Skip to main content

कविता ,निशांत

*कविता*
ःःःःःःःःःःःः🌹
*निशांत*
ःःःःःःःःःःःः🌹
निशांत समयी उगवे दिनकर ।
अशांत रमणी मन कलेवर ।।

आवर हुंदक्यांचा हृदी दाटूनी येई ।
उठलं वादळ साºया घरभर ।।

वसंताशी प्रीत  जडविली छान ।
बहरला पुन्हा आज गुलमोहर ।।

दरवळतो सुगंध वसंताशी रमुनी ।
मन विव्हळले शिशिर बघुनी ।।

पावसाच्या धारा जपल्या युगाने ।।
फुलाचेही फुलले स्वप्न क्षणभर ।।
ःःःःःःःःःःःः🌹
*निशिकान्त मायी*
विदर्भ/मराठवाडा 
मोबाईल 9881152439
ःःःःःःःःःःःः🌹

Comments