Skip to main content
🥁🇬‌ᴳeeᵗ🇹‌ 🕯गुंजन🥁
🎻🎸🎻🎸🎻🎸🎻

     *आयुष्य कसे जगावे*

    आनंद हा जीवनचा आत्मा मानला जातो, जर आपण आनंदी, ऊत्साही राहिलो तर जीवन कसे बहारदार होईल.शेवटी आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो.आपण जसा विचार करतो,जसे राहतो,तसे च आपले आयुष्य बनते.
    खरे तर आयुष्य हे दोन क्षणाचे,म्रुत्यु देखील आपल्या हातात नाही, तो कधी येईल कोणी ही नाही सांगू शकत.
     आपण आपल्या आयुष्यातील आनंदी क्षण आपल्या च हाताने गमावतो, पण आपण स्वतः आनंदी राहून इतरांशी ही प्रेमाने वागलो ,आनंद देण्याचा प्रयत्न केला तर या जीवनाचा आनंद दिलखुलास पणे लुटू शकू,हो ना.😊
       आनंदाचा खरा शत्रू काळजी व चिंता .काही जण आपल्या आयुष्यातील क्षण काळजी, चिंता यामध्ये घालवतात,  *असे म्हणतात, "चिंता माणसाला चितेपर्यंत घेऊन जाते, न् संपवून टाकते."*  आपण आपल्याला जे आयुष्य मिळाले तो प्रत्येक क्षण हसत -खेळत ,आनंदी राहून, आनंद मानून जगायला हवा, म्हणजे म्रुत्यु ला सुद्धा आनंदाने, समाधानाने सामोरे जाऊ शकू.👍🏻
       *आनंदाने जगायचं असेल तर आजुबाजुच्या वातावरणाशी ,इतरांशी ही  जुळवून घेता आले पाहिजे. त्यासाठी आपल्या ला चांगल्या सवयी, सत्य आणि प्रामाणिक आचरण हवे,सुर्याच्या प्रकाशासारखे .* असत्य ,खोटेपणामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, संकटात सापडतो,समोरच्या च्या नजरेतून उतरतो.आणि या गोष्टींचा परिणाम मनावर होतो,अन् दुःखी होतो.
      आपले विचार ही सकारात्मक असतील तर आपण कोणत्याही गोष्टी मधे कमतरता पाहत नाही, तेथे देखील काही तरी चांगले ण विचार करून समाधानी राहू शकतो. त्यामुळे आपण आपल्या कार्यात यश मिळवू शकतो, न् हे  यश क्षणोक्षणी आपला आत्मविश्वास ही वाढवितात.
    जीवनात वेळ ही महत्त्वाची, वेळेचे नियोजन असेल तर आपली बरीचशी कामे वेळेत होतात, न् आफण प्रगती मिळवू शकतो.
      *जर आनंदी रहाल तर प्रगती कराल,दुःखी रहाल तर दुःखाच्या खोल अंधारात बुडून जाल.* 
       *आपण आपले आयुष्य कसे घालवायचे, सुखात की दुःखात हे सर्वस्वी आपल्या च हातात आहे.*
         म्हणून 
*इतरांवर  प्रेम करा,म्हणजे प्रेम मिळेल,*
*इतरांना समाधानी ठेवा ते ही तुम्हाला समाधानी ठेवतील,*
*इतरांचा आनंद बना, ते ही तुमचा आनंद नक्की च होतील👍🏻😊.*

थोडक्यात , काय आपले आयुष्य कसे आहे ,ते कसे जगावे हे पुढील काही गीता तील बोल  सांगतात......👇🏻👇🏻
*जिंदगी हसने गाने के लिए है पल दो पल*
*इसे खोना नहीं, खो के रोना नहीं*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*जिंदगी एक सफर है सुहाना*
*यहां कल क्या हो किसने जाना*
😊😊😊😊😊😊😊😊

*जिंदगी की यही रीत है*
*हार के बाद ही जीत है*
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

*जिंदगी हर कदम एक नयी जंग है*
◆◆◆◆●●●◆◆◆●●●◆◆◆◆
 म्हणून,
*जीवनगाणे गातच रहावे,*
*झाले गेले विसरून जावे*
*पुढे पुढे चालावे*

*जीवन खुप सुंदर आहे*👍🏻😊
*ते प्रत्येक क्षण आनंदी राहून जगा,*
*प्रत्येक गोष्टीत आनंद शोधा,समाधानी रहा👍🏻*
*येणाऱ्या संकटांना हसत,निडरपणे सामोरे जा.*
*सकारात्मक विचाराने जगा.*
*स्वतः  आनंदी रहा, इतरांना आनंद द्या👍🏻😊🌹*

*लेखिका सौ सीमा जाधव*

Comments

Popular posts from this blog

ताण तणाव

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *वि-४* *मुक्त लिखाण* ============= *विषय-"ताण-तणाव"....✍️* 😇😔😟 *नाव- _प्रदीप महाजन_* सहकार अधिकारी श्रेणी-1 नाशिक ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬  ताण तणाव (स्ट्रेस) हा आजकाल अतिशय प्रचलित शब्द झालेला आहे, आपल्या बालपणात वडीलधाऱ्यांकडून हा शब्द फारसा ऐकायला येत नव्हता मात्र आजकाल आपण सर्वच जण असा शब्द नियमित ऐकत असतो किंवा उच्चारत असतो      मग यापूर्वी लोकांना तणाव नसायचा का? किंवा तणाव नावाचा एक प्रकारचा मानसिक आजार असेल तर हा अस्तित्वात नव्हता का? आणि असा आजार अधिक विचार केल्याने किंवा अतिरिक्त दबावामुळे निर्माण होतो तर पूर्वी दबावच नसायचा का? किंवा ती लोकं विचारच करत नव्हती का? तर असे नाही , मनुष्य म्हटला म्हणजे त्याच्या कडे मेंदू आहे, आणि वैचारिक शक्ती आहे तर मेंदू हा अवयव किंवा विचार यापूर्वी चे लोकं सुद्धा करीत असत मग त्यांना तणाव का निर्माण होत नव्हता त्याचं साधं सोपं कारण आहे बदललेली जीवन शैली       पूर्वी लोकं अंग मेहनतीचे खूप जास्त काम करायचे आणि शरीर थकल्यामुळे शांत पूर्ण झोप घेत असत म्हणून तणाव आपोआप निघून जात असे त्यात पूर्वी सकस आहार...

गुंजन काव्य

*अक्षय तृतीयेचे गीत गुंजन..* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 अक्षय गुंजन  अक्षय काव्य  अध्यात्म अक्षय  अक्षय सारं गुंजते...  अक्षय भाव  अक्षय हास्य  अक्षय गीत  अक्षय फुलवते...  अक्षय माणुसकी  अक्षय मिष्टान्न  अक्षय हालहवाल  अक्षय जपते...  अक्षय वनमैत्र  अक्षय आपलंपण  अक्षय माणुसकीने  अक्षय गोंजरते  अक्षय रंजन  अक्षय अध्यात्म  अक्षय शास्त्रीय  अक्षय आलापते...  अक्षय आनंदाचे  अक्षय देणेघेणे  अक्षय चैतन्याचे  अक्षय स्नेहाळते...  अक्षय संस्कृती  अक्षय व्रतसंकल्प  अक्षय उत्सवभाव  अक्षय निभावते...  अक्षय प्रेम  अक्षय आनंदाचे  अक्षय तृतीयेला  अक्षय मंगल दुणावते...  *अक्षय तृतीयेच्या अक्षय मंगल कामना...*  🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹 अशोक अर्धापुरे, औरंगाबाद..
*स्मरण यात्रा...*🌹  गोड त्या शब्दांचे  वेड मला लागले..  स्मरण अंतरंगी जरी,  दूरचे समीप दिसू लागले...  अर्थ त्याचा जीवाचा,  अक्षर उमटू लागले..  साक्षर साक्षात्कारात  ध्यानस्थ नवे अवतरले...  कसे ऐकावे संगित,  बासुरीत मंजुळ मावले...  ओठावर येऊनही सारे,  हृदयी अंतर्धान पावले...  वाटते एकांत महफिलीत,  श्रवण गहन करावे...  सुप्रभातीच्या प्रार्थनेला,  सूर्याला पुन्हा बोलवावे... 🌹 ............  02.01.2020 अशोक अर्धापुरे,  औरंगाबाद