*जंगल सफारी*
ःःःःःःःःःःःः🌹
*अजगर*
ःःःःःःःःःःःः🌹
बोकडासारख्या अवाढव्य प्राण्याला, प्रसंगी माणसालाही गिळंकृत करणारा अजगर हा मुळात सापाची जात आहे. अजगराच्या जबड्याची रचनाच अशी आहे की, त्यांना आपल्या शरीरापेक्षा जाड्या प्राण्यालाही गिळता येईल. अजगर आपल्या शेपटीने विळखा घालून आपल्या सावजाला एखाद्या झाडाच्या फांदीस धरून ठेवतो. अजगराच्या शरीराच्या मध्यभागाच्या ठिकाणी घट्ट अन् दाबल्यासारखे आहे असे वाटते. तसेच डोक्याच्या मागील बाजूस बारीक बारीक खवले असल्याचे आढळून येते. उष्ण प्रदेशात वास्तव्य करणारा हा अजगर उष्ण प्रदेशातील समुद्रतळी अधिक प्रमाणात दिसून येतो. नरभक्षक असणारा अजगर हा प्राणी अवाढव्य बनला आहे. प्राणिसंग्रहालयात हा प्राणी बघताना मानव प्राण्याला मात्र मज्जा येते.
ःःःःःःःःःःःः🌹
*निशिकान्त मायी*
विदर्भ/मराठवाडा
मोबाईल 9881152439
Comments
Post a Comment