Skip to main content

जंगल सफारी (रानडुक्कर)

*जंगल सफारी*

*रानडुक्कर*

उकिरड्यावर चरणारे डुकरंच आपल्याला माहिती आहेत. पण त्याही पलीकडे अनेक जाती डुकरांच्या आहेत. त्यापैकीच एक आहे रानडुक्कर. साधारणपणे जंगलात आढळून येणाºया या प्रकारातील डुकरं विभिन्न आकारात दिसून येतात. अंदमान टापूच्या जंगलात या रानडुकरांचं वास्तव्य अधिक प्रमाणात आढळून येते. मात्र अंदमान टापूत असलेले ही डुकरं भारतभूवर आढळून येणाºया सर्व डुकरांच्या जातींमध्ये लहान असते. ५१ ते ५२ सें.मी.पर्यंत ही उंची त्यांच्या शेपटीसहीत असते. मात्र त्याच्या लांबीकडे बघितल्यास डोक्यापासून शेपटीपर्यंत एक लांब आकाराचा पिंडाच असल्याचा भास होतो. रानात राहणारी ही डुकरं अधूनमधून शेतशिवारातही भ्रमण करताना दिसून येतात. असे म्हणतात की, प्रशांत महासागराच्या छोट्या प्रदेशातील लोकांचं खाद्य हे रानडुकरंच असतात. तेथील लोक कोंबडीसारखे रानडुकरं पाळतात. ते पाळीव झाल्यानंतरच त्यांच्यावर ताव मारला जातो. एकेकाळी साहसी राजपुत्र रानडुकरांची शिकार करायचेत. यामुळे दिवसेंदिवस त्यांची संख्या घटत असून आज हीच रानडुकरं केवळ प्राणिसंग्रहालयांची शोभा बनून राहिली आहेत. आपल्याकडे वास्तव्य करीत असलेल्या डुकरांच्या केसांचा ब्रश बनविण्यासाठी वापर केला जातो, पण रानडुकरांचे भुºया रंगांचे केस जाळण्याची प्रथा रुढ आहे. अशाप्रकारे केस जाळणे हे पारंपरिकदृष्ट्या स्वास्थ्यप्रद समजले जाते. गावात आढळून येणाºया डुकरांप्रमाणेच याही रानडुकरांचे आवडते खाद्य अर्थातच उकिरड्यावरील ‘पक्वान्न’ असते...

*निशिकान्त मायी*
विदर्भ/मराठवाडा 
मोबाईल 9881152439

Comments

Popular posts from this blog

*भोंडला* 🐘🐘🐘🐘🐘🐘 पर्जन्यराजाची पूजा करण्याचा भारतीय संस्कृतीमधील हा आगळीवेगळा उत्सव.... हत्ती हे वैभवाचं प्रतिक.. हत्तीच्या सोंडेतून पाणी पडल्यासारखा पाऊस झाल्यावर सगळीकडं धनधान्याची समृद्धी होते यासाठी हस्त नक्षत्राच्या पावसाची हि पूजा.. भोंडल्याचा हा सण साजरा करण्या पाठीमागे पावसाबद्दलची कृतज्ञता ,जुन्या काळातील चालीरीती ,देवदेवतांची स्तुती यांचं दर्शन घडविले जातं.         भोंडल्याचा हा उत्सव 16 दिवस साजरा केला जातो याला हातगाही म्हणतात. हत्तीची प्रतिमा अथवा मुर्ती आणून त्याला रोज 16 दिवस रोज फुलांचा आणि 16 प्रकारच्या धान्याच्या लोम्ब्या , मक्याचे कणीस असा हार करून घातला जातो त्यातून या धान्यांची ओळख आणि त्याच महत्व लक्षात याव यासाठी ....16 वर्षांपर्यंतच्या लहान मुलींसाठीचा खर तर हा खेळ , फेर धरून गाणी म्हणायची आणि रोज एक गाणं वाढवत न्यायचं आणि 16 व्या दिवशी 16 गाणी म्हणायची भोंडल्याद्वारे पर्जन्यराजाला निरोप देताना पुढच्या वर्षी असाच वाजत गाजत ये समृद्धी आणअसं निमंत्रण हि या द्वारे दिले जाते .या गाण्यांमध्ये एक लय आणि ताल आहे त्यामुळं त्यातील गोडी आज अ...

ताण तणाव

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *वि-४* *मुक्त लिखाण* ============= *विषय-"ताण-तणाव"....✍️* 😇😔😟 *नाव- _प्रदीप महाजन_* सहकार अधिकारी श्रेणी-1 नाशिक ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬  ताण तणाव (स्ट्रेस) हा आजकाल अतिशय प्रचलित शब्द झालेला आहे, आपल्या बालपणात वडीलधाऱ्यांकडून हा शब्द फारसा ऐकायला येत नव्हता मात्र आजकाल आपण सर्वच जण असा शब्द नियमित ऐकत असतो किंवा उच्चारत असतो      मग यापूर्वी लोकांना तणाव नसायचा का? किंवा तणाव नावाचा एक प्रकारचा मानसिक आजार असेल तर हा अस्तित्वात नव्हता का? आणि असा आजार अधिक विचार केल्याने किंवा अतिरिक्त दबावामुळे निर्माण होतो तर पूर्वी दबावच नसायचा का? किंवा ती लोकं विचारच करत नव्हती का? तर असे नाही , मनुष्य म्हटला म्हणजे त्याच्या कडे मेंदू आहे, आणि वैचारिक शक्ती आहे तर मेंदू हा अवयव किंवा विचार यापूर्वी चे लोकं सुद्धा करीत असत मग त्यांना तणाव का निर्माण होत नव्हता त्याचं साधं सोपं कारण आहे बदललेली जीवन शैली       पूर्वी लोकं अंग मेहनतीचे खूप जास्त काम करायचे आणि शरीर थकल्यामुळे शांत पूर्ण झोप घेत असत म्हणून तणाव आपोआप निघून जात असे त्यात पूर्वी सकस आहार...

गुंजन काव्य

*अक्षय तृतीयेचे गीत गुंजन..* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 अक्षय गुंजन  अक्षय काव्य  अध्यात्म अक्षय  अक्षय सारं गुंजते...  अक्षय भाव  अक्षय हास्य  अक्षय गीत  अक्षय फुलवते...  अक्षय माणुसकी  अक्षय मिष्टान्न  अक्षय हालहवाल  अक्षय जपते...  अक्षय वनमैत्र  अक्षय आपलंपण  अक्षय माणुसकीने  अक्षय गोंजरते  अक्षय रंजन  अक्षय अध्यात्म  अक्षय शास्त्रीय  अक्षय आलापते...  अक्षय आनंदाचे  अक्षय देणेघेणे  अक्षय चैतन्याचे  अक्षय स्नेहाळते...  अक्षय संस्कृती  अक्षय व्रतसंकल्प  अक्षय उत्सवभाव  अक्षय निभावते...  अक्षय प्रेम  अक्षय आनंदाचे  अक्षय तृतीयेला  अक्षय मंगल दुणावते...  *अक्षय तृतीयेच्या अक्षय मंगल कामना...*  🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹 अशोक अर्धापुरे, औरंगाबाद..