Skip to main content

जंगल सफारी (ससा)

*जंगल सफारी*
ःःःःःःःःःःःः🌹
*ससा*
ःःःःःःःःःःःः🌹
सश्याने काहीतरी घोर अपराध केला अन् शिक्षा म्हणून देवाने त्याचे कान ओढले. परिणामी सश्याचे कान लांब झाले, अशी आख्यायिका ऐकिवात आहे. म्हणूनच आजही कुणाकडून काही अपराध झाला तर ज्येष्ठ लोक लहान्यांचे कान धरून त्याला एक प्रकारे शिक्षाच दिली जाते. ससा आहेही खोडकर प्राणी, पण तेवढाच भित्राही आहे. हेअर आणि रॅबीट असे दोन प्रकार ससा या चिमुकल्या प्राण्याचे आहेत. हेअर जातीच्या सश्याचे कान व मागील पाय रॅबीट सश्यापेक्षा लांबीने मोठे असतात. हेअर आपली पिले गवतात प्रसवतात. जन्मत:च त्यांच्या अंगावर मऊसे केस असतात व डोळे उघडे असतात. तर, रॅबीट मातीत बिळे खोदून पिलांना जन्म देतात. साधारणपणे एका महिन्यानंतर ते पळू लागतात व स्वत:चं खाद्य स्वत:च आणून आपला उदरनिर्वाह करतात. पूर्णपणे वाढलेल्या सश्याचे डोके व शरीर मिळून लांबी ४० ते ४५ सेंमी तर वजन २ ते ३ किलोचे असते. सश्यांच्या जाती-जातींमध्येही फरक आढळून येतो. त्यांच्या अंगावरील केस थोडे कडक व खरबडीत असतात. अंगाचा रंग तांबट मातकट असून त्यात थोडा काळसर रंग पसरल्यागत वाटतो. शेपटी तांबडी पण टोकावर काळसर दिसते. पोटाकडील भाग मात्र शुभ्र असतो. मोठमोठी झुडपे असलेली ठिकाणे तसेच लागवडीच्या जागा असणाºया जंगलातील प्रदेश अशा ठिकाणी सश्यांना राहावयास आवडते. आपल्याकडे मुख्यत: खेडोपाडी व लागवडीखालच्या प्रदेशात ते दिसून येतात. उन्हाळ्यात जंगलातील गवत सुकून जाते, अशावेळी ससे गवताच्या शोधार्थ रस्त्याच्या कडेला वा गावात प्रवेशतात. मात्र भूक लागेल तेव्हाच ते बाहेर फिरताना दिसून येतात. मग ती वेळ दिवसाची असो वा रात्रीची. उन्हात त्यांना ऊब हवी असते म्हणून ते गवतात खळा करून विश्राम करतात. आॅक्टोबर ते फेब्रुवारी हा सश्यांच्या प्रसवतेचा काळ असतो. गर्भधारणेचा हा काळ साधारणपणे एक महिन्याचा असतो. एका वेळेला एक-दोनच पिले ते देतात. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे हीच पिले जन्मल्यावर पाच-सहा महिन्यात प्रसवतात. परिणामी त्यांची संख्या लगेच वाढते. कोल्हे, मुंगूस, रानमांजरे व कुत्रे हे प्राणी सश्यांचे ‘जानी दुश्मन’ आहेत. त्यांच्यापासून दूर पळण्यासाठी ते गुपचूप खाचाखळग्यात दडून बसतात. तथापि, ससा हा एक पाळीव प्राणी असून त्याचा उपद्रवही हवाहवासा वाटतो. बालकांचा मित्र म्हणून ससा परिचित आहे. बहुतांश घरात त्याचं वास्तव्य असते. भित्रा वाटत असला तरी पाळण्यासाठी मात्र तो जबरदस्त आहे. असे असले, तरी इसापनीतीच्या कथेनुसार धावण्याच्या शर्यतीत कासवच बाजी मारून गेला अन् ससा शर्यत हरला. 
ःःःःःःःःःःःः🌹
*निशिकान्त मायी*
विदर्भ/मराठवाडा 
मोबाईल 9881152439
ःःःःःःःःःःःः

Comments

Popular posts from this blog

ताण तणाव

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *वि-४* *मुक्त लिखाण* ============= *विषय-"ताण-तणाव"....✍️* 😇😔😟 *नाव- _प्रदीप महाजन_* सहकार अधिकारी श्रेणी-1 नाशिक ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬  ताण तणाव (स्ट्रेस) हा आजकाल अतिशय प्रचलित शब्द झालेला आहे, आपल्या बालपणात वडीलधाऱ्यांकडून हा शब्द फारसा ऐकायला येत नव्हता मात्र आजकाल आपण सर्वच जण असा शब्द नियमित ऐकत असतो किंवा उच्चारत असतो      मग यापूर्वी लोकांना तणाव नसायचा का? किंवा तणाव नावाचा एक प्रकारचा मानसिक आजार असेल तर हा अस्तित्वात नव्हता का? आणि असा आजार अधिक विचार केल्याने किंवा अतिरिक्त दबावामुळे निर्माण होतो तर पूर्वी दबावच नसायचा का? किंवा ती लोकं विचारच करत नव्हती का? तर असे नाही , मनुष्य म्हटला म्हणजे त्याच्या कडे मेंदू आहे, आणि वैचारिक शक्ती आहे तर मेंदू हा अवयव किंवा विचार यापूर्वी चे लोकं सुद्धा करीत असत मग त्यांना तणाव का निर्माण होत नव्हता त्याचं साधं सोपं कारण आहे बदललेली जीवन शैली       पूर्वी लोकं अंग मेहनतीचे खूप जास्त काम करायचे आणि शरीर थकल्यामुळे शांत पूर्ण झोप घेत असत म्हणून तणाव आपोआप निघून जात असे त्यात पूर्वी सकस आहार...

गुंजन काव्य

*अक्षय तृतीयेचे गीत गुंजन..* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 अक्षय गुंजन  अक्षय काव्य  अध्यात्म अक्षय  अक्षय सारं गुंजते...  अक्षय भाव  अक्षय हास्य  अक्षय गीत  अक्षय फुलवते...  अक्षय माणुसकी  अक्षय मिष्टान्न  अक्षय हालहवाल  अक्षय जपते...  अक्षय वनमैत्र  अक्षय आपलंपण  अक्षय माणुसकीने  अक्षय गोंजरते  अक्षय रंजन  अक्षय अध्यात्म  अक्षय शास्त्रीय  अक्षय आलापते...  अक्षय आनंदाचे  अक्षय देणेघेणे  अक्षय चैतन्याचे  अक्षय स्नेहाळते...  अक्षय संस्कृती  अक्षय व्रतसंकल्प  अक्षय उत्सवभाव  अक्षय निभावते...  अक्षय प्रेम  अक्षय आनंदाचे  अक्षय तृतीयेला  अक्षय मंगल दुणावते...  *अक्षय तृतीयेच्या अक्षय मंगल कामना...*  🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹 अशोक अर्धापुरे, औरंगाबाद..
*स्मरण यात्रा...*🌹  गोड त्या शब्दांचे  वेड मला लागले..  स्मरण अंतरंगी जरी,  दूरचे समीप दिसू लागले...  अर्थ त्याचा जीवाचा,  अक्षर उमटू लागले..  साक्षर साक्षात्कारात  ध्यानस्थ नवे अवतरले...  कसे ऐकावे संगित,  बासुरीत मंजुळ मावले...  ओठावर येऊनही सारे,  हृदयी अंतर्धान पावले...  वाटते एकांत महफिलीत,  श्रवण गहन करावे...  सुप्रभातीच्या प्रार्थनेला,  सूर्याला पुन्हा बोलवावे... 🌹 ............  02.01.2020 अशोक अर्धापुरे,  औरंगाबाद