*प्रिय मित्र...*🌹
सरते साल सारत नव्या सालाच्या उंबरठ्यावर पावले पडू पाहताहेत.. सांप्रत वर्षांनी काय दिले याचा विचार व्हायला हवा..
वर्ष सुखाचे गेले असेल तर निश्चितच नाती जगणारी माणसे, निसर्ग, कला, संगीत, साहित्य, आणि विशेषतः मैत्र जपत जगणारे सारेच आनंद देणारे भेटले.. आमच्या संपर्कात येणारा प्रत्येक सजीव निर्जीव आपल्याला नकळत व्यापून टाकत असतो.. एक गूढ अनुभूती मनात अखंडपणे अनुभवीत होत जाते.. काय हवे काय नको ते आपण आपल्या स्वभावानुसार नकळतच घेत जातो.. अंतरंगावर कधी काव्य तर कधी शोकांतिकेचे पडसाद उमटले जातात... यातूनच आपल्याला सुंदर ते काय शोधत आनंदसोहळे साजरे करायचे असतात.. आयुष्यावर प्रेम करायला त्याशिवाय संधी मिळतही नसते.. असे प्रेम करायला गेल्या वर्षाने शिकवले..
निकटच्या जगाच्या सुखदुःखाशी जडलेलं जोडलेलं अतूट नाते मनातल्या कवीला साद घालणारे असेल तर दुरस्थावरही प्रेम करणारे असते.. जी माणसे भेटली नाही तरीही ती मनातली झाली.. व्हाट्सअप आणि फेसबुक माध्यमातून माणसे भेटत गेली आणि नकळत न पाहताच जवळची वाटायला लागली.. असे अपरिचित पैलतीरावरचे विराट खूप अदभूत आहे.. त्या विरटात काव्य, संगीत, कला सारे काही आहे.. ती अदभूत देणे जेव्हा मिळते तेव्हा होणारे आनंद हे अतुलनीयच.. हे विराट बांधून ठेवायचे मोल करायला गेल्या वर्षाने शिकवलं...
येथे देत कोणीच काही नसते.. शोधून आपले आपल्यालाच घ्यायचे असते... कारण आपले आनंद हे आपल्या अंतरंगाचे मूल्यवर्धन करणारे असतात.. आनंद देऊ शकणाऱ्या प्रसंगी आपण आपले मौल्यवान परिधान करून तत्पर असले की आनंदाचे अमाप, अपरंपार आपसूकच मिळत जाते... काही मागावे वा मिळवावे हा हेतू नसला की जे मिळते ते ऐश्वर्यच असते.. आणि हे असे ऐश्वर्यच कलात्मक भावांना संजीवन बहाल करत जाते... मला सरत्या वर्षाने असंच काही दिले...
नको हवे ते जे मिळाले ते ही काही शिकवून गेले.. माझ्या बायकोच्या पायाला झालेला अपघात सेवाभाव शिकवून गेला.. ईश्वराच्या लहरीपणातले अगम्य विचार करण्यासाठी निर्देशन करू लागले.. चिंतनशीलतेतून नवे भास आभास होऊ लागले.. होणाऱ्या जाणिवा अधिकच प्रगल्भ जाणवू लागल्या.. अपघातामुळे करावी लागणारी प्रिय पत्नीची सेवा प्रेमातले नवे अनुपम शिकवून गेली... नकळतच एक नवे revealation होऊ लागले.. आत्मिक पातळीवर एक उस्फुर्त समाधान शांत अनुभवायला मिळाले...
.... her pains focused the real Glimpse of gladden in the closely ness and through the services of oneness.. यामुळे मला रमण्याचे मोल कळले.. सरत्या वर्षाने सकारात्मकतेची नवी ओळख करून दिली..
आपल्या सर्वांच्या मैत्रपूर्ण सहभागातून जे जाणवले ते शब्दपल्याडचे आहे.. आणि ते जाणिवेतच जगावेत असेच आहेत..
येणारे वर्ष चांगलेच असेल.. आणि हो... आपण सोबतीला आहातच.. आणि आपले तर ठरलंय...
*आनंद देऊ.. आनंद घेऊ...*
*नव्या नूतन वर्षाच्या शुभेच्छा..*🌹👏🏻🌹
...........
31.12.2019
अशोक अर्धापुरे,
औरंगाबाद...
ReplyDeleteव्वा!! सुंदर!!!
अप्रतिम शब्दरचना,मनात दाटून आलेल्या भावना, चांगले वाईट अनुभव यांची अप्रतिम गुंफण अर्धापूरे सरांनी केलीय.मनाला भावनिकतेची जोड असली की,शब्द आपोआप बाहेर येतात आणि मन हलके होते
मनापासून धन्यवाद
माझ्या ह्या प्रिय परिवारानी २०१९ मध्ये मला खूप खूप प्रेम आणि आनंद दिला. खरं सांगितलं तर एका संगीत ग्रुप मधून, हा माझा परिवार कधी झाला हे कळलं च नाहीं. परिवारातील सर्व रथी आणि महारथींना २०२० च्या नवीन वर्षाचे विनम्र अभिवादन🙏
ReplyDeleteHemant Daiya
ReplyDeleteUSA