Skip to main content
*भोंडला*
🐘🐘🐘🐘🐘🐘

पर्जन्यराजाची पूजा करण्याचा भारतीय संस्कृतीमधील हा आगळीवेगळा उत्सव....
हत्ती हे वैभवाचं प्रतिक.. हत्तीच्या सोंडेतून पाणी पडल्यासारखा पाऊस झाल्यावर सगळीकडं धनधान्याची समृद्धी होते यासाठी हस्त नक्षत्राच्या पावसाची हि पूजा..
भोंडल्याचा हा सण साजरा करण्या पाठीमागे पावसाबद्दलची कृतज्ञता ,जुन्या काळातील चालीरीती ,देवदेवतांची स्तुती यांचं दर्शन घडविले जातं.
        भोंडल्याचा हा उत्सव 16 दिवस साजरा केला जातो याला हातगाही म्हणतात. हत्तीची प्रतिमा अथवा मुर्ती आणून त्याला रोज 16 दिवस रोज फुलांचा आणि 16 प्रकारच्या धान्याच्या लोम्ब्या , मक्याचे कणीस असा हार करून घातला जातो त्यातून या धान्यांची ओळख आणि त्याच महत्व लक्षात याव यासाठी ....16 वर्षांपर्यंतच्या लहान मुलींसाठीचा खर तर हा खेळ , फेर धरून गाणी म्हणायची आणि रोज एक गाणं वाढवत न्यायचं आणि 16 व्या दिवशी 16 गाणी म्हणायची भोंडल्याद्वारे पर्जन्यराजाला निरोप देताना पुढच्या वर्षी असाच वाजत गाजत ये समृद्धी आणअसं निमंत्रण हि या द्वारे दिले जाते .या गाण्यांमध्ये एक लय आणि ताल आहे त्यामुळं त्यातील गोडी आज अनेक वर्षानंतरही कायम आहे ....
संध्याकाळी हत्तीची पूजा करून त्याच्याभोवती फेर धरून गाणी म्हणायची त्यानंतर खिरापत ओळखणे हा महत्वाचा कार्यक्रम ....गाण्याप्रमाणेच खिरापतीही रोज एकएकाने वाढत जायच्या मग त्या सगळ्या खिरापती ओळखण्याची स्पर्धा खूप रंगत असे ...
आमच्या लहानपणी 16 वर्ष हा भोंडला खूप मनसोक्तपणे खेळला त्यात आमचे आजी आजोबाही अगदी उत्साहाने सहभागी व्हायचे आजोबा हत्तीचं छान चित्र काढायचे पाटावर आणि कागदावरही त्याला लागणाऱ्या धान्याच्या लोम्ब्या आणायचे आजी रोज एक नवीन न ओळखणारी खिरापत शाळेतून येण्याआधीच करून ठेवायची घरी भोंडला असला तरी आधी सांगायची नाही ...सगळ्यांबरोबर ओळखा म्हणायची ....नाही ओळखली कि ती नव्हे ...नव्हे ..इतकं छान म्हणायची कि ते ऐकायला खूप छान वाटायचं ...गाणी तर सगळी पाठच होती म्हणून म्हणून त्यावेळी जी पाठ झालीत ती अजूनही पाठ आहेत...
त्यातलंच हे एक फारसं माहिती नसलेलं पण अतिशय सुंदर अस 16 कडव्यांचं गाणं.... खास भोंडल्याचं .....ती एक गोष्टच आहे...
      पूर्वी महाभारताच्या काळात  कौरव पांडव यांच्याकडे गजगौरीच व्रत होत ते म्हणजे राणीने प्रजाजनांना हत्तीवरून वाण वाटायचं ....
       कौरवांकडे हे व्रत करताना त्यांनी मातीचा हत्ती तयार करून गंधारीला त्यावर बसवून गावात वाण वाटत होते तेव्हा कुंतीलाही ते वाण दिल तेव्हा दुर्योधन कुंतीला आणि पांडवांना टोचून बोलला त्यावर पांडवानीही चोख उत्तर दिलं आणि आपल्या मातेचा मान आणि मन कसं राखलं त्यांचं हे गाणं...

गाऊ गजगौरीच गाणं, घालू रिंगण

कौरव बांधव सर्व मिळोनी
करिती हत्ती माती आणोनि
गांधारीला वरी बसवोनी
वाटीयली वाणे...1

कुंतीला ते दिधलेवाण
दुर्योधन बोले टोचून
तुम्हास आहे नशिबी कोठून
असले या जगती....2

माता कुंती कष्टी जाहली
भीम पुसे मग येऊन जवळी
शोक कशाचा चिंता कसली
सांग सांग आई.....3

 सांगे वाणाचा वृत्तांत
भीम कोपला मग चित्तात
म्हणतो हत्ती करतो क्षणात
आला नदीतीरी...4

चिखल करी मग खळ्या खणोनी
फेकी भराभर गोळे करुनी
गेल्या वेशी सर्व बुजोनी
घडला आकांत...5

अर्जुन बोले मग भीमाला
खटाटोप हाउगीचकशाला
मागू ऐरावत इंद्राला
वाटाया वाणे.....6

बाणांचा मग जिना रचिला
भीम वरी स्वर्गात निघाला
इंद्राला वृत्तांत कळाला
झाला दुश्चित......7

 इंद्र म्हणे हे अरिष्ट आले
म्हणोनी कपट इंद्राने केले
दारच स्वर्गाचे लावीयले
आवळोनी घट्ट ....8

भीमे केला गदाप्रहार
स्वर्गाचे मोडियले द्वार
आला इंद्राजवळी वीर
बोले इंद्राला....9

भीमसेन बोले इंद्राला
गजगौरीचे व्रत आईला
ऐरावत पाहिजे आम्हाला
वाटाया वाणे.....10

इंद्र म्हणे स्वर्गीचा हत्ती
द्यावा  कैसा भूमीवरती
नेणे तरी तो कवण्या रीती
नेऊ जरी म्हटले.....11

 त्यातच आहे मत्त जाहला
धजे न कोणी धरावयाला
मगतो येईल कसातुम्हाला
न्यायला खाली....12

आधीच चिडविला होता हत्ती
धावून आला भीमावरती
गदा प्रहारे जीरवी मस्ती
भीमसेन तेव्हा......13

हत्ती पळतो ची ची करोनी
‌भीम ओढीतो सोंड धरोनी
मुटकूळ त्याचे मगबांधोनी
‌टाकीयले पाठी.......14

‌आला ऐरावत घेऊनी
‌सजवी अंबारी घालोनी
‌कुंतीला वर बसवोनी
‌वाटीयली वाणे......15

 धन्य धन्य ती कुंतीमाता
‌ स्वर्गआणिलाभूवरीआता
‌गजगौरीचे व्रत आचरीता
‌लाभे जगी कीर्ती.....16

‌असं हे 16 कडव्यांचं गाणं प्रत्येक भोंडल्याच्या वेळी आम्ही म्हणायचो
(आता सहसा हे गाणं ऐकिवात नाही तरीही नव्या पिढीला माहिती असाव म्हणून हा एक प्रयत्न)

🐘🐘🐘🐘🐘🐘
 ...सौ श्रेया गोलिवडेकर, सातारा😊🙏😊🙏
                           



‌             


‌             

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ताण तणाव

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *वि-४* *मुक्त लिखाण* ============= *विषय-"ताण-तणाव"....✍️* 😇😔😟 *नाव- _प्रदीप महाजन_* सहकार अधिकारी श्रेणी-1 नाशिक ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬  ताण तणाव (स्ट्रेस) हा आजकाल अतिशय प्रचलित शब्द झालेला आहे, आपल्या बालपणात वडीलधाऱ्यांकडून हा शब्द फारसा ऐकायला येत नव्हता मात्र आजकाल आपण सर्वच जण असा शब्द नियमित ऐकत असतो किंवा उच्चारत असतो      मग यापूर्वी लोकांना तणाव नसायचा का? किंवा तणाव नावाचा एक प्रकारचा मानसिक आजार असेल तर हा अस्तित्वात नव्हता का? आणि असा आजार अधिक विचार केल्याने किंवा अतिरिक्त दबावामुळे निर्माण होतो तर पूर्वी दबावच नसायचा का? किंवा ती लोकं विचारच करत नव्हती का? तर असे नाही , मनुष्य म्हटला म्हणजे त्याच्या कडे मेंदू आहे, आणि वैचारिक शक्ती आहे तर मेंदू हा अवयव किंवा विचार यापूर्वी चे लोकं सुद्धा करीत असत मग त्यांना तणाव का निर्माण होत नव्हता त्याचं साधं सोपं कारण आहे बदललेली जीवन शैली       पूर्वी लोकं अंग मेहनतीचे खूप जास्त काम करायचे आणि शरीर थकल्यामुळे शांत पूर्ण झोप घेत असत म्हणून तणाव आपोआप निघून जात असे त्यात पूर्वी सकस आहार...

गुंजन काव्य

*अक्षय तृतीयेचे गीत गुंजन..* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 अक्षय गुंजन  अक्षय काव्य  अध्यात्म अक्षय  अक्षय सारं गुंजते...  अक्षय भाव  अक्षय हास्य  अक्षय गीत  अक्षय फुलवते...  अक्षय माणुसकी  अक्षय मिष्टान्न  अक्षय हालहवाल  अक्षय जपते...  अक्षय वनमैत्र  अक्षय आपलंपण  अक्षय माणुसकीने  अक्षय गोंजरते  अक्षय रंजन  अक्षय अध्यात्म  अक्षय शास्त्रीय  अक्षय आलापते...  अक्षय आनंदाचे  अक्षय देणेघेणे  अक्षय चैतन्याचे  अक्षय स्नेहाळते...  अक्षय संस्कृती  अक्षय व्रतसंकल्प  अक्षय उत्सवभाव  अक्षय निभावते...  अक्षय प्रेम  अक्षय आनंदाचे  अक्षय तृतीयेला  अक्षय मंगल दुणावते...  *अक्षय तृतीयेच्या अक्षय मंगल कामना...*  🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹 अशोक अर्धापुरे, औरंगाबाद..