*कोजागिरी...*
पुन्हा पुन्हा
रिक्तता माझी
स्वताःत रिचवत जगतो..
मी सरत नाही..
मी उरतही नाही...
चंद्र प्रकाशात
अजूनही अगम्य प्रकटते,
ध्यानस्थ असुनही
अंतर्यामात ईश्वरीय स्पर्शते..
माझा चंद्र पूर्णत्वाचा,
प्रकाश जसा सुक्ष्मदेहातला..
तन्मय होऊन जगावे
मागू नये काही शुभ्रक्षणाला..
हे संपन्न चंद्रा...
दोन अस्तित्वांचा एक प्रकाश.
तुझ्या प्रकाशात तू शुभ्र..
तुझ्या प्रकाशात मी शुभ्र..
ःःःःःःः
अशोक अर्धापुरे,
औरंगाबाद...
पुन्हा पुन्हा
रिक्तता माझी
स्वताःत रिचवत जगतो..
मी सरत नाही..
मी उरतही नाही...
चंद्र प्रकाशात
अजूनही अगम्य प्रकटते,
ध्यानस्थ असुनही
अंतर्यामात ईश्वरीय स्पर्शते..
माझा चंद्र पूर्णत्वाचा,
प्रकाश जसा सुक्ष्मदेहातला..
तन्मय होऊन जगावे
मागू नये काही शुभ्रक्षणाला..
हे संपन्न चंद्रा...
दोन अस्तित्वांचा एक प्रकाश.
तुझ्या प्रकाशात तू शुभ्र..
तुझ्या प्रकाशात मी शुभ्र..
ःःःःःःः
अशोक अर्धापुरे,
औरंगाबाद...
Comments
Post a Comment