Skip to main content

ताण तणाव

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
*वि-४*

*मुक्त लिखाण*
=============
*विषय-"ताण-तणाव"....✍️*
😇😔😟

*नाव- _प्रदीप महाजन_*
सहकार अधिकारी श्रेणी-1
नाशिक
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬

 ताण तणाव (स्ट्रेस) हा आजकाल अतिशय प्रचलित शब्द झालेला आहे, आपल्या बालपणात वडीलधाऱ्यांकडून हा शब्द फारसा ऐकायला येत नव्हता मात्र आजकाल आपण सर्वच जण असा शब्द नियमित ऐकत असतो किंवा उच्चारत असतो 
    मग यापूर्वी लोकांना तणाव नसायचा का? किंवा तणाव नावाचा एक प्रकारचा मानसिक आजार असेल तर हा अस्तित्वात नव्हता का? आणि असा आजार अधिक विचार केल्याने किंवा अतिरिक्त दबावामुळे निर्माण होतो तर पूर्वी दबावच नसायचा का? किंवा ती लोकं विचारच करत नव्हती का? तर असे नाही , मनुष्य म्हटला म्हणजे त्याच्या कडे मेंदू आहे, आणि वैचारिक शक्ती आहे तर मेंदू हा अवयव किंवा विचार यापूर्वी चे लोकं सुद्धा करीत असत मग त्यांना तणाव का निर्माण होत नव्हता त्याचं साधं सोपं कारण आहे बदललेली जीवन शैली 
     पूर्वी लोकं अंग मेहनतीचे खूप जास्त काम करायचे आणि शरीर थकल्यामुळे शांत पूर्ण झोप घेत असत म्हणून तणाव आपोआप निघून जात असे त्यात पूर्वी सकस आहार घेत असत किंवा धान्य कडधान्याचा जास्ती वापर होत असे ते सुद्धा बी बियाणे गावरान असायची ,त्यावेळी आत्ता जितकी केमिकल युक्त अन्न धान्य हायब्रीड सर्व फळे भाजीपाला नव्हता त्यात जमिनीमध्ये कस होता म्हणून सर्व काही पौष्टिक आहार उपलब्द होत असे ,दूध दही तूप सर्व काही नैसर्गिकरित्या असायचे आत्ता दुबती जनावरांना सुद्धा ज्या पद्धतीने दूध उत्पादन वाढावे म्हणून आहार किंवा इंजेक्शन दिली जातात किंवा ज्या पद्धतीने संक्रमित जाती आल्या आहेत तर नैसर्गिक पौष्टिकत्व संपलेले आहे त्यामुळे सुद्धा शारीरिक क्षमतेत बदल होतो आणि सर्व काही कमकुवत होते

    पूर्वी टेलिव्हिजन किंवा इतके शेकडो चॅनेल नव्हते, सर्वात महत्वाचे मोबाईल नव्हता म्हणून जागरण कमी असायचे आत्ता सोशल मीडिया टी व्ही मुळे जागरण अधिक होते म्हणून सहाजिकच मेंदू ला पूर्ण आराम तर मिळत नाही याउलट क्षणाला क्षणाला येणारे संदेश किंवा बातम्या त्यात काही सकारात्मक तर अचानक नकारात्मक संदेश वाचण्यात पाहण्यात आल्यामुळे मन बौचैन होते अस्थिर होते आणि सहाजिकच मनुष्य तणावात येतो 

     तसेच पूर्वीच्या लोकांच्या अतिशय जीवन जगण्यापूरता गरजा होत्या अर्थात आजही तितक्याच आहेत मात्र प्रत्येक मनुष्याने आपल्या सभोवताली बघून बघून हेवे दावे म्हणा कींवा खोटया कृत्रिम मोठेपणा मिरवण्यात लोकांनी महागड्या चैनीच्या गोष्टीचा स्वीकार करायला सुरुवात केली प्रत्येकाला आपलं स्टेटस जपायचं आहे म्हणून गाडी पाहिजे, मोबाईल पाहिजे, घर पाहिजे म्हणजे पूर्वी सारखं नव्हे आलिशान प्लॅट किंवा डुप्लिक्स बांगला, किंवा स्वतंत्र बांगला ,रो हाऊस पाहिजे कार मध्ये सुद्धा अमुक कार म्हणजे बडेजाव पणा दिसतो म्हणून तमुक कार घ्यायची , मॉल संस्कृती आली त्यात 2 वस्तू घ्यायला गेलो की, नजरेत खूप साऱ्या आकर्षक वस्तू दिसतात म्हणून 10 वस्तू घेऊन बाहेर पडायचे म्हणजे गरज नसतांना अनावश्यक खर्च करण्याची प्रवृत्ती वाढली म्हणून खर्च वाढले आणि उत्पन्न कमी मग त्यात क्रेडिट कार्ड घ्या, कर्ज घ्या आणि पर्यायाने कर्जबाजारी लोकं होत आहेत आणि मग तणावात येत आहेत 
    तसेच इथे आज माणसाला किंमत राहिलेली नाही , जो पैसेवाला त्यालाच किंमत आहे म्हणजे पैसा सर्वस्व झाला आणि पैसा कमविण्यासाठी धावपळ सुरू झाली मग दबाव वाढला आणि कामाचे स्वरूप बदलले मनुष्य आत्ता काम नौकरी व्यापार एन्जॉय म्हणून करू शकत नाही तर मशीन सारखा करतोय आणि नुसता राबतोय मग जगण्याची मज्जा गेली फ्री टाइम मिळत नाही म्हणून स्ट्रेस दूर करण्यासाठी पिकनिक पार्ट्या वाढल्या पर्यटन वाढले मग काय अजून खर्च वाढला आणि खर्च वाढला म्हणून परत तणावात भर पडली 
    आज काल सर्वच जण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तणावात वावरत असल्याने एकमेकांना ताण द्यायला सुरुवात करतात म्हणजे कार्यालयात बॉस तणावात असेल तर तो त्याचा राग खालच्या कर्मचारी वर्गावर काढू लागतो मग तो त्यांना गरजेपेक्षा ,क्षमतेपेक्षा जास्त कामं सोपवतो आणि त्रास देतो मग जास्त दबाव वाढला म्हणून कर्मचारी ताण तणावात वावरतात मग ते त्यांच्या घरी त्याची भडास काढतात आणि मग पत्नी मुलं यांच्यावर विपरीत परिणाम होतो मग घरात कटकट वाढते आणि मुलं घरातील सारखी कटकट ऐकून मुलं बाहेर वावरतांना कमी वयात वाईट वळणाला लागलेली दिसतात मुलं सुद्धा शाळेत एकमेकांना टेन्शन देतात शिक्षक मुलांना आणि मुलं शिक्षकांना त्रास देऊ लागतात मग मुलं कमी वयात त्यात मोबाईल वरील गेम , टीव्ही वरील कार्टून यामुळे चिडचिडे होतात आणि अनेक वाईट कृत्य करतात आत्महत्या करतात, सिगारेट पितात वगैरे वगैरे तसेच तणाव दूर करण्यासाठी बार संस्कृती अधिक फुलायला लागली आणि ती एक फॅशन किंवा स्टेटस सिम्बॉल होऊ लागली जो मद्य पित नाही तो मागासलेला असा समज होऊ लागला आणि व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत चालले आहे ताण तणाव कमी होतो म्हणून पिऊ लागली मात्र तो क्षणिक कमी होतो याउलट महागडी दारू वर खर्च करून परत तणावात भर पडू लागली आहे 

बऱ्याच गोष्टी माणसाने स्वतःहून वाढवून घेतल्या असून तणाव वाढलेला आहे मग उदासीनता , चिडचिड, नकारात्मकता आलेली आहे माणुसकी शून्य लोकं झालेली आहेत या तणावात वाहन चालवतात म्हणून रस्त्यात अनेक जण एकमेकांवर खेकसताना दिसतात तसेच यामुळे अपघात वाढले आहेत तसेच आत्महत्या वाढल्या आहेत
     ताण तणाव नक्की कमी करता येईल त्यासाठी डॉ कडे खर्च करण्याची आवश्यकता नाही महागड्या औषधी खाण्याची गरज नाही 
    त्यासाठी हवे सकारात्मक विचार , नियमित व्यायाम करायला हवे, जागरण कमी करणे 7 ते 8 तास झोप अवश्य घेणे, गरजा कमी करणे, खोटा मोठेपणा मिरवू नये ,सोशल मीडियाचा सदुपयोग करून गरजेपुरता वापरणे , समाजात घडणाऱ्या नकारात्मक घटना बातम्या न बघणे , आपले काम वेळेतच पूर्ण करणे आणि मस्त सुखी आयुष्य जगणे

धन्यवाद🙏

Comments

  1. हो, आत्ता च मला आलेले ई-मेल पहात असताना, हा लेख वाचला आणि पटकन गीत गुंजन उघडून बघितलं, छान लेख. आजच्या मानवांनी स्वतः अजाणता उभी केलेली ही परिस्थिती, मात्र आणि मात्र हकारात्मक आचरण विचरण करूनच त्यातून बाहेर पडण्याचा सर्वश्रेष्ठ पर्याय आहे असं माझं मत आहे. दुसरी उत्तम बाब म्हणजे संगीत सेवन, मद्याच्या आहारी न जाता, जर मानव संगीताकडे वळला तर निश्चितच तणावमुक्त होऊ शकतो, जे आपण सर्व आपल्या ह्या गीत गुंजन वाटे करीत च आहोत, ज्यासाठी मी वेळोवेळी दांचे आभार मानत असतो. पुनः एकदा प्रदीप दा मनःपूर्वक धन्यवाद आणि आभार🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. सूंदर विषय निवडला.

    आजच्या धक्काधक्कीच्या काळात,मनाचे व्यवस्थापन करणे थोडस कठीण काम होत चालले आहे.
    धावती जीवन शैली, होणारी ओढाताण यातून मानसिक संतुलन बिघडत चालले आहे.
    सुखवस्तू जीवनशैली माणसाला जास्त आळशी बनवत चालली आहे.
    जून तेच सोन अस म्हण होती.
    ती आज जरी लागू होत ,असली तरी गांभीर्याने कोणी घेत नाही.
    चंगळवादी जीवन शैली माणसाला माणसा पासून दूर करत आहे.
    स्टेटस च्या नावा खाली विचाराचं पुढारले पण जरी असले तरी प्रत्यक्षात मात्र ती जीवनाची एक बाजू असते.

    लोकांना दाखवण्यासाठी जगताना ,आपण स्वतः च जगणं का विसरावे हेच कळत नाही.
    नकारात्मक विचार करून आयुष्य खर्ची घालण्यात आपला वेळ उगीच दवडू नये.
    सकारात्मक राहून आपल्या हवं तसं जीवन जगणे हीच काळाची गरज आहे.
    या लॉक डाऊन च्या काळात मला वाटत निसर्गान आपल्या जमिनीवर नक्कीच आणलंय.
    जिओ और जिने दो!!!

    सुखाची संकल्पना म्हणजे ऐशौआराम नव्हे तर आत्मिक समाधान आहे.

    खूपच छान लेख लिहलात ,
    धन्यवाद प्रदीप सर

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद वहिनी साहेब

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

*भोंडला* 🐘🐘🐘🐘🐘🐘 पर्जन्यराजाची पूजा करण्याचा भारतीय संस्कृतीमधील हा आगळीवेगळा उत्सव.... हत्ती हे वैभवाचं प्रतिक.. हत्तीच्या सोंडेतून पाणी पडल्यासारखा पाऊस झाल्यावर सगळीकडं धनधान्याची समृद्धी होते यासाठी हस्त नक्षत्राच्या पावसाची हि पूजा.. भोंडल्याचा हा सण साजरा करण्या पाठीमागे पावसाबद्दलची कृतज्ञता ,जुन्या काळातील चालीरीती ,देवदेवतांची स्तुती यांचं दर्शन घडविले जातं.         भोंडल्याचा हा उत्सव 16 दिवस साजरा केला जातो याला हातगाही म्हणतात. हत्तीची प्रतिमा अथवा मुर्ती आणून त्याला रोज 16 दिवस रोज फुलांचा आणि 16 प्रकारच्या धान्याच्या लोम्ब्या , मक्याचे कणीस असा हार करून घातला जातो त्यातून या धान्यांची ओळख आणि त्याच महत्व लक्षात याव यासाठी ....16 वर्षांपर्यंतच्या लहान मुलींसाठीचा खर तर हा खेळ , फेर धरून गाणी म्हणायची आणि रोज एक गाणं वाढवत न्यायचं आणि 16 व्या दिवशी 16 गाणी म्हणायची भोंडल्याद्वारे पर्जन्यराजाला निरोप देताना पुढच्या वर्षी असाच वाजत गाजत ये समृद्धी आणअसं निमंत्रण हि या द्वारे दिले जाते .या गाण्यांमध्ये एक लय आणि ताल आहे त्यामुळं त्यातील गोडी आज अ...

गुंजन काव्य

*अक्षय तृतीयेचे गीत गुंजन..* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 अक्षय गुंजन  अक्षय काव्य  अध्यात्म अक्षय  अक्षय सारं गुंजते...  अक्षय भाव  अक्षय हास्य  अक्षय गीत  अक्षय फुलवते...  अक्षय माणुसकी  अक्षय मिष्टान्न  अक्षय हालहवाल  अक्षय जपते...  अक्षय वनमैत्र  अक्षय आपलंपण  अक्षय माणुसकीने  अक्षय गोंजरते  अक्षय रंजन  अक्षय अध्यात्म  अक्षय शास्त्रीय  अक्षय आलापते...  अक्षय आनंदाचे  अक्षय देणेघेणे  अक्षय चैतन्याचे  अक्षय स्नेहाळते...  अक्षय संस्कृती  अक्षय व्रतसंकल्प  अक्षय उत्सवभाव  अक्षय निभावते...  अक्षय प्रेम  अक्षय आनंदाचे  अक्षय तृतीयेला  अक्षय मंगल दुणावते...  *अक्षय तृतीयेच्या अक्षय मंगल कामना...*  🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹 अशोक अर्धापुरे, औरंगाबाद..