Skip to main content
*अशी पाखरे येती या मालिकेतील शेवटचा लेख प्रसारित करून २०१९ सालाचा निरोप घेतो...सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन पुन्हा एका नवीन मालिकेसाठी भेटण्याचा शब्द देतो.*


*अशी पाखरे येती*
ःःःःःःःःःःःः🌹
*काकातुआ*
ःःःःःःःःःःःः🌹
पोपटांच्या विविध जातींपैकी एक असलेला काकातुआ आॅस्ट्रेलियाचा पक्षी आहे. शुद्ध भारतीय पक्षी नसलेला हा पक्षी मात्र पुरातन काळापासून भारतातही आढळून येतो. निळे डोळे अन् लाल तुºयांचा काकातुआ पक्षिविश्वात सर्वात अधिक सुंदर पक्षी म्हणून लोकप्रिय ठरलेला आहे. जंगली पक्ष्यात गणला जाणारा हा काकातुआ पोपट पाळीव करावयाचा असल्यास भारतीय लोक त्याला लोखंडी पिंजºयात ठेवून लोखंडी रॉडवर ठेवतात. अधिक मस्ती करणारा काकातुआ पोपटाला प्रसंगी बांधूनही ठेवावे लागते. काही कालावधीनंतर तो पाळीव होतो. त्यानंतर मात्र तो मुक्तपणे घरात रुळून मुक्त विहार करतो. त्यानंतर तो पूर्णपणे पाळीव होऊन जातो. आकाराने मोठा असलेला काकातुवा पक्षी दीर्घायुषी असतो. त्याची किंमत ही त्याच्या रंगरुप आणि आकारावर ठरविली जाते. याला पाळीव करण्याचे एक विशेष आणि खास कारणही आहे आणि तेच त्याचे वैशिष्ट्य ठरावे...मुळातच पोपटाची जात असणारा काकातुआ पक्षी ज्या घरात पाळला जातो त्या घरात कोणी अज्ञात अथवा अनोळखी व्यक्ती आली आपल्यावर अन् आपल्या चाहत्यांवर संकट आल्यागत तर हा पोपट त्या व्यक्तीला पाहताच जोरजोराने ओरडू लागतो अन् सावध करतो.
ःःःःःःःःःःःः🌹
*निशिकान्त मायी*
विदर्भ/मराठवाडा 
मोबाईल 9881152439
ःःःःःःःःःःःः🌹

Comments

Popular posts from this blog

ताण तणाव

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *वि-४* *मुक्त लिखाण* ============= *विषय-"ताण-तणाव"....✍️* 😇😔😟 *नाव- _प्रदीप महाजन_* सहकार अधिकारी श्रेणी-1 नाशिक ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬  ताण तणाव (स्ट्रेस) हा आजकाल अतिशय प्रचलित शब्द झालेला आहे, आपल्या बालपणात वडीलधाऱ्यांकडून हा शब्द फारसा ऐकायला येत नव्हता मात्र आजकाल आपण सर्वच जण असा शब्द नियमित ऐकत असतो किंवा उच्चारत असतो      मग यापूर्वी लोकांना तणाव नसायचा का? किंवा तणाव नावाचा एक प्रकारचा मानसिक आजार असेल तर हा अस्तित्वात नव्हता का? आणि असा आजार अधिक विचार केल्याने किंवा अतिरिक्त दबावामुळे निर्माण होतो तर पूर्वी दबावच नसायचा का? किंवा ती लोकं विचारच करत नव्हती का? तर असे नाही , मनुष्य म्हटला म्हणजे त्याच्या कडे मेंदू आहे, आणि वैचारिक शक्ती आहे तर मेंदू हा अवयव किंवा विचार यापूर्वी चे लोकं सुद्धा करीत असत मग त्यांना तणाव का निर्माण होत नव्हता त्याचं साधं सोपं कारण आहे बदललेली जीवन शैली       पूर्वी लोकं अंग मेहनतीचे खूप जास्त काम करायचे आणि शरीर थकल्यामुळे शांत पूर्ण झोप घेत असत म्हणून तणाव आपोआप निघून जात असे त्यात पूर्वी सकस आहार...

गुंजन काव्य

*अक्षय तृतीयेचे गीत गुंजन..* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 अक्षय गुंजन  अक्षय काव्य  अध्यात्म अक्षय  अक्षय सारं गुंजते...  अक्षय भाव  अक्षय हास्य  अक्षय गीत  अक्षय फुलवते...  अक्षय माणुसकी  अक्षय मिष्टान्न  अक्षय हालहवाल  अक्षय जपते...  अक्षय वनमैत्र  अक्षय आपलंपण  अक्षय माणुसकीने  अक्षय गोंजरते  अक्षय रंजन  अक्षय अध्यात्म  अक्षय शास्त्रीय  अक्षय आलापते...  अक्षय आनंदाचे  अक्षय देणेघेणे  अक्षय चैतन्याचे  अक्षय स्नेहाळते...  अक्षय संस्कृती  अक्षय व्रतसंकल्प  अक्षय उत्सवभाव  अक्षय निभावते...  अक्षय प्रेम  अक्षय आनंदाचे  अक्षय तृतीयेला  अक्षय मंगल दुणावते...  *अक्षय तृतीयेच्या अक्षय मंगल कामना...*  🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹 अशोक अर्धापुरे, औरंगाबाद..
*स्मरण यात्रा...*🌹  गोड त्या शब्दांचे  वेड मला लागले..  स्मरण अंतरंगी जरी,  दूरचे समीप दिसू लागले...  अर्थ त्याचा जीवाचा,  अक्षर उमटू लागले..  साक्षर साक्षात्कारात  ध्यानस्थ नवे अवतरले...  कसे ऐकावे संगित,  बासुरीत मंजुळ मावले...  ओठावर येऊनही सारे,  हृदयी अंतर्धान पावले...  वाटते एकांत महफिलीत,  श्रवण गहन करावे...  सुप्रभातीच्या प्रार्थनेला,  सूर्याला पुन्हा बोलवावे... 🌹 ............  02.01.2020 अशोक अर्धापुरे,  औरंगाबाद