासंगिक असतात आणि त्या अनुरूप उत्पन्न होतात. भावना उत्पन्न होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे मात्र त्या दाबून ठेवणे ही कृत्रिमता आहे मनात जे आलं ते बोलून व्यक्त होणं केंव्हाही मानसशास्त्रीय दृष्ट्या चांगलं मात्र ते दाबून साठवण करणे म्हणजे एक दिवस त्याचा स्फोट होणार हे नक्कीचं व्यक्तीची जडण घडण कशी झाली आहे,  बालपणातच आघात झाले असले तरी किंवा कुठल्यातरी किंवा कोणाच्यातरी मग ते आपले किंवा समाज यांचा सुद्धा दबावात असल्यावर व्यक्त होणे अवघड होते , किंवा आत्मविश्वासाची कमी हे सुद्धा कारण असू शकते ,मग अशी लोकं व्यक्त होत नाहीत याउलट जे बिनधास्त स्वभावाचे लोकं असतात ,जे मनमोकळे वावरतात , बोलतात ते सहज व्यक्त होतात आणि आनंदी जिवन जगतात व्यक्त होणं अवघड नाही मात्र व्यक्त न होणारी लोकांचा  तसा स्वभाव परिस्थिती नुसार तयार होतो किंवा ते करून घेतात  किंव...
Recent posts

ताण तणाव

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *वि-४* *मुक्त लिखाण* ============= *विषय-"ताण-तणाव"....✍️* 😇😔😟 *नाव- _प्रदीप महाजन_* सहकार अधिकारी श्रेणी-1 नाशिक ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬  ताण तणाव (स्ट्रेस) हा आजकाल अतिशय प्रचलित शब्द झालेला आहे, आपल्या बालपणात वडीलधाऱ्यांकडून हा शब्द फारसा ऐकायला येत नव्हता मात्र आजकाल आपण सर्वच जण असा शब्द नियमित ऐकत असतो किंवा उच्चारत असतो      मग यापूर्वी लोकांना तणाव नसायचा का? किंवा तणाव नावाचा एक प्रकारचा मानसिक आजार असेल तर हा अस्तित्वात नव्हता का? आणि असा आजार अधिक विचार केल्याने किंवा अतिरिक्त दबावामुळे निर्माण होतो तर पूर्वी दबावच नसायचा का? किंवा ती लोकं विचारच करत नव्हती का? तर असे नाही , मनुष्य म्हटला म्हणजे त्याच्या कडे मेंदू आहे, आणि वैचारिक शक्ती आहे तर मेंदू हा अवयव किंवा विचार यापूर्वी चे लोकं सुद्धा करीत असत मग त्यांना तणाव का निर्माण होत नव्हता त्याचं साधं सोपं कारण आहे बदललेली जीवन शैली       पूर्वी लोकं अंग मेहनतीचे खूप जास्त काम करायचे आणि शरीर थकल्यामुळे शांत पूर्ण झोप घेत असत म्हणून तणाव आपोआप निघून जात असे त्यात पूर्वी सकस आहार...

गुंजन काव्य

*अक्षय तृतीयेचे गीत गुंजन..* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 अक्षय गुंजन  अक्षय काव्य  अध्यात्म अक्षय  अक्षय सारं गुंजते...  अक्षय भाव  अक्षय हास्य  अक्षय गीत  अक्षय फुलवते...  अक्षय माणुसकी  अक्षय मिष्टान्न  अक्षय हालहवाल  अक्षय जपते...  अक्षय वनमैत्र  अक्षय आपलंपण  अक्षय माणुसकीने  अक्षय गोंजरते  अक्षय रंजन  अक्षय अध्यात्म  अक्षय शास्त्रीय  अक्षय आलापते...  अक्षय आनंदाचे  अक्षय देणेघेणे  अक्षय चैतन्याचे  अक्षय स्नेहाळते...  अक्षय संस्कृती  अक्षय व्रतसंकल्प  अक्षय उत्सवभाव  अक्षय निभावते...  अक्षय प्रेम  अक्षय आनंदाचे  अक्षय तृतीयेला  अक्षय मंगल दुणावते...  *अक्षय तृतीयेच्या अक्षय मंगल कामना...*  🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹 अशोक अर्धापुरे, औरंगाबाद..
*स्मरण यात्रा...*🌹  गोड त्या शब्दांचे  वेड मला लागले..  स्मरण अंतरंगी जरी,  दूरचे समीप दिसू लागले...  अर्थ त्याचा जीवाचा,  अक्षर उमटू लागले..  साक्षर साक्षात्कारात  ध्यानस्थ नवे अवतरले...  कसे ऐकावे संगित,  बासुरीत मंजुळ मावले...  ओठावर येऊनही सारे,  हृदयी अंतर्धान पावले...  वाटते एकांत महफिलीत,  श्रवण गहन करावे...  सुप्रभातीच्या प्रार्थनेला,  सूर्याला पुन्हा बोलवावे... 🌹 ............  02.01.2020 अशोक अर्धापुरे,  औरंगाबाद
*अशी पाखरे येती या मालिकेतील शेवटचा लेख प्रसारित करून २०१९ सालाचा निरोप घेतो...सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन पुन्हा एका नवीन मालिकेसाठी भेटण्याचा शब्द देतो.* *अशी पाखरे येती* ःःःःःःःःःःःः🌹 *काकातुआ* ःःःःःःःःःःःः🌹 पोपटांच्या विविध जातींपैकी एक असलेला काकातुआ आॅस्ट्रेलियाचा पक्षी आहे. शुद्ध भारतीय पक्षी नसलेला हा पक्षी मात्र पुरातन काळापासून भारतातही आढळून येतो. निळे डोळे अन् लाल तुºयांचा काकातुआ पक्षिविश्वात सर्वात अधिक सुंदर पक्षी म्हणून लोकप्रिय ठरलेला आहे. जंगली पक्ष्यात गणला जाणारा हा काकातुआ पोपट पाळीव करावयाचा असल्यास भारतीय लोक त्याला लोखंडी पिंजºयात ठेवून लोखंडी रॉडवर ठेवतात. अधिक मस्ती करणारा काकातुआ पोपटाला प्रसंगी बांधूनही ठेवावे लागते. काही कालावधीनंतर तो पाळीव होतो. त्यानंतर मात्र तो मुक्तपणे घरात रुळून मुक्त विहार करतो. त्यानंतर तो पूर्णपणे पाळीव होऊन जातो. आकाराने मोठा असलेला काकातुवा पक्षी दीर्घायुषी असतो. त्याची किंमत ही त्याच्या रंगरुप आणि आकारावर ठरविली जाते. याला पाळीव करण्याचे एक विशेष आणि खास कारणही आहे आणि तेच त्याचे वैशिष्ट्य ठरावे...मुळातच पोपटाची जात ...
*प्रिय मित्र...*🌹 सरते साल सारत नव्या सालाच्या उंबरठ्यावर पावले पडू पाहताहेत.. सांप्रत वर्षांनी काय दिले याचा विचार व्हायला हवा..   वर्ष सुखाचे गेले असेल तर निश्चितच नाती जगणारी माणसे, निसर्ग, कला, संगीत,  साहित्य, आणि विशेषतः मैत्र जपत जगणारे सारेच आनंद देणारे भेटले.. आमच्या संपर्कात येणारा प्रत्येक सजीव निर्जीव आपल्याला नकळत व्यापून टाकत असतो.. एक  गूढ अनुभूती मनात अखंडपणे अनुभवीत होत जाते..  काय हवे काय नको ते आपण आपल्या स्वभावानुसार नकळतच  घेत जातो.. अंतरंगावर कधी काव्य तर कधी शोकांतिकेचे पडसाद उमटले जातात... यातूनच आपल्याला सुंदर ते काय शोधत आनंदसोहळे साजरे करायचे असतात..  आयुष्यावर प्रेम करायला त्याशिवाय संधी मिळतही नसते.. असे प्रेम करायला गेल्या वर्षाने शिकवले..  निकटच्या जगाच्या सुखदुःखाशी जडलेलं जोडलेलं अतूट नाते मनातल्या कवीला साद घालणारे असेल तर दुरस्थावरही प्रेम करणारे असते.. जी माणसे भेटली नाही तरीही ती मनातली झाली..  व्हाट्सअप आणि फेसबुक माध्यमातून माणसे भेटत गेली आणि नकळत न पाहताच जवळची वाटायला लागली..  असे अपरिचित पैलतीर...
*अशी पाखरे येती* *इग्रेट* ःःःःःःःःःःःः🌹 ‘इग्रेट’ हा पक्ष्यांमधल्या हेरॉन जातीचा प्राणी असून याची पिसे खालच्या भागी शरीराला चिकटलेली असतात. पंख मात्र मोकळे असतात. प्रामुख्याने अमेरिकेत आढळणाºया या पक्ष्याची लांबी तब्बल ३७ इंच असते. पिसे मऊसर असून शेपटी आखूड व छोटीशी असते. इग्रेट पक्ष्याच्या पंखांचं एक वैशिष्ट्य आहे. ते असे की, याचे पंख एकावर एक असे १२ थर असतात. युरोपात आढळून येणाºया इग्रेटचा रंग पांढरा असून ते ४० इंच फुटाचे असतात. यांची चोच पांढरी तर पाय काळे असतात. ःःःःःःःःःःःः🌹 *निशिकान्त मायी* विदर्भ/मराठवाडा  मोबाईल 9881152439 ःःःःःःःःःःःः
*अशी पाखरे येती...* ःःःःःःःःःःःः🌹 *कॅसोवरी* ःःःःःःःःःःःः🌹 चपळ आणि चतुर असणारे हरिण सर्वांचेच परिचयाचे आहे. हरिण धावण्यात नंबर-वन आहे. मात्र त्याहीपेक्षा सर्वात जास्त वेगाने धावणारी पक्ष्याची आणखी एक जात या पृथ्वीतलावर आहे. कॅसोवरी त्याचे नाव. पळण्यात तेज असणारे हे पक्षी प्रामुख्याने आॅस्ट्रेलियात आढळून येतात. धावण्यामध्ये या कॅसोवरीचाच पक्षिविश्वात नंबर एक समजला गेला आहे. कॅसोवरीच्या अनेक जाती आहेत, पण प्रकार मात्र दोनच आहेत. कॅसोवरी व एमू. एका जातीच्या कॅसोवरीच्या डोक्यावर शिरस्त्राणासारखा शृंगमय भाग असतो. ते अन्य पक्ष्यांच्या अंड्यांवर व शाकाहारी फळांवरच ताव मारून आपला उदरनिर्वाह करतात. खाण्यात त्यांचा स्वभाव हा अधाशीपणाचा असतो. घनदाट जंगलातील झुडपांमध्येच ते राहतात. कॅसोवरी या पक्ष्याला पकडणे अतिशय कठीण असते. कारण डोळ्यांची पापणी लवते न लवते ते कुठल्या कुठे पळालेले असतात. ःःःःःःःःःःःः🌹 *निशिकान्त मायी* विदर्भ/मराठवाडा  मोबाईल 9881152439 ःःःःःःःःःःःः

जंगल सफारी (कस्तुरा)

*अशी पाखरे येती* ःःःःःःःःःःःः🌹 *कस्तुरा* ःःःःःःःःःःःः🌹 ऊन्ह बिलकूल सहन न करू शकणारं कस्तुरा नामक पाखरू उन्हाळ्यात पहाडाच्या खाली उतरत नाही. सुमारे ८ ते १० हजार फूट उंचच उंच ठिकाणी विहार करीत राहते अन् हिवाळ्याची शीतल पवन सुरू होताच आपल्या देशात, राज्यात, शहरात प्रवेश करते. पहाडाच्या नदीकिनारी विहार करून किडे-कृमी, छोटे-छोटे जीवजंतू सेवन करून कस्तुरा आपलं पोट भरते. किकिळेसारखी कस्तुराही उत्तम गायिका असून उष:काली ती गायला प्रारंभ करते. ३० सेंटीमीटरची हा पक्षी निळ्या रंगात आढळून येतो. निळा रंग चमक निर्माण करतो. दक्षिण भारतातील कस्तुरा आकाराने छोटी असून तिची चोच काळ्या रंगाची असते. कस्तुरा या पक्ष्याचा आणखी एक प्रकार अस्तित्वात आहे. त्याचा रंग मात्र कत्था आतो. या प्रकारातल्या पक्ष्याची विशेषता म्हणजे तो वारंवार आपली शेपटी फैलावून विहार करीत असतो. पर्वत खाडीवरील कृष्णसार नाभीमधून टपकणाºया कस्तुरीचं भक्षण  करीत असल्याने या पाखराचं नाव कस्तुरा असं पडलं असावं. ःःःःःःःःःःःः🌹 *निशिकान्त मायी* विदर्भ/मराठवाडा  मोबाईल 9881152439 ःःःःःःःःःःःः🌹

जंगल सफारी (अजगर)

*जंगल सफारी* ःःःःःःःःःःःः🌹 *अजगर* ःःःःःःःःःःःः🌹 बोकडासारख्या अवाढव्य प्राण्याला, प्रसंगी माणसालाही गिळंकृत करणारा अजगर हा मुळात सापाची जात आहे. अजगराच्या जबड्याची रचनाच अशी आहे की, त्यांना आपल्या शरीरापेक्षा जाड्या प्राण्यालाही गिळता येईल. अजगर आपल्या शेपटीने विळखा घालून आपल्या सावजाला एखाद्या झाडाच्या फांदीस धरून ठेवतो. अजगराच्या शरीराच्या मध्यभागाच्या ठिकाणी घट्ट अन् दाबल्यासारखे आहे असे वाटते. तसेच डोक्याच्या मागील बाजूस बारीक बारीक खवले असल्याचे आढळून येते. उष्ण प्रदेशात वास्तव्य करणारा हा अजगर उष्ण प्रदेशातील समुद्रतळी अधिक प्रमाणात दिसून येतो. नरभक्षक असणारा अजगर हा प्राणी अवाढव्य बनला आहे. प्राणिसंग्रहालयात हा प्राणी बघताना मानव प्राण्याला मात्र मज्जा येते.  ःःःःःःःःःःःः🌹 *निशिकान्त मायी* विदर्भ/मराठवाडा  मोबाईल 9881152439 ःःःःःःःःःःःः🌹

जंगल सफारी (कस्तुरी मृग)

*जंगल सफारी* ःःःःःःःःःःःः🌹 *कस्तुरी मृग* ःःःःःःःःःःःः🌹 काश्मिरी सौंदर्यात आढळून येणारा कस्तुरी मृग हा प्राणी हरणाच्या जातीचा आहे. केवळ नर मृग असलेल्या प्राण्यालाच ‘कस्तुरी’ची देणगी प्राप्त झालेली आहे. ही कस्तुरी नराच्या बेंबीजवळ असते. काश्मीरशिवाय हिमालयाच्या ७ ते १२ हजार फूट उंचीवर तसेच तिबेटात आणि मध्य आशियात सॅबेरियापर्यंत हे मृग आढळून येतात. कस्तुरी मृग या प्राण्याचं वैशिष्ट्य असे की, ते खावून-पिवून मस्त झाल्यानंतर त्यांची बेंबी वाढत जाते. आकार मोठा होत जातो अन् तिथेच कस्तुरी निर्माण होते. एका कस्तुरी मृगापासून सरासरी एक औंस कस्तुरी मिळते. बेचव असणाºया या प्राण्याचे मांस मात्र चवदार असते. कस्तुरी मृग पाहायला मिळणे सोपे आहे. त्याला हस्तगत करणेही कठीण नाही. मात्र कस्तुरी मिळणे अतिशय अवघड आहे. कस्तुरी माणसाजवळ असते चांगले, शुभ समजले गेले आहे. कस्तुरीचा सुगंध घेण्यास मानव हपापलेला असतो. कारण कस्तुरीचा सुगंध हुंगणे हे आरोग्यदायक उत्तम आहे. ःःःःःःःःःःःः🌹 *निशिकान्त मायी* विदर्भ/मराठवाडा  मोबाईल 9881152439 ःःःःःःःःःःःः

जंगल सफारी (ससा)

*जंगल सफारी* ःःःःःःःःःःःः🌹 *ससा* ःःःःःःःःःःःः🌹 सश्याने काहीतरी घोर अपराध केला अन् शिक्षा म्हणून देवाने त्याचे कान ओढले. परिणामी सश्याचे कान लांब झाले, अशी आख्यायिका ऐकिवात आहे. म्हणूनच आजही कुणाकडून काही अपराध झाला तर ज्येष्ठ लोक लहान्यांचे कान धरून त्याला एक प्रकारे शिक्षाच दिली जाते. ससा आहेही खोडकर प्राणी, पण तेवढाच भित्राही आहे. हेअर आणि रॅबीट असे दोन प्रकार ससा या चिमुकल्या प्राण्याचे आहेत. हेअर जातीच्या सश्याचे कान व मागील पाय रॅबीट सश्यापेक्षा लांबीने मोठे असतात. हेअर आपली पिले गवतात प्रसवतात. जन्मत:च त्यांच्या अंगावर मऊसे केस असतात व डोळे उघडे असतात. तर, रॅबीट मातीत बिळे खोदून पिलांना जन्म देतात. साधारणपणे एका महिन्यानंतर ते पळू लागतात व स्वत:चं खाद्य स्वत:च आणून आपला उदरनिर्वाह करतात. पूर्णपणे वाढलेल्या सश्याचे डोके व शरीर मिळून लांबी ४० ते ४५ सेंमी तर वजन २ ते ३ किलोचे असते. सश्यांच्या जाती-जातींमध्येही फरक आढळून येतो. त्यांच्या अंगावरील केस थोडे कडक व खरबडीत असतात. अंगाचा रंग तांबट मातकट असून त्यात थोडा काळसर रंग पसरल्यागत वाटतो. शेपटी तांबडी पण टोकावर काळसर दि...

जंगल सफारी(नाग)

*जंगल सफारी* ःःःःःःःःःःःः🌹 *इजिप्ती नाग* ःःःःःःःःःःःः🌹 ज्या नागपंचमीला नागांची पूजा केली जाते त्या नागांच्या अनेक जाती आढळून येतात. अशाच जातींमध्ये एक जात केवळ इजिप्तमध्ये आढळून येते. त्या नागाला इजिप्ती नाग (अ‍ॅस्प) असे म्हणतात. इजिप्ती नाग भयंकर विषारी असतो. जेव्हा या नागास धक्का लागतो अथवा याच्या जवळ कुणी प्राणी येतो, तेव्हा हा आपले डोके व शरीर वर उचलतो. त्यानंतर तो आपली मान फुगवतो आणि त्या सावजावर हल्ला चढवतो. तेव्हा हे दृश्य म्हणजे तो माणसासारखा उभा राहिल्याचा अभूतपूर्व अनुभव असतो.  ःःःःःःःःःःःः🌹 *निशिकान्त मायी* विदर्भ/मराठवाडा  मोबाईल 9881152439 ःःःःःःःःःःःः🌹

जंगल सफारी (लकडबग्या)

*जंगल सफारी* ःःःःःःःःःःःः🌹 *लकडबग्घा* ःःःःःःःःःःःः🌹 मांजर म्याँवऽम्याँवऽऽ करते तर कुत्रा भोऽभोऽऽ करतो. ओळखा पाहू... मांजर अन् कुत्रा मिश्रित हा लकडबग्घा नामक प्राणी कोणता आवाज असेल? मी सांगतो... लकडबग्घा नावाचा हा विचित्र प्राणी ना म्याँवऽम्याँव करतो, ना भोऽभोऽऽ. तो तर चक्क हसतो...! लकडबग्घाला जेव्हा केव्हा कोणाला बोलवायचे असते किंवा जेवण करायचे असते तेव्हा तो जोरजोराने हसतो अन् हसता हसताच आपल्या त्या सावजाच्या चारही बाजूंनी गिरकी घेऊन जणू नृत्यच करीत आहे की काय, असे सहज वाटून जाते. कुत्र्याच्या पायासारखे पाय अन् मांजरीसारखे त्याचे शरीर असते. मात्र त्यात ना मांजरीसारखी मृदुता अन् सुंदरता असते, ना कुत्र्याप्रमाणे प्रामाणिक असतो. लकडबग्घा प्राण्याचे कान छोटे अन् डोकं भरभक्कम असते. मागील पाय जाडे, पण आखूड असल्याने शरीराचा मागील भाग खाली झुकलेला दिसून येतो. संपूर्ण जंगली प्राणी असणारा लकडबग्घाची उंची ९० सेंमी, लांबी १५० सेंमी असून शरीरावर खाकी रंगाचे तर पायावर काळ्या रंगाचे पट्टे असतात. त्याचे वैशिष्ट्य असे की, त्याला जोरदार भूक लागली तरी तो शिकार करीत नाही. उलटपक्षी दुसºया प्राण्यांनी क...

जंगल सफारी (ऑक्टोपस)

*जंगल सफारी* ःःःःःःःःःःःः🌹 *आॅक्टोपस* ःःःःःःःःःःःः🌹 अष्टपाद प्राणिवर्गात कोळी, विंचू, गोचिड, अळी वगैरे प्राणी येतात. त्यापैकीच एक जात आहे शीर्षपाद प्राण्याची. या शीर्षपाद प्राण्यात आॅक्टोपस नामक एक-दोन कल्ले असणाºया प्राण्याची जात आहे. आॅक्टोपस प्राण्यास हातासारखे आठ अवयव असून त्या प्रत्येकावर शोषक नळ्यांच्या दोन रांगा असतात अन् त्या नळ्या वेगवेगळ्या दिसतात. मात्र त्या वेगवेगळ्या दिसत असल्या तरी एक झालेल्या असतात आणि हेच या आॅक्टोपसचे वैशिष्ट्य ठरले आहे. डोके पुढे आलेले असून ते मानेसारख्या अवयवाने जोडलेले असते. शरीराला आखुडता असून लांबी नऊ फुटांपर्यंत असू शकते; नव्हे अशीच या आॅक्टोपस प्राण्याची शरीररचना असते.  ःःःःःःःःःःःः🌹 *निशिकान्त मायी* विदर्भ/मराठवाडा  मोबाईल 9881152439 ःःःःःःःःःःःः🌹

जंगल सफारी(कासव)

🌹 *जंगल सफारी* ःःःःःःःःःःःः🌹 *कासव* ःःःःःःःःःःःः🌹 कासव हा पाण्यात आणि जमिनीवर जगू शकणारा आपल्या नित्य परिचयाचा प्राणी आहे. कासव पाण्यातले जीवजंतू खावून पाणी साफ करते म्हणून पाणी पिण्याच्या विहिरीत कासव पाळण्याची पद्धत आहे. लहान मुलांना एक पाळीव प्राणी म्हणून हा कासव आवडतो. अगदी विचित्र दिसणारा हा प्राणी अतिशय खादाड अन् चिवट असतो. म्हणूनच निसर्गाच्या रहाटगाडग्यात युगानुयुगे कासव टिकून राहिले आहे. कासवाची पाठ अतिशय टणक असून चाल संथ असते.  ःःःःःःःःःःःः🌹 *निशिकान्त मायी* विदर्भ/मराठवाडा  मोबाईल 9881152439 ःःःःःःःःःःःः🌹

जंगल सफारी(उंदीर)

*जंगल सफारी* ःःःःःःःःःःःः🌹 *उंदीर* ःःःःःःःःःःःः🌹 विद्येची देवता श्री गणेशाचे वाहन असलेला उंदीर एक उपद्रवी प्राणी आहे. उंदराचे अनेक प्रकार जगात आढळून येतात. काही उंदीर शेतात राहतात तर काही काही आपल्या घराच्या कानाकोपºयात आढळून येतात. शेतात वास्तव्य करणारे उंदीर आकाराने लहान असतात. त्यांचा रंग पिंगट काळसर असून ते घाणेरड्या व अंधाºया जागांमध्ये सदैव निवास करतात. त्याचमुळे त्यांच्या अंगावर पिसरा दिसून येतात. या पिसवांमुळे प्लेगजंतूंचा प्रसार होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. म्हणून शेतकरी त्यांना नेस्तनाबूत करण्याचाच नेहमी प्रयत्न करीत असतो. दुसºया प्रकारतले उंदरं हे आपल्या घराच्या कानाकोपºयात नित्य आढळून येतात. घरातले धान्य खावून अन् कपडे कुरतडून ते घरातल्या लोकांना हैराण करून सोडतात. घरमालकाला त्रास देणे एवढाच त्यांचा उद्योग सतत सुरू असतो. कोणत्याही प्रकारचे तेलकट पदार्थ हे त्यांचे आवडीचे खाद्य असते. त्यांच्या उपद्रवाने आपणही त्यांना पळवून लावण्याचा सदोदित प्रयत्न करीत असतो. किंबहुना त्याला मारून नेस्तनाबूत करण्यासाठी नाना प्रकारच्या क्लृप्त्या करीत असतो. दिसेल ते सतत कुरतडत राहणे हा य...

जंगल सफारी

*जंगल सफारी* ःःःःःःःःःःःः🌹 *अ‍ॅर्डव्हर्क* ःःःःःःःःःःःः🌹 गाढवासारखे लांबसडक कान अन् डुकरासारखे तोंड... पण गाढव किंवा डुक्कर नसलेला अ‍ॅर्डव्हर्क नावाचा हा प्राणी गाढव-डुक्कर मिश्रित असून बेढब आकाराचा असल्याची जणू त्याला देणगीच मिळाली आहे. अ‍ॅर्डव्हर्कची पाठ कमान असल्यासारखी उंच असते. त्याच्या अंगावर पिवळ्या रंगाचे लव असून शेपटीवर एकही केस नसतो आणि हेच याचे वैशिष्ट्य ठरावे. सतराव्या शतकात अ‍ॅर्डव्हर्कचा सर्वप्रथम आफ्रिकेत शोध लागला. त्याचे आवडते खाद्य मुंग्या-वाळवी असून त्यावरच त्याचा उदरनिर्वाह चालतो. आपल्या लांब काटेरी जिभेने तो मुंग्या, किडे, वाळवी आपले लक्ष्य समजून एका दमात गटकून टाकतो. किड्या-मुंग्यांवर जगणाºया या अ‍ॅर्डव्हर्क प्राण्याचे पाय टणक व मजबूत असतात. असो. अ‍ॅर्डव्हर्क या प्राण्याकडे बघताक्षणीच एखाद्या डुकराची किंवा गाढवाची आठवण यावी, एवढे साम्य आढळून येते. ःःःःःःःःःःःः🌹 *निशिकान्त मायी* विदर्भ/मराठवाडा  ःःःःःःःःःःःः🌹

जंगल सफारी (रानडुक्कर)

*जंगल सफारी* *रानडुक्कर* उकिरड्यावर चरणारे डुकरंच आपल्याला माहिती आहेत. पण त्याही पलीकडे अनेक जाती डुकरांच्या आहेत. त्यापैकीच एक आहे रानडुक्कर. साधारणपणे जंगलात आढळून येणाºया या प्रकारातील डुकरं विभिन्न आकारात दिसून येतात. अंदमान टापूच्या जंगलात या रानडुकरांचं वास्तव्य अधिक प्रमाणात आढळून येते. मात्र अंदमान टापूत असलेले ही डुकरं भारतभूवर आढळून येणाºया सर्व डुकरांच्या जातींमध्ये लहान असते. ५१ ते ५२ सें.मी.पर्यंत ही उंची त्यांच्या शेपटीसहीत असते. मात्र त्याच्या लांबीकडे बघितल्यास डोक्यापासून शेपटीपर्यंत एक लांब आकाराचा पिंडाच असल्याचा भास होतो. रानात राहणारी ही डुकरं अधूनमधून शेतशिवारातही भ्रमण करताना दिसून येतात. असे म्हणतात की, प्रशांत महासागराच्या छोट्या प्रदेशातील लोकांचं खाद्य हे रानडुकरंच असतात. तेथील लोक कोंबडीसारखे रानडुकरं पाळतात. ते पाळीव झाल्यानंतरच त्यांच्यावर ताव मारला जातो. एकेकाळी साहसी राजपुत्र रानडुकरांची शिकार करायचेत. यामुळे दिवसेंदिवस त्यांची संख्या घटत असून आज हीच रानडुकरं केवळ प्राणिसंग्रहालयांची शोभा बनून राहिली आहेत. आपल्याकडे वास्तव्य करीत असलेल्या डु...

जंगल सफारी माकड

*जंगल सफारी* ःःःःःःःःःःःः🌹 *काळ्या तोंडाचे माकड* ☘☘ हुऽपऽऽहुऽपऽऽ करीत एका झाडावरून दुसºया झाडावर कोलांटउड्या घेणारे वानर एक उपद्रवी प्राणी म्हणून प्रचलित आहे. त्यातही विविध जाती आढळून येतात. अशाच जातींपैकी काळ्या तोंडाच्या माकडांची एक जात आहे. त्यांना ‘तामरिन वानर’ असे म्हटले जाते. ब्राझीलच्या तटवर्ती सुपरागई द्वीप समुद्रात हे प्राणी आढळून येतात. तामरिन वानर माणसाला भिणारे तसेच लाजाळू असतात. या वानरांचा लाजाळूपणा इतका असतो की माणसांना ते फोटोही काढू देत नाहीत. नव्हे, कोणी फोटो काढत असताना ते अक्षरश: लाजतातही. खारीप्रमाणे लांब असणारे तामरिन माकड सामान्य माकडासारखेच दिसत असले, वागत असले तरी प्राणिविश्वातले ते एक आश्चर्य ठरले आहे. सुपरागुई हे जंगल अतिशय दाट अरण्य असून जंगलाधिकाºयांनासुद्धा या माकडांचे दर्शन दुर्लभ ठरले आहे. सुपरागुईशिवाय अ‍ॅटलांटिक जंगलात, कॅलिफोर्नियाच्या मध्यवर्ती क्षेत्रात आणि दक्षिण अमेरिकेच्या जंगलात त्यांचे प्रामुख्याने वास्तव्य आढळून येते. परंतु मानवाच्या भीतीने व आपल्या लाजाळू स्वभावाने ते समोर येण्यास धजावत नाहीत. म्हणूनच त्यांचे छायाचित्रही मिळणे कठीण ठरते. सुप...

जंगल सफारी

*जंगल सफारी* ःःःःःःःःःःःः🌹 *उंट* ☘ रवंथ करणारा एक चतुष्पाद प्राणी म्हणून उंटाची जात लोकप्रिय आहे. शिंगहीन असलेल्या उंटाचे मूळ स्थान मोरक्कोपासून चीनपर्यंत ९०० ते हजार मैलांचा पसरलेला विस्तृत प्रदेश आहे. असे असले, तरी आफ्रिकेपासून हिंदुस्थानपर्यंतच्या खालच्या पट्ट्यात उंटाचे वास्तव्य आहे. उंटाची वैशिष्ट्य असे की, त्याला कोणी इजा केल्यास त्याचा तो सूड उगवतो. रखरखीत वाळवंटात हुंदडणे त्याला जाम आवडते. कित्येक दिवसपर्यंत तो पाण्याविना राहू शकतो. मानवी स्वरक्षणार्थ म्हणून उंचाचाच वापर केला जातो. त्याच्या शरीरयष्टीआड बसून माणसाला ऊन-वाºयापासून सुरक्षित राहता येते. उंट जेव्हा आपले गुडघे टेकवून मान जमिनीवर लांबवून ठेवतो, तेव्हा वादळ उद्भवते व ते विषाक्तही असू शकते. वादळ बंद होईपर्यंत उंट आपल्या नाकपुड्या बंद ठेवून वाºयातील विषाक्त वायू पळवून लावण्यास मदत करीत असतो. नर उंटाची चाल ही मंद असते. मात्र मादी उंटाची चाल ही जलद असते. उंट एक अति सहनशील प्राणी असून ४० ते ५० वर्षांपर्यंत तो जगू शकतो. तथापि, उंटाचे मांस व दूध अरबी लोकांचे खाद्य आहे. आपण उंटाच्या केसांचा कुंचला, तंबू, गालिचे आणि कपडे बनविण...

श्रीकृष्ण

* श्रीकृष्ण ...*🌹 छबीतला श्रीकृष्ण खुपच मोहक जाणवला.. चिंतनशिलतेकडे नेणारी ही छबी बरेच संवाद साधून गेली.. आमच्या संस्कारी मनावरचा श्रीकृष्ण मला नवीन काही सांगत होता..  श्रीकृष्ण... मानवी मनाचे स्वप्न.. संपन्नत्व शोधायचे असेल तर श्रीकृष्णाइतके त्रुप्त व्यक्तीमत्व दुसरे नसावे..श्रीकृष्णाला ईश्वरीय अवताराची झुल जरी पांघरली असली तरी त्यातले संपन्न पुरुषत्वच मनाला भावणारे आहे.. जन्माचा उद्येशच मुळात मनाला प्रसन्न ठेवणे असावा.. किंबहुना आम्ही धारण करावा असा धर्म म्हणजे "प्रसन्नत्व राखणे" एवढाच.. आता प्रसन्नत्व राखण्यासाठी काय करावे असा प्रश्न मनात आला तर त्याचे उत्तर एकच आणि ते म्हणजे येथे प्रत्येक आत्म्याने श्रीकृष्ण होऊन जगावे..  जगातली सारी मुळ प्रश्नेच ही स्त्री मनाशी निगडित असावीत हे सत्य कदाचित श्रीकृष्णाला उमजलेले असावे.. पुरुषी अंहकाराच्या गर्तेत स्त्री मनांची होणारी कुचंबणा आणि त्यामुळे निर्माण होणारे नात्यातले तणाव हे प्रेमधर्मच विसरून वा प्रेम संकल्पनेची गल्लत करुन जगली जातात.. आणि यातुनच प्रश्नांचा प्रारंभ होतो.. या दुर्मीळ सत्याचे विस्मरण होण्याचा शाप मानव...
*अंतर्धान..* ओंजळ सुमनांची  अविरत गंधारत, उन्मादून कणकण अज्ञात कोणी अवतरते... किरणांचा सोनप्रवाह पुर्वा प्रसन्न नहाते, क्षणक्षण नवलाईचा उरात कोणी पेरते... फुलांची परडी गच्च दुर परिचित भरते.. विरघळत सुगंधात माळ कोणी माळते.. देह भारुन सुवास  चाहूल कोण देते, अंधारातून प्रकाशात अद्रुष्य तरी दिसते.... ध्यास प्रगाढ फुलांचा शांतता काही बोलते, उमलत्या स्वरुपात नकळत अंतर्धान पावते... ........ अशोक अर्धापुरे, औरंगाबाद...

अशी पाखरे येती पेंग्विन

*अशी पाखरे येती...* ःःःःःःःःःःःः🌹 *पेंग्विन* ःःःःःःःःःःःः🌹 केवळ बर्फाळ प्रदेशात वास्तव्य करणारे पेंग्विन पक्षी अतिशय शांत, स्थितप्रज्ञ असलेली जणू जिवंत मूर्तीच आहे. दक्षिण ध्रुवकडील अंटार्क्टिका परिसरात साधारणपणे पेंग्विन पक्षी आढळून येतात. येथील बर्फावर आपले इवले-इवले पाय बर्फात रोवून सदोदित विहार करीत राहतात. पेंग्विन पक्ष्याच्या एकूण १७ जाती असल्याचे सांगितले गेले आहे. अशा विविध जातीचे पेंग्विन गटागटाने वेगवेगळ्या प्रदेशात आढळून येतात. बर्फाळ प्रदेशात आढळणारे हे पक्षी उपद्रवी नसल्याने पक्षिप्रेमींना त्यांचे मोठे आकर्षण असते. ःःःःःःःःःःःः🌹 *निशिकान्त मायी* विदर्भ/मराठवाडा  मोबाईल 9881152439 ःःःःःःःःःःःः🌹

अशी पाखरे येती (आयडर बदक)

*अशी पाखरे येती...* ःःःःःःःःःःःः🌹 *आयडर बदक* ःःःःःःःःःःःः🌹 बदकातील एक जात असलेला आयडर बदक साधारणपणे ग्रीनलँड व आईसलँडमधील उत्पत्ती असून ४५ अक्षांशांच्या वरील प्रदेशात पाहावयास मिळतात. सामान्य बदकाच्या दुप्पट मोठे असलेले आयडर बदकांना एकांतवासात राहणे आवडते. विविध प्रकारच्या कालव्यांवर आयडर बदक आपली उपजीविका भागवितात. वाळलेल्या समुद्र लव्हाळ्यांची त्यांची घरटी असून शरीराच्या आतील भागात अंगावरील पर दिसतात. या पंखांचं वैशिष्ट्य म्हणजे ते ऊबदार व हलकी-लवचिक आहेत. आयडर बदकांच्या या पंखांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ःःःःःःःःःःःः🌹 *निशिकान्त मायी* विदर्भ/मराठवाडा  मोबाईल 9881152439 ःःःःःःःःःःःः🌹

अशी पाखरे येती (पाकोनी)

अशी पाखरे येती... ःःःःःःःःःःःः🌹 पाकोनी ःःःःःःःःःःःः🌹 भव्य-दिव्य पंख असलेला पाकोनी पक्षी पडिक इमारतीत अंधाºया जागीच राहतात. हे पक्षी आपली घरटी बनविण्यासाठी दगड-मातीचा वापर करीत नाहीत. त्यांची घरटी ही त्यांच्याच तोंडातील लाळेपासून तयार केलेली असतात. त्या अगोदर ते सुयोग्य जागेचा शोध घेतात. त्यानंतर घरट्याच्या आकाराविषयी त्यांच्यातच विचारविमर्ष होतो. अखेर एक जागा निश्चित करून सर्व पाकोनी पक्षी एकत्र येऊन आपआपल्या तोंडातील लाळेचा वापर करून घरटं बनवितात. हीच पाकोनीची विशेषता असावी. नर आणि मादी पाकोनीत आमरण संबंध राहतात. हिवाळ्यातील थंडी असह्य झाल्याने ते दूरवरच्या प्रदेशात स्थलांतर करतात. म्हणूनच त्यांना ‘दूरदेशाचे अभ्यासार्थी’ असेही म्हणतात. आपले खाद्य शोधण्यासाठी ते कधी कधी सात-आठ मैल दूरही निघून जातात. दरतासी ६५ ते १४५ किमी वेगाने त्यांची उडण्याची क्षमता असते. उडत उडतच आकाशात किड्यांची हवाई शिकार करून स्वत:ही खातात अन् सोबतच्या आपल्या लेकरांनाही भरवतात. इतकेच नव्हे, अखंड उडत असताना पाकोनी अनेक दिवस उपाशीसुद्धा राहू शकतात. अनेक दिवस निराहारी असूनही ते राहू शकतात. जगू शकतात. ः...

अशी पाखरे येती (घार)

*अशी पाखरे येती...* ःःःःःःःःःःःः🌹 * घार * ःःःःःःःःःःःः🌹 आकाशात उडताना अधेमधे गटांगळ्या खाणे, ही विशेषता. गृहांगणाच्या (घरासमोरील अंगण) अगदी वर आकाशात भ्रमण करीत राहणे अथवा घराभोवती घिरट्या घालणे, ही वैशिष्ट्य. कुठे खाद्यवस्तू दिसताच तीव्रतेने त्यावर झेप घेऊन डोळ्यांची पापणी लवते न लवते एवढ्या चपळतेने ती वस्तू उचलून नेणे, ही खासियत. ही सर्व गुणवर्णने आहेत घार या पक्ष्याची. उभ्या माणसाच्या हातातील वस्तू अलगदपणे उचलून पळविणे हा घारीच्या डाव्या हाताचा (?) मळ आहे, असे म्हणणे वावगे ठरू नये. अशावेळी घारीच्या झडपेने माणसाचा हात जखमीही होऊन जातो. पण त्याची पर्वा या घारीला कसली? असे म्हटले जाते की, खाद्यपदार्थाशिवाय माणसाच्या हातातील कोठल्याही वस्तूचे तसेच स्त्रियांच्या हातातील दागदागिन्यांचे घारीला जबरदस्त आकर्षण असते. मोठ्या शिताफीने ती अशा वस्तूंचे अपहरण करते. बाजारातील मांस-मासोळीच्या दुकानांभोवती या घारीचं विशेषत्वानं वास्तव्य राहते. परिसरातील या भागात ती सतत घिरट्या घालत असते. मासोळी घारीचं आवडतं खाद्य असून ते उचलून नेण्यात घारीचा हातखंडा वाखाणण्याजोगा आहे. गरुडाप्रमाणे घारसु...

कविता ,निशांत

*कविता* ःःःःःःःःःःःः🌹 * निशांत * ःःःःःःःःःःःः🌹 निशांत समयी उगवे दिनकर । अशांत रमणी मन कलेवर ।। आवर हुंदक्यांचा हृदी दाटूनी येई । उठलं वादळ साºया घरभर ।। वसंताशी प्रीत  जडविली छान । बहरला पुन्हा आज गुलमोहर ।। दरवळतो सुगंध वसंताशी रमुनी । मन विव्हळले शिशिर बघुनी ।। पावसाच्या धारा जपल्या युगाने ।। फुलाचेही फुलले स्वप्न क्षणभर ।। ःःःःःःःःःःःः🌹 *निशिकान्त मायी* विदर्भ/मराठवाडा  मोबाईल 9881152439 ःःःःःःःःःःःः🌹

अशी पाखरे येती

* अशी पाखरे येती...* ःःःःःःःःःःःः🌹 *पाणकावळा* ःःःःःःःःःःःः🌹 मांजरीच्या जातीतील पाणमांजर जसा एक प्रकार पक्षिविश्वात आढळून येतो तसाच कावळ्याच्या जातीतील पाणकावळा हाही एक प्रकार प्रचलित आहे. पाणकावळे सतत पाण्यावर तरंगत असतात. परंतु त्यांचे बहुतांश शरीर हे पाण्याखाली असते. त्यांची मान व खांदे तेवढेच बाहेरून दिसून येतात. याच्या उलट बदकाचे आहे. बदक अक्षरश: पाण्यावर विहार करतात, तर पाणकावळे पाण्याखालीच अधिक प्रमाणात असतात. त्यांची पोहण्याची तºहाही निराळीच आहे. संथ पाण्यावर ते सफाईदारपणे सूर मारतात. खेकडे, बेडकांची पिल्लं, छोट्या आकारातील बेडूक आणि मासे हे पाणकावळ्याचं आवडीचं खाद्य आहे. छोटा पाणकावळा भारत देशात सर्वत्र आढळून येतो. मोठे व मध्यम आकाराचे पाणकावळे भारतात दुर्मिळ आहेत. क्वचित प्रमाणात त्यांचं प्रमाण असल्याचं सांगण्यात आलं. झाडीझुडपातील पाण्याच्या ठिकाणी हे पाणकावळे दिसून येतात. ःःःःःःःःःःःः🌹 *निशिकान्त मायी* विदर्भ/मराठवाडा  मोबाईल 9881152439 ःःःःःःःःःःःः🌹
*अशी पाखरे येती...* *बाज* केवळ जंगलात आढळून येणारा बाज सडपातळ असला तरी घारीपेक्षा मोठा असतो. अंगाचा रंग गर्द धुरकट व पिंगट असा असलेला या पक्ष्याला काकमारी बाज असेही म्हणतात. तो बिना तुºयाचा असतो. त्याच्या शरीराच्या खालील भाग पांढरा तांबूस असून त्यावर काळसर काड्या तर शेपटीवरील रंग गर्द राखाडी असतो. त्याच्या खालील भागावर काळे पट्टे असल्याचे आढळून येते. नर आणि मादी दोघेही सारखेच दिसतात. मादी ही नरापेक्षा मोठी असते आणि हीच या उभयतांची ओळख ठरावी. पूर्व बंगाल आणि भूतान वगळता भारतात सर्वत्र हा पक्षी आढळून येतो. बाज हा पक्षी अतिशय धाडसी आणि चपळ शिकारी पक्षी म्हणून ज्ञात आहे. झाडाच्या पानामध्ये दबा धरून किंवा हवेतून पाठलाग करून तो आपले सावज हस्तगत करण्यात पारंगत आहे. सावजाला घायाळ करण्याचे त्याचे मुख्य शस्त्र म्हणजे त्याचे दोन सशक्त पंजे...! भक्ष्याच्या शरीरात तो आपल्या पंजांची तीक्ष्ण नखे अशी काही खुपसतो की भक्ष्याला फडफडायलाही वेळ मिळत नाही. बाज पक्ष्याची आणखी एक विशेषता म्हणजे ते जोडी-जोडीने शिकार करण्यास जातात. थव्यातील एखाद्या पक्ष्याला वेगळे पाडून त्याचा पाठलाग सुरू होतो. हा पाठलाग ए...
*अशी पाखरे येती...* *मैना* ‘तोता - मैना की कहानी’ जगप्रसिद्ध आहे. मात्र मैना पोपटासारखी शिकावू नाही. ती स्वत:च गायला शिकते अन् सुंदर गातेही. पहाडी आणि देशी अशा दोन प्रमुख प्रकारच्या मैना जगाच्या पाठीवर सर्वत्र आढळून येतात. शिवाय मैनेचे विविध प्रकारही असतात. यापैकी पहाडी प्रकारच्या मैनेत एक खास गुण आहे... जर तिला प्रयत्नपूर्वक प्रसिद्ध गायिकेची गीतं शिकवली तर त्याच खुबीनं ती स्वर काढू शकते. परंतु देशी असलेल्या मैनेत हा गुण आढळून येत नाही. उत्तर काश्मीर, बलुचिस्तान व पाकिस्तानातही मैनेचं वास्तव्य आहे. या छोट्याशा पाखरात आणखी एक वैशिष्ट्य आहे... शत्रूची चाहूल लागताच ती जोरजोराने ओरडून शिकार करणाºयाला त्या शत्रूपर्यंत पोहोचविण्यास मदत करते. तिचे शत्रू म्हणजे साप आणि बाज. मैना नर व मादीत पारस्परिक प्रेम वृद्धिंगत होते. सर्वभक्षी असलेले हे पाखरू दाण्यापासून मृत झालेल्या पाल-पक्ष्यांवरसुद्धा ताव मारते. जून ते आॅगस्ट हा मैनेचा अंडे प्रसवण्याचा कालावधी असून साधारणत: एकावेळी चार ते पाच अंडी ती देते. तिची घरटी मात्र बेढब असतात. सर्वात मोठी मैना २८ सेंटीमीटर लांब असते. मैनेचे विविध प्रकार असू...
*अशी पाखरे येती...* *सुतार पक्षी* वनांमध्ये राहणाºया पक्ष्यांमध्ये सुतार पक्षी अतिशय बुद्धिमान समजला गेला आहे. तो विविध रंगांमध्ये तो आढळून येतो. ‘सुतार’ या नावावरून कळून येते की हा पक्षी काय आणि कोणते काम करीत असेल. म्हणूनच जंगलाचा सुतार असेही या पक्ष्याला म्हटले गेले आहे. वाळलेल्या व सडलेल्या वृक्षांमध्ये पोकळी निर्माण करणे तसेच जिवंत झाडांनाही छिद्र पाडून त्यात खोल खड्डा करणे हे त्याचे एकमेव महत्त्वाचे कार्य आहे. नर व मादी सुतार पक्षी दोघेही एकत्रितपणे आपल्या कट्यारीसारख्या तीष्ण चोचीने झाडाच्या खोडाला पोकळी करतात. त्यांचे घरटे हे एक फुटापेक्षा जास्त खोल असते. त्या घरट्याच्या तळाशी लाकडाचे तुकडे व भुसा जमा झालेला असतो. परिणामी सुतार पक्ष्याच्या खाद्याला उडून जाण्यास मार्ग मिळत नाही. सुताराला आपले हे घरटे बांधण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्तही कालावधी लागतो. नंतर मात्र या घरट्यांचा उपयोग मैना, घुबड आदी पक्षी आपल्या घरांसाठी करतात. झाडांवर चढणे, झाडात पोकळी निर्माण करणे अशा तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असलेला हा सुतार पक्षी दिसायला मात्र मनमोहक असतो. *निशिकान्त मायी* विदर्भ/मरा...
*कोजागिरी...* पुन्हा पुन्हा रिक्तता माझी स्वताःत रिचवत जगतो.. मी सरत नाही.. मी उरतही नाही... चंद्र प्रकाशात अजूनही अगम्य प्रकटते, ध्यानस्थ असुनही अंतर्यामात ईश्वरीय स्पर्शते.. माझा चंद्र पूर्णत्वाचा, प्रकाश जसा सुक्ष्मदेहातला.. तन्मय होऊन जगावे मागू नये काही शुभ्रक्षणाला.. हे संपन्न चंद्रा... दोन अस्तित्वांचा एक प्रकाश. तुझ्या प्रकाशात तू शुभ्र.. तुझ्या प्रकाशात मी शुभ्र.. ःःःःःःः अशोक अर्धापुरे, औरंगाबाद...
*अशी पाखरे येती...* *नाच रे मोरा* मियू...मियू... असा बेढब ओरडणारा पक्ष्यांचा राजा समजला जाणारा मोर ‘नाच रे मोरा’ म्हटले की थुई...थुई... नाचत आपला मदमस्त पिसारा फुलवून वातावरण प्रसन्न करून सोडतो. नरवंशीय मोरच मियू...मियू... असे विचित्र आवाज काढून आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. मोरांचा भव्य-दिव्य पिसारा हेच त्याचे वैशिष्ट्य आहे. अनेक डोळे असणारा हा पिसारा म्हणजे त्याची खरोखरची शेपटी नसून शेपटीवरील लांबलचक झालेली पिसेच असतात. लांडोरीपुढे नृत्य करताना मोर आपला पिसारा उंच उभारून पंख्यासारखा त्याला आकार देतो आणि याचवेळी तो रोमँटिक मूडमध्ये आलेला असतो, असे म्हणतात. मोराच्या तुºयावरील पिसांच्या टोकालासुद्धा पंख्यासारखा आकार असतो. ब्रह्मदेशात दिसून येणाºया मोराच्या तुºयावरील पिसे टोकदार असतात. वसंत ऋतूमध्ये त्याने जुने पिसे गळून नवीन पिसे तयार होतात. मोरपीस समजल्या जाणाºया या पिसांना मोठ्या प्रमाणात मागणी असून ते जवळ ठेवणे अतिशय शुभ समजले जाते. पश्चिम, मध्य आणि उत्तर भारतातील अनेक भागात मोरांना कायद्याने संरक्षण दिले आहे. विद्यादेवी सरस्वती, युद्धाचा देव कार्तिकेय तसेच योगबलाचे...
*अशी पाखरे येती...* *बुलबुल* चिमणीपेक्षा मोठा असलेला बुलबुल पक्षी सुंदर अन् मोहक आहे. कोंबड्यासमान तुरा त्याने आपल्या माथ्यावर रोवला आहे. काळ्या रंगाचा पण चित्ताकर्षक बुलबुल भारतातल्या दाट व प्रेक्षणीय बागबगिच्यात आढळून येतो. फुलं, फळं आणि छोटे-मोठे किडे-मासे या बुलबुलचं प्रमुख खाद्य आहे. तथापि कारागिरालाही लाजवेल अशी त्यांची घरटी अत्युच्च कारीगरी करून बनविलेली असते. प्रामुख्याने बागेतल्या दाट झाडींमध्ये ही बुलबुल नामक पाखरे दिसून येतात. कधीकाळी ते घराचीही शोभा वाढवितात. मादी बुलबुल एकाच वेळी तीन ते चार अंडी देते. या अंड्यांची विशेषता म्हणजे ते सप्तरंगी असते. गुलाबी रंगाचे बलक असलेल्या या पांढºया अंड्यांवर लाल, निळा अन् करड्या रंगाचे धब्बे पडलेले आढळून येतात. त्याचमुळे या अंड्यांना सप्तरंगी अंडे असे म्हटले गेले असावे. हे अंडे मोठे आकर्षक असते. अंडी ऊबविण्याचे कार्य नर आणि मादी दोघेही आळीपाळीने करतात. बुलबुल पाळण्याचा अनेकांना असतो. हे पाखरू प्रामाणिक आणि माणसाळलेले असल्याने त्यांना पिंजºयात बंद करून ठेवण्याची गरज पडत नाही. ते स्वत:च माणसाच्या अंगाखांद्यावर खेळतात. पुरातनकाळी राजे-...
*अशी पाखरे येती...* *चातक* तीव्र गतीने आकाशात झेपावून तेवढ्याच वेगवान चपळाईने डोळे बंद करून परत खाली जमिनीकडे येणे ही चातक नामक छोट्याशा पक्ष्याची खासियत आहे. चातक हा अतिशय लाजाळू असून वड, पिंपळ, कडुनिंबाच्या झाडाच्या पानांमध्ये वास्तव्य करून राहतो. छोट्या-मोठ्या किड्यांची शिकार करून आपला उदरनिर्वाह करतो. सुमधूर असे गाणे गात सर्वत्र मुक्तपणे विहार करणे त्याचा आवडता छंद आहे. चातकातील नर आणि मादीची प्रणयराधना मोठी वैशिष्ट्यपूर्ण असते. नर चातक गाण गात-गात प्रणयचेष्टा करीत राहतो तर मादी चातक आपल्या पियाची प्रणयपरीक्षा घेत प्रतिसाद देते. हे दृश्य पाहणे म्हणजे आदर्श प्रेमाचे धडे घेण्यासारखेच ठरावे. अशा या चातक पक्ष्याचे रंग विश्लेषण करणे एक कठीण समस्या आहे. कारण ऋतू परिवर्तनासमवेत हा आपल्या पंखांचे रंग बदलतो. पक्षिविश्वात असे अनेक पक्षी आहेत जे चातकाशी साधर्म्य राखून असतात. म्हणून उडत असताना त्यांना ओळखणे महाकठीण होऊन बसते. तथापि चातक पक्ष्यांची ओळखण्याची ‘हिन्ट’ अशी की, आकाशाकडे झेपावण्याची त्यांची निराली अदा...! स्थान-भेद-ऋतूनुसार रंग बदलणारा हा पक्षी आंब्याच्या किंवा कडुनिंबाच्या वृक...
मन उदास आज प्रहरी कोकिळेची साद नाही ना  ऐकू आला कुक्कुट नाद.... लपंडाव न दिसे  खारु ताईंचा ना  ती चिमण्यांची चिवचिवाट... कलरव तो कावळ्यांचा.....?? ना घुमला कबुतर ही.... वाऱ्यासह पानांची  सळसळ ही नाही ना फुलली वेलीं वरची फुले.... ना झाली अरुणोदयी प्रभात... म्हणूनच का आज मन उदास...?? *✍ गौराई*
*अशी पाखरे येती...* ःःःःःःःःःःःः🌹 *बहिरी ससाणा* (४) ☘ शिकारी पक्षी म्हणून ओळखला जाणारा बहिणी ससाणा हा पक्षिजगतासाठी एक देणगी ठरला आहे. बहिणी ससाणाचेही एक वैशिष्ट्य आहे... बहिणी ससाणा या पक्ष्याच्या गळ्यात एक छिद्र असून त्याआधारे तो त्या छिद्रात पाणी साठवून ठेवू शकतो. गायनाची आवड असणारा हा पक्षी गात-गातच सर्वत्र विहार करतो. भुºया रंगाच्या शरीरावर पांढरे पट्टे असतात. हनवटी व कंठ पांढºयाच रंगाचा असतो. डोळ्यांच्या भुवया मात्र पिवळ्या असतात. चोच हिरवी रंग ल्याली असते तर त्या समोरचा भाग काळा आणि पाय पिवळसर असतात. ३३ ते ३५ सेंटीमीटर लांब असणाºया बहिणी ससाणा या पक्षिप्रकारातील नर आणि मादी सारखेच असतात. बंगालपासून राजस्थानपर्यंत सर्वत्र या बहिणी ससाणा पक्ष्याचा संचार असतो. उन्हाळ्यात या पक्ष्यांचे जणू पेवच फुटते. किडे वगैरे खावून बहिणी ससाणा झाडांवरील आपल्या अनोख्या घरट्यात राहतात. ःःःःःःःःःःःः🌹 *निशिकान्त मायी* 9881152439 विदर्भ/मराठवाडा
*अशी पाखरे येती...* ःःःःःःःःःःःः🌹 *चिमणी* (३) ☘ चिव...चिव... करणाºया चिमणीला कोण नाही ओळखत? सदैव आनंदाच्या मस्तीत विहार करणारी, छोट्याशा घरट्यात वास्तव्य करणारी चिमणी सर्व ऋतूत मदमस्त असते. दाणी टिपणारी चिमणी सर्वत्र दिसून येते. अगदी आपल्या घरातील फोटोंच्या फ्रेमपासून घनदाट अरण्यापर्यंत ती उडत राहते. बिनधास्तपणे फिरत राहते. तिच्या चिवचिवाटाचा मंजूळ स्र माणसालाच नव्हे तर चिमण्या बालकांनाही मनोरंजक वाटतो. आपलासा वाटतो. केवळ १५ सेंटीमीटरची ही चिमणी भांडखोर स्वभावाची आहे, हे फार कमी जणांना ठाऊक असेल. असे असले तरी ती भित्री मात्र नक्कीच नाही. माणसांची मात्र तिला जाम भीती वाटते. नर चिमणा आणि मादी चिमणी पाहताक्षणीच ओळखू येतात. मादी भुरकट रंगाची असून नर चिमणाचा वरील भाग थोडा श्वेत-काळा असतो. चिमणीचा अंडी घालण्याचा कालावधी हा वर्षभराचा असतो. वर्षभर ती अंडी घालू शकते. एकावेळी पाच ते सहा अंडी चिमणी देते. अंड्याचा रंग राखेसारखा असतो. छोटे-छोटे जीवजंतू खाणे, दाणे टिपणे आदींनी ती आपले इवलेसे पोट भरते. मात्र घरातील अन्न हे तिचे पंचपक्वान्नच असते. धुळीत बिनधास्तपणे लोळणे हा तिचा आवडीचा छंद आहे...
*भोंडला* 🐘🐘🐘🐘🐘🐘 पर्जन्यराजाची पूजा करण्याचा भारतीय संस्कृतीमधील हा आगळीवेगळा उत्सव.... हत्ती हे वैभवाचं प्रतिक.. हत्तीच्या सोंडेतून पाणी पडल्यासारखा पाऊस झाल्यावर सगळीकडं धनधान्याची समृद्धी होते यासाठी हस्त नक्षत्राच्या पावसाची हि पूजा.. भोंडल्याचा हा सण साजरा करण्या पाठीमागे पावसाबद्दलची कृतज्ञता ,जुन्या काळातील चालीरीती ,देवदेवतांची स्तुती यांचं दर्शन घडविले जातं.         भोंडल्याचा हा उत्सव 16 दिवस साजरा केला जातो याला हातगाही म्हणतात. हत्तीची प्रतिमा अथवा मुर्ती आणून त्याला रोज 16 दिवस रोज फुलांचा आणि 16 प्रकारच्या धान्याच्या लोम्ब्या , मक्याचे कणीस असा हार करून घातला जातो त्यातून या धान्यांची ओळख आणि त्याच महत्व लक्षात याव यासाठी ....16 वर्षांपर्यंतच्या लहान मुलींसाठीचा खर तर हा खेळ , फेर धरून गाणी म्हणायची आणि रोज एक गाणं वाढवत न्यायचं आणि 16 व्या दिवशी 16 गाणी म्हणायची भोंडल्याद्वारे पर्जन्यराजाला निरोप देताना पुढच्या वर्षी असाच वाजत गाजत ये समृद्धी आणअसं निमंत्रण हि या द्वारे दिले जाते .या गाण्यांमध्ये एक लय आणि ताल आहे त्यामुळं त्यातील गोडी आज अ...
*अशी पाखरे येती...* ःःःःःःःःःःःः🌹 *कोकिळ* (१) ☘ गायनाची अत्यंत आवड असणारी कोकिळ जेव्हा गायला सुरुवात करते, तेव्हा संपूर्ण वातावरण धुंद होऊन जाते. तीही मन भरून गाते. वसंत ऋतूमध्ये गाण्याअगोदर कोकिळ मंजरी, कोपले, फळ आदींचे रसास्वादन करते. गात गातच एका वृक्षावरून दुसºया वृक्षावर विहार करते अन् गाण्यात तल्लीन होऊन जाते. हेच वैशिष्ट्य आहे या गानकोकिळेचे. हिचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती वर्षातून चार महिने गात नाही. गीतांचे स्वर तिच्या कंठातून या चार महिन्यांच्या कालावधीत निघत नाही. उत्तर पश्चिम भाग वगळता भारतातील सर्व राज्यात कोकिळ आढळून येते. सर्वच ठिकाणी ती कौतुकाचा विषय असते. तिच्याबद्दल कौतुकाचाच भाव असतो. मल्याळम, चीनकडेही तिचे वास्तव्य आहे. कोकिळेचा आहार हा वटवृक्ष, अश्वत्थ आदी झाडांची छोटी छोटी फळे खावून ती आपला गुजारा करते. तिचे भोजन मोजकेच असून किडे-मासेही तिचे अनेकदा भक्ष्य बनतात. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी कोकिळ हिवाळ्याच्या दिवसात दक्षिण दिशेकडे प्रयाण करते. कारण दक्षिण दिशेकडे थंडीचे प्रमाण कमी आहे. कावळ्यासारखा काळा रंग ल्यालेली कोकिळ आवाजाशिवाय ओळखू यायची नाही. तिचे ...
*अशी पाखरे येती...* ःःःःःःःःःःःः🌹 *टिटवी* (२) ☘ सकाळ झाल्याची सूचना बांग देऊन कोंबडे देते. तशीच बांग टिटवीही देते. परंतु तिच्या या बांग देण्यात, ओरडण्यात ‘जागो जागो’ अशी सूचना समाविष्ट असते. टिटवी या पक्ष्याच्या बांग देण्याचे वैशिष्ट्य असे की, पहिले एक टिटवी बांग देते. त्या पाठोपाठ दुसरी...तिसरी असा असा क्रम चालू होतो अन् वेगवेगळ्या वृक्षांवर बसलेल्या सर्वच टिटवी बोलू लागतात. टिटवी या पक्ष्याच्या या आरवण्याने पहाट झाल्याची सूचना सहजच मानवाला मिळते. लांब शेपटीचा टिटवी नामक हा पक्षी काळ्या रंगाचा असतो. त्याची वाकडी चोच हीसुद्धा काळीच असते. डोळे मात्र लाल रंगाचे असतात. दाट जंगलात किंवा झाडांवर टिटवी आपली घरं बनवून जून ते सप्टेंबर या काळात अंडी घातले. यांची घरं मोठ्या आकाराची असतात, मात्र अंडी घालताना ते घरही छोटे वाटू लागते. कारण मादीची शेपटी ही या घराच्या बाहेर आलेली अनेकदा आपल्याला दिसून येते. मादी टिटवी जेव्हा अंडी देते तेव्हा नर टिटवी नाचून - गाऊन मादीला प्रोत्साहित करीत असतो. ःःःःःःःःःःःः🌹 *निशिकान्त मायी* विदर्भ/मराठवाडा 9881152439
*प्रेम... एक समर्पित भाव..* स्वताःच्या जीवनावर आत्ममग्न होऊन प्रेम करण्याइतपत सुंदर या जगात कांहीच नसावे...  आपला प्रियकर प्रेयसी आपल्या तच असुनही आपण त्याच्यावर प्रेम करत नाहीत तेव्हा आपण इतर कोणावर प्रेम करतो हे म्हणने वा मानने कितपत सत्य असु शकेल.. ? प्रेम हे मुळी काही करण्याचे वा व्यक्त होण्याचे माध्यम असुच शकत नाही तर ते सत्य जगण्याचे शास्त्र आहे..ती एक आत्ममग्नता आहे.. तो स्वतःला स्वताःतच अंतर्मुख करणारा दिव्य अविष्कार आहे.. स्वतःत रमत इतरांच्या अस्तित्वाची चाहूल लागत गेली तरच ते अस्तित्व अंतरात घनीभुत होत जाते.. एक एक नातं जाणीवेतून उमजायला लागते.. यात आत्मानुरुप जे असतं ते नातं लाडीकतेचं.. ते आपल्याच अंतस्थातल्या प्रेमभावनेच्या समीपतेचे.. या समीपतेच्या जाणीवेतूनच समर्पण उमजायला लागते... माणूस प्रेम करत नाही तर आत्मानुरुप असस्तित्वाप्रति समर्पित होऊन जगण्याचा प्रयास करतो... यालाच आपण सर्सासपणे प्रेम म्हणतो.. अशा या प्रेम भावनेमुळे स्वतःवर प्रेम करायचे राहूनच जाते.. एक दिव्य उलगडण्याचे राहून जाते.. जीवन जगण्याचे राहूनच जाते... ............. अशोक अर्धापुरे, औरंगाबाद.....
*याद* 🌹🌹🌹 पावसाळी रात्री मला जागवायची काळ्या मध्यरात्री याद तुझी यायची 🌹🌹🌹 शब्द होऊनी स्तब्ध थांबायचे ओठात भडकल्या ज्वाला उठायच्या मनात 🌹🌹🌹 ठणकते मनात एक आठवण राहू दे स्थिर प्रीत एक क्षण 🌹🌹🌹 द्वैताद्वैतातून वाहे दिव्य दिव्य धारा उजाळला पहा तुटणारा तारा 🌹🌹🌹 *निशिकान्त मायी* विदर्भ/मराठवाडा मोबाईल 9881152439 २६ सप्टेंबर २०१९
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 *प्रेमभंग... नव्हे असंपन्नता...* 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 मी प्रेम करतो वा तिचे माझ्यावर प्रेम आहे असे म्हणने वा मानने हा एक सुसंस्कृत हट्टाहासच वाटतो.. त्यातील वास्तव हे बहुधा ठिसुळ ठरते.. कारण आपण शोधत असलेले unbroken perfection हे बहुधा तेथे गवसलेले नसते.. त्यातल्या अपूर्णत्वाला आपण प्रसंगी 'प्रेमभंग' असे भर्जरी लावून स्वतःला विस्थापित करुन जगतो... हे विस्थापन अंतरंगातल्या कलाप्रांताचे, संगीतसभेचे, साहित्य जत्रेचे, चित्ररंगात रममाण असलेल्या रंगपुष्करणीचे आणि अशा असंख्य तरल स्रुजनात्मकतेचे असते.. कारण प्रेम या भावरंगांच्या विलसण्यातूनच या तरलतेच्या संपन्न वाटा जात असतात.. आणि अशाच वैभवी मानसिकतेला जेव्हा प्रेमभंगाचा कडवट अर्क प्राषन करावा लागतो तेव्हा निर्माण होणारे हे विस्थापित साम्राज्य एकट्याचेच असते.. एकट्यानेच ते जगावे लागते..  येथेच भैरवी आळवत विरहगीतांचे स्वर परवलीचे वाटायला लागताच.. भावनात्मक लिखाणाला, गझलेला, विरहणीला सन्मानाची जागा मिळत जाते.. इतर कोणी सहजतेने तसुभरही काढलेली भावूक छेड वर्मी लागत जाते.. अंतर्यामात उठबैस करणारे सर्वकष काहूर म्हणजे बिन...
अरे संसार संसार ♾♾ तुझ्यासाठी केला । जीवनाचा खेळ ।। आकांक्षाची मेळ । मिलनाचा ।। ♾♾ मिलनही झाले । तुझे नि माझे ।। ओढू का ओझे । संसाराचे ।। ♾♾ संसार संसार करुनि । नाही कशालाच थारा ।। वाढतोय पारा दिनोदिन । विवादाचा ।। ♾♾ मिटवूया वाद करुया संवाद । आठवणींचा उमाळा ।। न आला उजाळा । पूर्णविराम...।। ♾♾ *निशिकान्त मायी* २५ सप्टेंबर २०१९
*आता कठीण झाले* 📢📢💧 गंधमिश्रित जीणे तुझे आता कठीण झाले कितीदा सांगितले या मनी जीवन हे जीवन आहे पण सवाल सतावतो या मनी जीवन म्हणजे काय आहे सुगंधात जगणेदेखील आता कठीण झाले 📢📢💧 जगण्याचा अर्थ केवळ जीवनाचा ऐशोआराम मदिरेतही आहे शक्ती करण्याची नामोहरम पिण्याचीच ताकद स्वत:ला नेहमी सांभाळत आले सुगंधात जगणेदेखील आता कठीण झाले 📢📢💧 *निशिकान्त मायी* विदर्भ/मराठवाडा २४ सप्टेंबर २०१९
*निरवता...* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 रुसु कसा मीच माझ्यावर । नटणेच पुन्हा फार झाले ।। असुनही शहाणे आयुष्य जरी । जगणे वेडेपणाचेच फार झाले। मोजू किती पाऊलें वाटेवरची। रस्तेच निसरडे फार झाले । फूलवुनही देहात वसंत सारा। वणव्यातच जगणे फार झाले। सरली प्रतिक्षा हरले शब्द। अनुस्वारात अर्थ निरव झाले। ःःःःःःःःःःः अशोक अर्धापुरे, औरंगाबाद दि. 22.9.19
*पिसारा* फुलतो पिसारा हळुवार भावनांचा विरहात हरविला श्याम कुणाचा धुंद पावसात तो चिंब होऊनिया पावसाच्या बनातील कळा सोसवूया 💐 लोपला जाईजुईचा बहर आज रानोरान फिरला शोधाया पहाट रात्र अमावस्येची झिंगलेली होती अस्फूट फुलविणारी ती स्वप्नमोती होती 💐 उधाणत्या वादळात आरोह आक्रोशाचे पायातील पैंजण वाजे स्वरास्वरांचे वेड्या मनात या स्त्रवली एक गीतमाला मयुरीच्या उठे पंखपिसाºयात ज्वाला 💐 मृग थेंबाची यौवन गंधीत होई धारा किरणाकिरणांतून वाहिल्या काटेरी तारा वृक्ष उन्मळुनी गेलेत या अंधारी रातीत फुललेला पिसाराही विरला पाऊसधारीत *निशिकान्त मायी* विदर्भ/मराठवाडा २२ सप्टेंबर २०१९
*प्रारब्ध* ******** नशीब आपुले कुणा  का सांगायचे?  दुःख आपुले  आपणच सोसायचे. सुख असते आपुल्या सोबती काय माहीत उद्या इथे काय घडती? देवाची किती आराधना करायची जन्म मृत्यूची मात्र तुलना नेहमी करायची? प्रारब्ध हे आपुले प्रत्येकाने भोगायचे उगाचं का त्याला दूषण द्यायचे? सुखात जगायची आस वाटायची दुःखाची मात्र तयारी नसायची. माणूस म्हणून जगायचे जमेल तितके समाधान मानायचे. जीवन मिळते एकदाचं म्हणून आपुले गुणदोष का लपवायचे? अनमोल जीवनाला सामोरे जायचे.   ✍️©® *अनिता कळसकर*   *कल्याण*
*झाड माणूसकीचं आपण* *लावू या दारी* *ममतेच्या मायेने खाऊ* *सगळे सुदाम्याची शिदोरी*.  ✍️©® *अनिता कळसकर*  *कल्याण*
*सुरुवात चारोळीने सर*😊🙏🏻🙏🏻           *कल्पनेतल्या शब्दांना* *असते खुमारी गंधाची* *जपला माणुसकीचा धागा* *गुंफूनी नाळ विश्वासाची*   ◆◆◆  *शब्दगंध* -------------- शब्द शब्द जोडताना धाग्यांनी घट्ट विणले माणुसकीच्या नात्यांत अवघे विश्व सुगंधित झाले. शब्दांना धार असावी फक्त विश्वासाची नकोत नाती ती घासलेल्या भांड्यांच्या कल्हईची. उगाचं लटका तो अट्टाहास नको परीमळाला दरवळण्यास बागेचा हवाला नको. जपली नाती किती वसा घेऊन माणूसकीची ठेव ही सोनेरी अलवार आयुष्याच्या स्वप्नांची. शब्दगंधाना सूर गवसला प्रेमाचा नवा अर्थ उमगला म्हणूनी आज शब्दगंधांनी माणूसकीचा धागा जपला.. ✍️ ©® *अनिता कळसकर*            *कल्याण*            *शुभसांज*
*जिंदगी* ***** रूठ गयी जिंदगी हमसे कबतक किनारा करें हम वक्त ने ये क्या तस्वीर बनायी जिंदादिली याद बनके रूह में समां गयी... जमाना गुजरता गया यादें गहरी आहट में उभर आयी. जिंदगी का आना और यकायक रूठ जाना दीपक किसीका बुझाकर चले जाना ... क्या उसूल है जीवन का....  तकदीर ने अरमानों को  मिटाकर रख दिया..   जिंदगी थोडा और जीना देती जीवन की नैय्या किनारे पार कर लेने देती.. सागर की गहराईयों को आगोश में भरकर समां तो जाती प्यारी जिंदगी...   ✍️©® *अनिता कलसकर*                *कल्याण*
*कफन* ●●●●●●● जिगर हमारा नाजुक था कभी ये इक जमाने की अपनी बात है। आदमी इन्सानियत खोकर जीने लगा ये इस जमाने की उसकी आदत है। पीठ दिखानेवाले अक्सर कोई बहाना बनाकर छिप जाते है। साजीशें गँवारा नही होती कभी जो मुँहपर सरेआम तमाचा मार देते है। क्या लेके जायेंगे इस जहाँसे *कफन*तो ओढकर जी लो *इन्सानियत की*।  कमसे कम जिंदगानी अपनी  कबूल फरमायेगी जन्नत के शामयाने की।     ✍️©® *अनिता कलसकर*  *कल्याण*
*पाच पानें.....*🦚 ☘ अट्टाहास इंद्रायणीचा कसा, स्वदेही अभंग जगण्याचा... वारीत अजूनही तेच, संतत्व नवे शोधण्याचा... ☘ झाले गेले ज्ञाना तुका, झाला मुका हरिपाठ... आळवूनही ओठी ओवी, अंतर्ध्यान शुष्क सपाट... ☘ राधा जगावी, मीरा बोलावी, कृष्णदेही सखी मोहरावी... विस्मृतीतल्या अहिल्येलाही, आभा रामरक्षेची मिळावी.. ☘ हरवले जरी देवत्व, माया तुझीच बरसावी... युगायुगाचे सखीत्व तुझे, चैतन्यात राधा उरावी.... ☘ यावा वसंत फुलांवी पानफूलें, देहवस्त्री सुगंध दरळवावा... आदीअनंताचा कृष्ण पावा, नाद अनाहत तन्मय व्हावा... ःःःःःःःःःःःः🌹 अशोक अर्धापुरे, औरंगाबाद 21.09.2019
*स्मृती...* 🌹 पुरे झाले बोभाटे दुःखांचे, भ्रमभोवय्रात फिरणे झाले फार.. प्राक्तनाला व्रुथा देत दोष, सुखाचे देणे झाले द्रुष्टीपार... 🌹 झेलत व्रुथा असंख्य वार, आपलेच पोसले मी फार... रंगारंगात रंग न रंगले कधी, नाटकेच रंगली येथे रंगतदार.. 🌹 तन मनात बहरुनही वसंत, पानगळच झडली दारोदार... पेटला वणवा अंगांग झेलत, शुष्कपर्णाने झेलला पाऊलभार.. 🌹 दुर वाजते धुन एकतारीची, मीरेच्या जागरा तनमना भार.. आंस न बाळगली राधेची, शोधत जगलो कृष्ण आत्म्यापार.. ःःःःःःःः अशोक अर्धापुरे, औरंगाबाद... दिनांक.. 19.09.2019
*आरसा...* ःःःःःःःःःःःःः तुकड्या तुकड्यात, तोच सूर्य.. तोच चंद्र... सजतो तोच नूर, तेच ते प्रतिबिंब... सख्या रे, तुटक्या तुटक्याही जीवात मावतो... तोच कृष्ण.. राधेचा तोच तो नेत्र चिंब.. चिंब.. ःःःःःःःःःःःःः अशोक अर्धापुरे, औरंगाबाद....
*पाच पानें.....*🦚 ☘ अट्टाहास इंद्रायणीचा कसा, स्वदेही अभंग जगण्याचा... वारीत अजूनही तेच, संतत्व नवे शोधण्याचा... ☘ झाले गेले ज्ञाना तुका, झाला मुका हरिपाठ... आळवूनही ओठी ओवी, अंतर्ध्यान शुष्क सपाट... ☘ राधा जगावी, मीरा बोलावी, कृष्णदेही सखी मोहरावी... विस्मृतीतल्या अहिल्येलाही, आभा रामरक्षेची मिळावी.. ☘ हरवले जरी देवत्व, माया तुझीच बरसावी... युगायुगाचे सखीत्व तुझे, चैतन्यात राधा उरावी.... ☘ यावा वसंत फुलांवी पानफूलें, देहवस्त्री सुगंध दरळवावा... आदीअनंताचा कृष्ण पावा, नाद अनाहत तन्मय व्हावा... ःःःःःःःःःःःः🌹 अशोक अर्धापुरे, औरंगाबाद 21.09.2019
🥁🇬‌ᴳeeᵗ🇹‌ 🕯गुंजन🥁 🎻🎸🎻🎸🎻🎸🎻      *आयुष्य कसे जगावे*     आनंद हा जीवनचा आत्मा मानला जातो, जर आपण आनंदी, ऊत्साही राहिलो तर जीवन कसे बहारदार होईल.शेवटी आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो.आपण जसा विचार करतो,जसे राहतो,तसे च आपले आयुष्य बनते.     खरे तर आयुष्य हे दोन क्षणाचे,म्रुत्यु देखील आपल्या हातात नाही, तो कधी येईल कोणी ही नाही सांगू शकत.      आपण आपल्या आयुष्यातील आनंदी क्षण आपल्या च हाताने गमावतो, पण आपण स्वतः आनंदी राहून इतरांशी ही प्रेमाने वागलो ,आनंद देण्याचा प्रयत्न केला तर या जीवनाचा आनंद दिलखुलास पणे लुटू शकू,हो ना.😊        आनंदाचा खरा शत्रू काळजी व चिंता .काही जण आपल्या आयुष्यातील क्षण काळजी, चिंता यामध्ये घालवतात,  *असे म्हणतात, "चिंता माणसाला चितेपर्यंत घेऊन जाते, न् संपवून टाकते."*  आपण आपल्याला जे आयुष्य मिळाले तो प्रत्येक क्षण हसत -खेळत ,आनंदी राहून, आनंद मानून जगायला हवा, म्हणजे म्रुत्यु ला सुद्धा आनंदाने, समाधानाने सामोरे जाऊ शकू.👍🏻        *आनंदाने जगा...
*स्मृती...* 🌹 पुरे झाले बोभाटे दुःखांचे, भ्रमभोवय्रात फिरणे झाले फार.. प्राक्तनाला व्रुथा देत दोष, सुखाचे देणे झाले द्रुष्टीपार... 🌹 झेलत व्रुथा असंख्य वार, आपलेच पोसले मी फार... रंगारंगात रंग न रंगले कधी, नाटकेच रंगली येथे रंगतदार.. 🌹 तन मनात बहरुनही वसंत, पानगळच झडली दारोदार... पेटला वणवा अंगांग झेलत, शुष्कपर्णाने झेलला पाऊलभार.. 🌹 दुर वाजते धुन एकतारीची, मीरेच्या जागरा तनमना भार.. आंस न बाळगली राधेची, शोधत जगलो कृष्ण आत्म्यापार.. ःःःःःःःः अशोक अर्धापुरे, औरंगाबाद... दिनांक.. 19.09.2019
🥁🇬‌ᴳeeᵗ🇹‌ 🕯गुंजन🥁            *शुभरात्री*     🌃🎆🌌🌃🎆🌌 आज मी एक नाही दोन गीतांसोबत शुभरात्री म्हणतोय.... आपल्या समूहातील सन्मानीय सदस्यां आणि कवयित्री सौ अनिता मॅडम यांनी मला एक कविता पाठवली ती मला आवडली म्हणून आणि मी त्यांच्या परवानगीने माझ्या आवडीच्या अनुषंगिक गीताने शुभरात्री सदर सादर करायचे ठरविले 🙏 *प्रारब्ध* ******** नशीब आपुले कुणा  का सांगायचे? दुःख आपुले आपणच सोसायचे. सुख असते आपुल्या सोबती काय माहीत उद्या इथे काय घडती? देवाची किती आराधना करायची जन्म मृत्यूची मात्र तुलना नेहमी करायची? प्रारब्ध हे आपुले प्रत्येकाने भोगायचे उगाचं का त्याला दूषण द्यायचे? सुखात जगायची आस वाटायची दुःखाची मात्र तयारी नसायची. माणूस म्हणून जगायचे जमेल तितके समाधान मानायचे. जीवन मिळते एकदाचं म्हणून आपुले गुणदोष का लपवायचे? अनमोल जीवनाला सामोरे जायचे.   ✍️©® *अनिता कळसकर*   *कल्याण* यांनी या कवितेतून दिलेला संदेश म्हणजे सुखी व आनंदी जीवन जगण्याची कला शिकवतो... खरचं जिवन क्षणभंगुर आहे, सोबत काही...
🥁🇬‌ᴳeeᵗ🇹‌ 🕯गुंजन🥁 🌲🍁🌲🍁🌲🍁🌲🍁 🌄 * एक सांज विचारांची * 🌄           ♾♾♾♾♾ * सागराला येणाऱ्या भरती ओहोटीचं अन मानवी जीवनाचे नातं फार वेगळं आहे , येणाऱ्या प्रत्येक भरतीने जीवनातील आनंद हा ओसंडून वाहू लागतो तर जेंव्हा ओहोटी येते तेंव्हा भावनांचा आवेग हा ओसरतो पण त्याचवेळी काही सुखद आठवणी अन काही बोचणारी दुःख मागे राहातात जर भरतीच्या वेळी तुमचे सत्कर्म हे ओहोटी ओसरताना मोती शंख शिंपल्याच्या सुंदर आठवणी सोडून जातात तर भरतीत तुम्ही केलेल्या चुका तुम्हाला खडतर अन कठीण काटेरी पाऊलखुणा देऊन जातात म्हणून या भरती अन ओहोटीच्या लाटांवर समजुतीने स्वार झालात तर जीवन आनंदी अन सुखमय होईल ..... * * नात्याचं जे जाळे जगण्यासाठी पूरक असते.... * * ते जीवन खुलवते * * जीवन जगवते * * जीवन सहज होते * * मनुष्य प्राणी हा समाजप्रिय प्राणी आहे तो * * नातेवाईकांशिवाय जगू शकत नाही * * म्हणून सांभाळा नात्यांचे धाग्याचे गुंफण * * ऐकूया..... * * रिश्तो का मांजा * ⏲३:३९ 🌲🍁🌲🍁🌲🍁🌲🍁 * निर्मिती मार्गदर्शन *      * प्रदीप महाजन * ...
🥁🇬‌ᴳeeᵗ🇹‌ 🕯गुंजन🥁 🌲🍁🌲🍁🌲🍁🌲🍁 🌄 * एक सांज विचारांची * 🌄           ♾♾♾♾♾ * आपण जेंव्हा st बस मध्ये प्रवास करतो तेंव्हा समजा खूप गर्दी असेल अन सीटवर आधीच माणसे बसलेली असतील तर ती लगेच तुम्हाला जागा देत नाहीत कधी कधी यातून वादही होतात पण तीच माणसे जेंव्हा थोडया वेळाने त्याच सीटवर बसण्यासाठी तुम्हाला आग्रह करतात अन सोबत बसऊन घेतात आपल्या आयुष्यात देखील असेच घडते जेंव्हा आपण नवीन ठिकाणी कामाला जातो किंवा नवीन नाती निर्माण करतो त्यावेळी त्या प्रत्येकाला थोडा वेळ द्यावा लागेल मगच तुम्ही त्याच्या मनात जागा निर्माण करू शकाल जोवर तुम्ही त्याच्या अंतरंगात डोकावणार नाही अन त्याच्या सुख दुःखात सहभागी होत नाहीत तोवर वेळ द्या .... *      * आणी नात्यांची घडी विस्कटू देऊ नका..... * * जीवनात ही घडी अशीच राहू दे.... * ⏲३:५० 🌲🍁🌲🍁🌲🍁🌲🍁 * निर्मिती मार्गदर्शन *      * प्रदीप महाजन * ♾♾♾♾♾♾♾♾ * संकल्पना आणि सादरीकरण *             ...