Skip to main content

जंगल सफारी(उंदीर)

*जंगल सफारी*
ःःःःःःःःःःःः🌹
*उंदीर*
ःःःःःःःःःःःः🌹
विद्येची देवता श्री गणेशाचे वाहन असलेला उंदीर एक उपद्रवी प्राणी आहे. उंदराचे अनेक प्रकार जगात आढळून येतात. काही उंदीर शेतात राहतात तर काही काही आपल्या घराच्या कानाकोपºयात आढळून येतात. शेतात वास्तव्य करणारे उंदीर आकाराने लहान असतात. त्यांचा रंग पिंगट काळसर असून ते घाणेरड्या व अंधाºया जागांमध्ये सदैव निवास करतात. त्याचमुळे त्यांच्या अंगावर पिसरा दिसून येतात. या पिसवांमुळे प्लेगजंतूंचा प्रसार होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. म्हणून शेतकरी त्यांना नेस्तनाबूत करण्याचाच नेहमी प्रयत्न करीत असतो. दुसºया प्रकारतले उंदरं हे आपल्या घराच्या कानाकोपºयात नित्य आढळून येतात. घरातले धान्य खावून अन् कपडे कुरतडून ते घरातल्या लोकांना हैराण करून सोडतात. घरमालकाला त्रास देणे एवढाच त्यांचा उद्योग सतत सुरू असतो. कोणत्याही प्रकारचे तेलकट पदार्थ हे त्यांचे आवडीचे खाद्य असते. त्यांच्या उपद्रवाने आपणही त्यांना पळवून लावण्याचा सदोदित प्रयत्न करीत असतो. किंबहुना त्याला मारून नेस्तनाबूत करण्यासाठी नाना प्रकारच्या क्लृप्त्या करीत असतो. दिसेल ते सतत कुरतडत राहणे हा या उंदरांचा स्वभाव आहे. सततच्या कुरतडण्याने प्रसंगी त्यांचे दात बोथट होतात. हे बोथट झालेले दात पुन्हा धारदार करण्यासाठी ते आपले दात लाकडाच्या सामानावर घासून पाजवतात. उंदरिण अर्थात मादी प्रकारातील उंदीर दर महिन्यात एकाच वेळी १० ते १२ पिलांना जन्म देते. त्यामुळे उंदरांचा झपाट्याने सुळसुळाट झाल्यास अन् आपल्या घरातले उंदरांची संख्या वाढल्यास नवल वाटू नये.
ःःःःःःःःःःःः🌹
*निशिकान्त मायी*
विदर्भ/मराठवाडा 
मोबाईल 9881152439
ःःःःःःःःःःःः🌹

Comments

Popular posts from this blog

ताण तणाव

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *वि-४* *मुक्त लिखाण* ============= *विषय-"ताण-तणाव"....✍️* 😇😔😟 *नाव- _प्रदीप महाजन_* सहकार अधिकारी श्रेणी-1 नाशिक ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬  ताण तणाव (स्ट्रेस) हा आजकाल अतिशय प्रचलित शब्द झालेला आहे, आपल्या बालपणात वडीलधाऱ्यांकडून हा शब्द फारसा ऐकायला येत नव्हता मात्र आजकाल आपण सर्वच जण असा शब्द नियमित ऐकत असतो किंवा उच्चारत असतो      मग यापूर्वी लोकांना तणाव नसायचा का? किंवा तणाव नावाचा एक प्रकारचा मानसिक आजार असेल तर हा अस्तित्वात नव्हता का? आणि असा आजार अधिक विचार केल्याने किंवा अतिरिक्त दबावामुळे निर्माण होतो तर पूर्वी दबावच नसायचा का? किंवा ती लोकं विचारच करत नव्हती का? तर असे नाही , मनुष्य म्हटला म्हणजे त्याच्या कडे मेंदू आहे, आणि वैचारिक शक्ती आहे तर मेंदू हा अवयव किंवा विचार यापूर्वी चे लोकं सुद्धा करीत असत मग त्यांना तणाव का निर्माण होत नव्हता त्याचं साधं सोपं कारण आहे बदललेली जीवन शैली       पूर्वी लोकं अंग मेहनतीचे खूप जास्त काम करायचे आणि शरीर थकल्यामुळे शांत पूर्ण झोप घेत असत म्हणून तणाव आपोआप निघून जात असे त्यात पूर्वी सकस आहार...

गुंजन काव्य

*अक्षय तृतीयेचे गीत गुंजन..* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 अक्षय गुंजन  अक्षय काव्य  अध्यात्म अक्षय  अक्षय सारं गुंजते...  अक्षय भाव  अक्षय हास्य  अक्षय गीत  अक्षय फुलवते...  अक्षय माणुसकी  अक्षय मिष्टान्न  अक्षय हालहवाल  अक्षय जपते...  अक्षय वनमैत्र  अक्षय आपलंपण  अक्षय माणुसकीने  अक्षय गोंजरते  अक्षय रंजन  अक्षय अध्यात्म  अक्षय शास्त्रीय  अक्षय आलापते...  अक्षय आनंदाचे  अक्षय देणेघेणे  अक्षय चैतन्याचे  अक्षय स्नेहाळते...  अक्षय संस्कृती  अक्षय व्रतसंकल्प  अक्षय उत्सवभाव  अक्षय निभावते...  अक्षय प्रेम  अक्षय आनंदाचे  अक्षय तृतीयेला  अक्षय मंगल दुणावते...  *अक्षय तृतीयेच्या अक्षय मंगल कामना...*  🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹 अशोक अर्धापुरे, औरंगाबाद..
*स्मरण यात्रा...*🌹  गोड त्या शब्दांचे  वेड मला लागले..  स्मरण अंतरंगी जरी,  दूरचे समीप दिसू लागले...  अर्थ त्याचा जीवाचा,  अक्षर उमटू लागले..  साक्षर साक्षात्कारात  ध्यानस्थ नवे अवतरले...  कसे ऐकावे संगित,  बासुरीत मंजुळ मावले...  ओठावर येऊनही सारे,  हृदयी अंतर्धान पावले...  वाटते एकांत महफिलीत,  श्रवण गहन करावे...  सुप्रभातीच्या प्रार्थनेला,  सूर्याला पुन्हा बोलवावे... 🌹 ............  02.01.2020 अशोक अर्धापुरे,  औरंगाबाद