Skip to main content
*पाच पानें.....*🦚


अट्टाहास इंद्रायणीचा कसा,
स्वदेही अभंग जगण्याचा...
वारीत अजूनही तेच,
संतत्व नवे शोधण्याचा...

झाले गेले ज्ञाना तुका,
झाला मुका हरिपाठ...
आळवूनही ओठी ओवी,
अंतर्ध्यान शुष्क सपाट...

राधा जगावी, मीरा बोलावी,
कृष्णदेही सखी मोहरावी...
विस्मृतीतल्या अहिल्येलाही,
आभा रामरक्षेची मिळावी..

हरवले जरी देवत्व,
माया तुझीच बरसावी...
युगायुगाचे सखीत्व तुझे,
चैतन्यात राधा उरावी....

यावा वसंत फुलांवी पानफूलें,
देहवस्त्री सुगंध दरळवावा...
आदीअनंताचा कृष्ण पावा,
नाद अनाहत तन्मय व्हावा...

ःःःःःःःःःःःः🌹

अशोक अर्धापुरे,
औरंगाबाद
21.09.2019

Comments