Skip to main content
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*प्रेमभंग... नव्हे असंपन्नता...*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मी प्रेम करतो वा तिचे माझ्यावर प्रेम आहे असे म्हणने वा मानने हा एक सुसंस्कृत हट्टाहासच वाटतो.. त्यातील वास्तव हे बहुधा ठिसुळ ठरते.. कारण आपण शोधत असलेले unbroken perfection हे बहुधा तेथे गवसलेले नसते..

त्यातल्या अपूर्णत्वाला आपण प्रसंगी 'प्रेमभंग' असे भर्जरी लावून स्वतःला विस्थापित करुन जगतो... हे विस्थापन अंतरंगातल्या कलाप्रांताचे, संगीतसभेचे, साहित्य जत्रेचे, चित्ररंगात रममाण असलेल्या रंगपुष्करणीचे आणि अशा असंख्य तरल स्रुजनात्मकतेचे असते.. कारण प्रेम या भावरंगांच्या विलसण्यातूनच या तरलतेच्या संपन्न वाटा जात असतात.. आणि अशाच वैभवी मानसिकतेला जेव्हा प्रेमभंगाचा कडवट अर्क प्राषन करावा लागतो तेव्हा निर्माण होणारे हे विस्थापित साम्राज्य एकट्याचेच असते.. एकट्यानेच ते जगावे लागते..  येथेच भैरवी आळवत विरहगीतांचे स्वर परवलीचे वाटायला लागताच.. भावनात्मक लिखाणाला, गझलेला, विरहणीला सन्मानाची जागा मिळत जाते.. इतर कोणी सहजतेने तसुभरही काढलेली भावूक छेड वर्मी लागत जाते.. अंतर्यामात उठबैस करणारे सर्वकष काहूर म्हणजे बिनचेहय्राचा तारकापूंजच बनतो.. हलक्याफुलक्या शब्दांचीही दहशत मनाने घेतलेली असते..

वाटते हे सारें शब्द घ्यावेत आणि ओहटीला समुद्रात नेऊन बुडवून टाकावेत.. भरतीला काठावर येऊन पडणारे याच बुडवलेल्या शब्दांचे छन्नविछीन्न भग्न अवषेश पहात पहातच विशाल सागराच्या  साक्षीने एकाकीपणा जगत जावा... आपल्या वाट्याला आलेले भावनिक क्रंदन, कासाविसी, तगमग हे सारे संवेदन म्हणजे आपल्या आंसवांना अंतरातच मुरवून टाकत जाते.. आणि वाटते न जाणो भोगत असलेल्या शब्द निर्माल्यातून नवे काही अंकुरेल..

हे नवे अंकुरनच कधी कधी एका वेगळ्या आनंद पायरीवर घेऊन जाते.. नवीन निर्माणाला प्रेरक ठरते... शब्दावरचे भर्जरीपण बाजूला हटत शब्दांतले निरागसत्व मनाला भुरळ घालत जाते.. आपल्या दुःखाला वैभव प्राप्त झाल्यागत आपण आपल्यातच श्रीमंत बनतो.. आपल्या साम्राज्यावर कोणालाही द्रुश्यमान न होणारे एक तरल आच्छादन मिळत जाते.. अशा वेळेस होणारा आनंद हा विलक्षण पारलौकीकतेचाच.. आणि प्रांरभ होतो तो स्वरचनेला... ही स्वरचना जितकी निस्सीम, निःसंग आणि नतळतेची तितका आपलाच आपल्यातला रहिवास हा स्वर्गसुखाचाच.. येथे ती तो नसुनही अद्रुष्य असतो.. कधी चुकलेल्या शब्दांचे अर्थ समजावत तर कधी पश्चातापातून पतीत पावन झालेल्या स्मृतीतून.. हाती नवीन असते ते उरलेले आयुष्य..

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आशोक अर्धापुरे,
औरंगाबाद..
27.09.19

Comments

Popular posts from this blog

ताण तणाव

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *वि-४* *मुक्त लिखाण* ============= *विषय-"ताण-तणाव"....✍️* 😇😔😟 *नाव- _प्रदीप महाजन_* सहकार अधिकारी श्रेणी-1 नाशिक ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬  ताण तणाव (स्ट्रेस) हा आजकाल अतिशय प्रचलित शब्द झालेला आहे, आपल्या बालपणात वडीलधाऱ्यांकडून हा शब्द फारसा ऐकायला येत नव्हता मात्र आजकाल आपण सर्वच जण असा शब्द नियमित ऐकत असतो किंवा उच्चारत असतो      मग यापूर्वी लोकांना तणाव नसायचा का? किंवा तणाव नावाचा एक प्रकारचा मानसिक आजार असेल तर हा अस्तित्वात नव्हता का? आणि असा आजार अधिक विचार केल्याने किंवा अतिरिक्त दबावामुळे निर्माण होतो तर पूर्वी दबावच नसायचा का? किंवा ती लोकं विचारच करत नव्हती का? तर असे नाही , मनुष्य म्हटला म्हणजे त्याच्या कडे मेंदू आहे, आणि वैचारिक शक्ती आहे तर मेंदू हा अवयव किंवा विचार यापूर्वी चे लोकं सुद्धा करीत असत मग त्यांना तणाव का निर्माण होत नव्हता त्याचं साधं सोपं कारण आहे बदललेली जीवन शैली       पूर्वी लोकं अंग मेहनतीचे खूप जास्त काम करायचे आणि शरीर थकल्यामुळे शांत पूर्ण झोप घेत असत म्हणून तणाव आपोआप निघून जात असे त्यात पूर्वी सकस आहार...

गुंजन काव्य

*अक्षय तृतीयेचे गीत गुंजन..* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 अक्षय गुंजन  अक्षय काव्य  अध्यात्म अक्षय  अक्षय सारं गुंजते...  अक्षय भाव  अक्षय हास्य  अक्षय गीत  अक्षय फुलवते...  अक्षय माणुसकी  अक्षय मिष्टान्न  अक्षय हालहवाल  अक्षय जपते...  अक्षय वनमैत्र  अक्षय आपलंपण  अक्षय माणुसकीने  अक्षय गोंजरते  अक्षय रंजन  अक्षय अध्यात्म  अक्षय शास्त्रीय  अक्षय आलापते...  अक्षय आनंदाचे  अक्षय देणेघेणे  अक्षय चैतन्याचे  अक्षय स्नेहाळते...  अक्षय संस्कृती  अक्षय व्रतसंकल्प  अक्षय उत्सवभाव  अक्षय निभावते...  अक्षय प्रेम  अक्षय आनंदाचे  अक्षय तृतीयेला  अक्षय मंगल दुणावते...  *अक्षय तृतीयेच्या अक्षय मंगल कामना...*  🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹 अशोक अर्धापुरे, औरंगाबाद..
*स्मरण यात्रा...*🌹  गोड त्या शब्दांचे  वेड मला लागले..  स्मरण अंतरंगी जरी,  दूरचे समीप दिसू लागले...  अर्थ त्याचा जीवाचा,  अक्षर उमटू लागले..  साक्षर साक्षात्कारात  ध्यानस्थ नवे अवतरले...  कसे ऐकावे संगित,  बासुरीत मंजुळ मावले...  ओठावर येऊनही सारे,  हृदयी अंतर्धान पावले...  वाटते एकांत महफिलीत,  श्रवण गहन करावे...  सुप्रभातीच्या प्रार्थनेला,  सूर्याला पुन्हा बोलवावे... 🌹 ............  02.01.2020 अशोक अर्धापुरे,  औरंगाबाद