*जंगल सफारी*
ःःःःःःःःःःःः🌹
*काळ्या तोंडाचे माकड*
☘☘
हुऽपऽऽहुऽपऽऽ करीत एका झाडावरून दुसºया झाडावर कोलांटउड्या घेणारे वानर एक उपद्रवी प्राणी म्हणून प्रचलित आहे. त्यातही विविध जाती आढळून येतात. अशाच जातींपैकी काळ्या तोंडाच्या माकडांची एक जात आहे. त्यांना ‘तामरिन वानर’ असे म्हटले जाते. ब्राझीलच्या तटवर्ती सुपरागई द्वीप समुद्रात हे प्राणी आढळून येतात. तामरिन वानर माणसाला भिणारे तसेच लाजाळू असतात. या वानरांचा लाजाळूपणा इतका असतो की माणसांना ते फोटोही काढू देत नाहीत. नव्हे, कोणी फोटो काढत असताना ते अक्षरश: लाजतातही. खारीप्रमाणे लांब असणारे तामरिन माकड सामान्य माकडासारखेच दिसत असले, वागत असले तरी प्राणिविश्वातले ते एक आश्चर्य ठरले आहे. सुपरागुई हे जंगल अतिशय दाट अरण्य असून जंगलाधिकाºयांनासुद्धा या माकडांचे दर्शन दुर्लभ ठरले आहे. सुपरागुईशिवाय अॅटलांटिक जंगलात, कॅलिफोर्नियाच्या मध्यवर्ती क्षेत्रात आणि दक्षिण अमेरिकेच्या जंगलात त्यांचे प्रामुख्याने वास्तव्य आढळून येते. परंतु मानवाच्या भीतीने व आपल्या लाजाळू स्वभावाने ते समोर येण्यास धजावत नाहीत. म्हणूनच त्यांचे छायाचित्रही मिळणे कठीण ठरते. सुपरागुई बेटात काही वर्षांअगोदर जंगल निरीक्षकांना एक डझनहून अधिक तामरिन माकडं नाचता-बागडताना दिसले असल्याचा इतिहास सांगतो. त्यावेळी काढण्यात आलेली काही छायाचित्रे ‘पोर्टेट विज्ञान जगत’समोर सादर करण्यात आली होती. याच फोटोंवरून या काळ्या तोंडाच्या वानरांची वस्ती असल्याचे निष्पन्न झाले होते. परिणामी वन्यजीवविश्वात आश्चर्याची लहर उमटली होती. काळ्या तोंडाच्या माकडात आणि इतरेतर वानरात एक साम्य आहे...ते म्हणजे...ही दोन्हीही माकडं ‘रामदूत’ आहेत, हेही नसे थोडके...!
☘
*निशिकान्त मायी*
विदर्भ/मराठवाडा
मोबाईल 9881152439
Comments
Post a Comment