Skip to main content
*निरवता...*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

रुसु कसा मीच माझ्यावर ।
नटणेच पुन्हा फार झाले ।।

असुनही शहाणे आयुष्य जरी ।
जगणे वेडेपणाचेच फार झाले।

मोजू किती पाऊलें वाटेवरची।
रस्तेच निसरडे फार झाले ।

फूलवुनही देहात वसंत सारा।
वणव्यातच जगणे फार झाले।

सरली प्रतिक्षा हरले शब्द।
अनुस्वारात अर्थ निरव झाले।


ःःःःःःःःःःः
अशोक अर्धापुरे, औरंगाबाद
दि. 22.9.19

Comments