*जंगल सफारी*
ःःःःःःःःःःःः🌹
*लकडबग्घा*
ःःःःःःःःःःःः🌹
मांजर म्याँवऽम्याँवऽऽ करते तर कुत्रा भोऽभोऽऽ करतो. ओळखा पाहू... मांजर अन् कुत्रा मिश्रित हा लकडबग्घा नामक प्राणी कोणता आवाज असेल? मी सांगतो... लकडबग्घा नावाचा हा विचित्र प्राणी ना म्याँवऽम्याँव करतो, ना भोऽभोऽऽ. तो तर चक्क हसतो...! लकडबग्घाला जेव्हा केव्हा कोणाला बोलवायचे असते किंवा जेवण करायचे असते तेव्हा तो जोरजोराने हसतो अन् हसता हसताच आपल्या त्या सावजाच्या चारही बाजूंनी गिरकी घेऊन जणू नृत्यच करीत आहे की काय, असे सहज वाटून जाते. कुत्र्याच्या पायासारखे पाय अन् मांजरीसारखे त्याचे शरीर असते. मात्र त्यात ना मांजरीसारखी मृदुता अन् सुंदरता असते, ना कुत्र्याप्रमाणे प्रामाणिक असतो. लकडबग्घा प्राण्याचे कान छोटे अन् डोकं भरभक्कम असते. मागील पाय जाडे, पण आखूड असल्याने शरीराचा मागील भाग खाली झुकलेला दिसून येतो. संपूर्ण जंगली प्राणी असणारा लकडबग्घाची उंची ९० सेंमी, लांबी १५० सेंमी असून शरीरावर खाकी रंगाचे तर पायावर काळ्या रंगाचे पट्टे असतात. त्याचे वैशिष्ट्य असे की, त्याला जोरदार भूक लागली तरी तो शिकार करीत नाही. उलटपक्षी दुसºया प्राण्यांनी केलेल्या शिकारीचे जे अंश बाकी असतील, त्याच उष्ट्या तुकड्यांवर ताव मारून तो आपली भूक भागवितो. अतिशय भित्रा असलेला हा प्राणी मानवापासून कोसोदूर राहतो. त्याचे कारणही तसेच आहे. असे म्हणतात...लकडबग्घाला नुकत्याच जन्मलेल्या बाळाचं प्रचंड आकर्षण असते. म्हणूनच तो मानव जातीपासून दूर असणेच हितावह असल्याचे म्हटले जाते.
ःःःःःःःःःःःः🌹
*निशिकान्त मायी*
विदर्भ/मराठवाडा
मोबाईल 9881152439
Comments
Post a Comment