*प्रेम... एक समर्पित भाव..*
स्वताःच्या जीवनावर आत्ममग्न होऊन प्रेम करण्याइतपत सुंदर या जगात कांहीच नसावे... आपला प्रियकर प्रेयसी आपल्या तच असुनही आपण त्याच्यावर प्रेम करत नाहीत तेव्हा आपण इतर कोणावर प्रेम करतो हे म्हणने वा मानने कितपत सत्य असु शकेल.. ?
प्रेम हे मुळी काही करण्याचे वा व्यक्त होण्याचे माध्यम असुच शकत नाही तर ते सत्य जगण्याचे शास्त्र आहे..ती एक आत्ममग्नता आहे.. तो स्वतःला स्वताःतच अंतर्मुख करणारा दिव्य अविष्कार आहे.. स्वतःत रमत इतरांच्या अस्तित्वाची चाहूल लागत गेली तरच ते अस्तित्व अंतरात घनीभुत होत जाते.. एक एक नातं जाणीवेतून उमजायला लागते.. यात आत्मानुरुप जे असतं ते नातं लाडीकतेचं.. ते आपल्याच अंतस्थातल्या प्रेमभावनेच्या समीपतेचे.. या समीपतेच्या जाणीवेतूनच समर्पण उमजायला लागते... माणूस प्रेम करत नाही तर आत्मानुरुप असस्तित्वाप्रति समर्पित होऊन जगण्याचा प्रयास करतो... यालाच आपण सर्सासपणे प्रेम म्हणतो.. अशा या प्रेम भावनेमुळे स्वतःवर प्रेम करायचे राहूनच जाते.. एक दिव्य उलगडण्याचे राहून जाते.. जीवन जगण्याचे राहूनच जाते...
.............
अशोक अर्धापुरे,
औरंगाबाद..।

Comments
Post a Comment