ःःःःःःःःःःःः🌹
पाकोनी
ःःःःःःःःःःःः🌹
भव्य-दिव्य पंख असलेला पाकोनी पक्षी पडिक इमारतीत अंधाºया जागीच राहतात. हे पक्षी आपली घरटी बनविण्यासाठी दगड-मातीचा वापर करीत नाहीत. त्यांची घरटी ही त्यांच्याच तोंडातील लाळेपासून तयार केलेली असतात. त्या अगोदर ते सुयोग्य जागेचा शोध घेतात. त्यानंतर घरट्याच्या आकाराविषयी त्यांच्यातच विचारविमर्ष होतो. अखेर एक जागा निश्चित करून सर्व पाकोनी पक्षी एकत्र येऊन आपआपल्या तोंडातील लाळेचा वापर करून घरटं बनवितात. हीच पाकोनीची विशेषता असावी. नर आणि मादी पाकोनीत आमरण संबंध राहतात. हिवाळ्यातील थंडी असह्य झाल्याने ते दूरवरच्या प्रदेशात स्थलांतर करतात. म्हणूनच त्यांना ‘दूरदेशाचे अभ्यासार्थी’ असेही म्हणतात. आपले खाद्य शोधण्यासाठी ते कधी कधी सात-आठ मैल दूरही निघून जातात. दरतासी ६५ ते १४५ किमी वेगाने त्यांची उडण्याची क्षमता असते. उडत उडतच आकाशात किड्यांची हवाई शिकार करून स्वत:ही खातात अन् सोबतच्या आपल्या लेकरांनाही भरवतात. इतकेच नव्हे, अखंड उडत असताना पाकोनी अनेक दिवस उपाशीसुद्धा राहू शकतात. अनेक दिवस निराहारी असूनही ते राहू शकतात. जगू शकतात.
ःःःःःःःःःःःः🌹
*निशिकान्त मायी*
विदर्भ/मराठवाडा
मोबाईल 9881152439
ःःःःःःःःःःःः🌹
Comments
Post a Comment