*जंगल सफारी*
ःःःःःःःःःःःः🌹
*उंट*
☘
रवंथ करणारा एक चतुष्पाद प्राणी म्हणून उंटाची जात लोकप्रिय आहे. शिंगहीन असलेल्या उंटाचे मूळ स्थान मोरक्कोपासून चीनपर्यंत ९०० ते हजार मैलांचा पसरलेला विस्तृत प्रदेश आहे. असे असले, तरी आफ्रिकेपासून हिंदुस्थानपर्यंतच्या खालच्या पट्ट्यात उंटाचे वास्तव्य आहे. उंटाची वैशिष्ट्य असे की, त्याला कोणी इजा केल्यास त्याचा तो सूड उगवतो. रखरखीत वाळवंटात हुंदडणे त्याला जाम आवडते. कित्येक दिवसपर्यंत तो पाण्याविना राहू शकतो. मानवी स्वरक्षणार्थ म्हणून उंचाचाच वापर केला जातो. त्याच्या शरीरयष्टीआड बसून माणसाला ऊन-वाºयापासून सुरक्षित राहता येते. उंट जेव्हा आपले गुडघे टेकवून मान जमिनीवर लांबवून ठेवतो, तेव्हा वादळ उद्भवते व ते विषाक्तही असू शकते. वादळ बंद होईपर्यंत उंट आपल्या नाकपुड्या बंद ठेवून वाºयातील विषाक्त वायू पळवून लावण्यास मदत करीत असतो. नर उंटाची चाल ही मंद असते. मात्र मादी उंटाची चाल ही जलद असते. उंट एक अति सहनशील प्राणी असून ४० ते ५० वर्षांपर्यंत तो जगू शकतो. तथापि, उंटाचे मांस व दूध अरबी लोकांचे खाद्य आहे. आपण उंटाच्या केसांचा कुंचला, तंबू, गालिचे आणि कपडे बनविण्यासाठी वापर करू शकतो. नव्हे, उंटाचे हे केस आजही उपयोगात आणले जातात.
☘
*निशिकान्त मायी*
विदर्भ/मराठवाडा
मोबाईल 9881152439
Comments
Post a Comment