Skip to main content

जंगल सफारी

*जंगल सफारी*
ःःःःःःःःःःःः🌹
*अ‍ॅर्डव्हर्क*
ःःःःःःःःःःःः🌹
गाढवासारखे लांबसडक कान अन् डुकरासारखे तोंड... पण गाढव किंवा डुक्कर नसलेला अ‍ॅर्डव्हर्क नावाचा हा प्राणी गाढव-डुक्कर मिश्रित असून बेढब आकाराचा असल्याची जणू त्याला देणगीच मिळाली आहे. अ‍ॅर्डव्हर्कची पाठ कमान असल्यासारखी उंच असते. त्याच्या अंगावर पिवळ्या रंगाचे लव असून शेपटीवर एकही केस नसतो आणि हेच याचे वैशिष्ट्य ठरावे. सतराव्या शतकात अ‍ॅर्डव्हर्कचा सर्वप्रथम आफ्रिकेत शोध लागला. त्याचे आवडते खाद्य मुंग्या-वाळवी असून त्यावरच त्याचा उदरनिर्वाह चालतो. आपल्या लांब काटेरी जिभेने तो मुंग्या, किडे, वाळवी आपले लक्ष्य समजून एका दमात गटकून टाकतो. किड्या-मुंग्यांवर जगणाºया या अ‍ॅर्डव्हर्क प्राण्याचे पाय टणक व मजबूत असतात. असो. अ‍ॅर्डव्हर्क या प्राण्याकडे बघताक्षणीच एखाद्या डुकराची किंवा गाढवाची आठवण यावी, एवढे साम्य आढळून येते.
ःःःःःःःःःःःः🌹
*निशिकान्त मायी*
विदर्भ/मराठवाडा 
ःःःःःःःःःःःः🌹

Comments

Popular posts from this blog

ताण तणाव

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *वि-४* *मुक्त लिखाण* ============= *विषय-"ताण-तणाव"....✍️* 😇😔😟 *नाव- _प्रदीप महाजन_* सहकार अधिकारी श्रेणी-1 नाशिक ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬  ताण तणाव (स्ट्रेस) हा आजकाल अतिशय प्रचलित शब्द झालेला आहे, आपल्या बालपणात वडीलधाऱ्यांकडून हा शब्द फारसा ऐकायला येत नव्हता मात्र आजकाल आपण सर्वच जण असा शब्द नियमित ऐकत असतो किंवा उच्चारत असतो      मग यापूर्वी लोकांना तणाव नसायचा का? किंवा तणाव नावाचा एक प्रकारचा मानसिक आजार असेल तर हा अस्तित्वात नव्हता का? आणि असा आजार अधिक विचार केल्याने किंवा अतिरिक्त दबावामुळे निर्माण होतो तर पूर्वी दबावच नसायचा का? किंवा ती लोकं विचारच करत नव्हती का? तर असे नाही , मनुष्य म्हटला म्हणजे त्याच्या कडे मेंदू आहे, आणि वैचारिक शक्ती आहे तर मेंदू हा अवयव किंवा विचार यापूर्वी चे लोकं सुद्धा करीत असत मग त्यांना तणाव का निर्माण होत नव्हता त्याचं साधं सोपं कारण आहे बदललेली जीवन शैली       पूर्वी लोकं अंग मेहनतीचे खूप जास्त काम करायचे आणि शरीर थकल्यामुळे शांत पूर्ण झोप घेत असत म्हणून तणाव आपोआप निघून जात असे त्यात पूर्वी सकस आहार...

गुंजन काव्य

*अक्षय तृतीयेचे गीत गुंजन..* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 अक्षय गुंजन  अक्षय काव्य  अध्यात्म अक्षय  अक्षय सारं गुंजते...  अक्षय भाव  अक्षय हास्य  अक्षय गीत  अक्षय फुलवते...  अक्षय माणुसकी  अक्षय मिष्टान्न  अक्षय हालहवाल  अक्षय जपते...  अक्षय वनमैत्र  अक्षय आपलंपण  अक्षय माणुसकीने  अक्षय गोंजरते  अक्षय रंजन  अक्षय अध्यात्म  अक्षय शास्त्रीय  अक्षय आलापते...  अक्षय आनंदाचे  अक्षय देणेघेणे  अक्षय चैतन्याचे  अक्षय स्नेहाळते...  अक्षय संस्कृती  अक्षय व्रतसंकल्प  अक्षय उत्सवभाव  अक्षय निभावते...  अक्षय प्रेम  अक्षय आनंदाचे  अक्षय तृतीयेला  अक्षय मंगल दुणावते...  *अक्षय तृतीयेच्या अक्षय मंगल कामना...*  🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹 अशोक अर्धापुरे, औरंगाबाद..
*स्मरण यात्रा...*🌹  गोड त्या शब्दांचे  वेड मला लागले..  स्मरण अंतरंगी जरी,  दूरचे समीप दिसू लागले...  अर्थ त्याचा जीवाचा,  अक्षर उमटू लागले..  साक्षर साक्षात्कारात  ध्यानस्थ नवे अवतरले...  कसे ऐकावे संगित,  बासुरीत मंजुळ मावले...  ओठावर येऊनही सारे,  हृदयी अंतर्धान पावले...  वाटते एकांत महफिलीत,  श्रवण गहन करावे...  सुप्रभातीच्या प्रार्थनेला,  सूर्याला पुन्हा बोलवावे... 🌹 ............  02.01.2020 अशोक अर्धापुरे,  औरंगाबाद