*अशी पाखरे येती*
ःःःःःःःःःःःः🌹
*कस्तुरा*
ःःःःःःःःःःःः🌹
ऊन्ह बिलकूल सहन न करू शकणारं कस्तुरा नामक पाखरू उन्हाळ्यात पहाडाच्या खाली उतरत नाही. सुमारे ८ ते १० हजार फूट उंचच उंच ठिकाणी विहार करीत राहते अन् हिवाळ्याची शीतल पवन सुरू होताच आपल्या देशात, राज्यात, शहरात प्रवेश करते. पहाडाच्या नदीकिनारी विहार करून किडे-कृमी, छोटे-छोटे जीवजंतू सेवन करून कस्तुरा आपलं पोट भरते. किकिळेसारखी कस्तुराही उत्तम गायिका असून उष:काली ती गायला प्रारंभ करते. ३० सेंटीमीटरची हा पक्षी निळ्या रंगात आढळून येतो. निळा रंग चमक निर्माण करतो. दक्षिण भारतातील कस्तुरा आकाराने छोटी असून तिची चोच काळ्या रंगाची असते. कस्तुरा या पक्ष्याचा आणखी एक प्रकार अस्तित्वात आहे. त्याचा रंग मात्र कत्था आतो. या प्रकारातल्या पक्ष्याची विशेषता म्हणजे तो वारंवार आपली शेपटी फैलावून विहार करीत असतो. पर्वत खाडीवरील कृष्णसार नाभीमधून टपकणाºया कस्तुरीचं भक्षण करीत असल्याने या पाखराचं नाव कस्तुरा असं पडलं असावं.
ःःःःःःःःःःःः🌹
*निशिकान्त मायी*
विदर्भ/मराठवाडा
मोबाईल 9881152439
Comments
Post a Comment