📄 *आठवडा 135 वा*
*14 जून ते 20 जून 2020*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
*विषय क्रमांक 1*
*खरंच, व्यक्त होणं एवढं अवघड असतं का?*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
*प्रदीप महाजन🙏😊*
*वि४*
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
मानव प्राणी भावनाशील आहे, भावना प्रासंगिक असतात आणि त्या अनुरूप उत्पन्न होतात.
भावना उत्पन्न होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे मात्र त्या दाबून ठेवणे ही कृत्रिमता आहे
मनात जे आलं ते बोलून व्यक्त होणं केंव्हाही मानसशास्त्रीय दृष्ट्या चांगलं मात्र ते दाबून साठवण करणे म्हणजे एक दिवस त्याचा स्फोट होणार हे नक्कीचं
व्यक्तीची जडण घडण कशी झाली आहे, बालपणातच आघात झाले असले तरी किंवा कुठल्यातरी किंवा कोणाच्यातरी मग ते आपले किंवा समाज यांचा सुद्धा दबावात असल्यावर व्यक्त होणे अवघड होते , किंवा आत्मविश्वासाची कमी हे सुद्धा कारण असू शकते ,मग अशी लोकं व्यक्त होत नाहीत
याउलट जे बिनधास्त स्वभावाचे लोकं असतात ,जे मनमोकळे वावरतात , बोलतात ते सहज व्यक्त होतात आणि आनंदी जिवन जगतात
व्यक्त होणं अवघड नाही मात्र व्यक्त न होणारी लोकांचा तसा स्वभाव परिस्थिती नुसार तयार होतो किंवा ते करून घेतात किंवा अतिमहत्वाकांक्षा सुद्धा घातक ठरते ,यामुळे जीवन जगणे अवघड होवून बसते , मला वाटतं हा एक प्रकारचा आजार आहे, जेंव्हा व्यक्ती दबावात येतो तर त्याची मानसिक स्थिती बिघडते आणि त्याची वागणूकही सामान्य रहात नाही
व्यक्त होण्यासाठी हवं आत्मविश्वास, वाचन, लिखाण, चर्चा, गप्पा , सकारात्मक विचार, चार लोकांशी संवाद त्यांच्याशी चांगले संबंध व्यक्त होण्यासाठी आपल्याजवळ असावीत 2,4 चांगले सुसंस्कारिक विश्वासु मित्र आणि आपले छंद जोपण्यासाठी वेळ तसेच आपण कोणाच्या सानिध्यात राहतो याचा खूप परिणाम मनावर होतो चांगल्या विचारांच्या लोकांच्या सहवासात चांगलेच विचार येतील स्वतःला चांगले घडविण्यासाठी नेहमी प्रसन्न राहिले पाहिजे त्यासाठी
प्रत्येक जीवनात किंवा सभोवताली घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टींचा फार विचार करून ताण घ्यायला नको , जीवन संघर्ष मय झालं आहे, यामध्ये आपण स्वतःवर नियंत्रण ठेवायला हवे, कोणीही कोणालाही टेन्शन द्यायला नको , दुसऱ्याला दिले तरी स्वतःला सुद्धा त्रास होतो, तणाव मुक्त राहणेसाठी , संगीत ऐकायला हवे, योगा करायला हवा, सकारात्मक लेख असतील त्याचे वाचन करायला हवे, ध्यान (meditation) करायला हवे, जास्त वेदनादायक बातम्या बघायला नको, कोरोना लॉक डाऊन मुळे मानवी मनावर नाही म्हटलं तरी नकारात्मक परिणाम झालेले आहेत, काही जण खूप भीतीपोटी डिप्रेशन मध्ये जातात, भीती बाळगू नये, फक्त स्वतःची काळजी घ्यावी, नेहमी चार लोकांशी संवाद कायम ठेवावा, घरात, कार्यालयात थोडे मन हलके करायला हवे, थोड्या वैचारिक विषयावर चर्चा केली पाहिजे, गप्पा टप्पा मारत राहिलं पाहिजे ,नेहमी हसत रहायला हवे,त्यासाठी विनोद बघणे वाचत रहाणे, मन प्रसन्न राहील, सोशल मीडियावर सुद्धा चांगले सकारात्मक संदेश शेअर करणे आणि वाचणे... राजकारण आणि इतर फालतू संदेश इग्नोर करायला हवीत भक्तीसंगीत तर आवर्जून ऐकायला हवीत मग मन मोकळे प्रसन्न राहील आणि व्यक्त होणे अवघड जाणार नाही
व्यक्त होणे अवघड नाही ते आपण अवघड बनविले आहे थोडासा बदल स्वतःमध्ये करून आनंदी राहत येईल आणि आनंदित व्यक्तीचं अधिक प्रभावीपणे व्यक्त होऊ शकतो रागातील व्यक्त होण्याने मनावर विपरीत परिणाम होतो, म्हणून संयमाने कोणत्याही परिस्थितीला हाताळून आनंदी कसे राहता येईल व आपण व्यक्त होवून इतरांना आनंद कसा देता येईल याकडे लक्ष केंद्रित करायला हवे ......
♦️♦️♦️♥️♦️♦️♦️
खरं म्हंटल तर मी तर अगदी मोकळेपणाने माझ्या मनात आलेले विचार सहजपणे व्यक्त करू शकतो, त्यामुळे मनावर बिल्कुल ओझं रहात नाहीं आणि आनंदाने जगू शकतो.
ReplyDelete