*स्मृती...*
🌹
पुरे झाले बोभाटे दुःखांचे,
भ्रमभोवय्रात फिरणे झाले फार..
प्राक्तनाला व्रुथा देत दोष,
सुखाचे देणे झाले द्रुष्टीपार...
🌹
झेलत व्रुथा असंख्य वार,
आपलेच पोसले मी फार...
रंगारंगात रंग न रंगले कधी,
नाटकेच रंगली येथे रंगतदार..
🌹
तन मनात बहरुनही वसंत,
पानगळच झडली दारोदार...
पेटला वणवा अंगांग झेलत,
शुष्कपर्णाने झेलला पाऊलभार..
🌹
दुर वाजते धुन एकतारीची,
मीरेच्या जागरा तनमना भार..
आंस न बाळगली राधेची,
शोधत जगलो कृष्ण आत्म्यापार..
ःःःःःःःः
अशोक अर्धापुरे,
औरंगाबाद...
दिनांक.. 19.09.2019
🌹
पुरे झाले बोभाटे दुःखांचे,
भ्रमभोवय्रात फिरणे झाले फार..
प्राक्तनाला व्रुथा देत दोष,
सुखाचे देणे झाले द्रुष्टीपार...
🌹
झेलत व्रुथा असंख्य वार,
आपलेच पोसले मी फार...
रंगारंगात रंग न रंगले कधी,
नाटकेच रंगली येथे रंगतदार..
🌹
तन मनात बहरुनही वसंत,
पानगळच झडली दारोदार...
पेटला वणवा अंगांग झेलत,
शुष्कपर्णाने झेलला पाऊलभार..
🌹
दुर वाजते धुन एकतारीची,
मीरेच्या जागरा तनमना भार..
आंस न बाळगली राधेची,
शोधत जगलो कृष्ण आत्म्यापार..
ःःःःःःःः
अशोक अर्धापुरे,
औरंगाबाद...
दिनांक.. 19.09.2019
Comments
Post a Comment