Skip to main content

Posts

Showing posts from September, 2019
अरे संसार संसार ♾♾ तुझ्यासाठी केला । जीवनाचा खेळ ।। आकांक्षाची मेळ । मिलनाचा ।। ♾♾ मिलनही झाले । तुझे नि माझे ।। ओढू का ओझे । संसाराचे ।। ♾♾ संसार संसार करुनि । नाही कशालाच थारा ।। वाढतोय पारा दिनोदिन । विवादाचा ।। ♾♾ मिटवूया वाद करुया संवाद । आठवणींचा उमाळा ।। न आला उजाळा । पूर्णविराम...।। ♾♾ *निशिकान्त मायी* २५ सप्टेंबर २०१९
*आता कठीण झाले* 📢📢💧 गंधमिश्रित जीणे तुझे आता कठीण झाले कितीदा सांगितले या मनी जीवन हे जीवन आहे पण सवाल सतावतो या मनी जीवन म्हणजे काय आहे सुगंधात जगणेदेखील आता कठीण झाले 📢📢💧 जगण्याचा अर्थ केवळ जीवनाचा ऐशोआराम मदिरेतही आहे शक्ती करण्याची नामोहरम पिण्याचीच ताकद स्वत:ला नेहमी सांभाळत आले सुगंधात जगणेदेखील आता कठीण झाले 📢📢💧 *निशिकान्त मायी* विदर्भ/मराठवाडा २४ सप्टेंबर २०१९
*निरवता...* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 रुसु कसा मीच माझ्यावर । नटणेच पुन्हा फार झाले ।। असुनही शहाणे आयुष्य जरी । जगणे वेडेपणाचेच फार झाले। मोजू किती पाऊलें वाटेवरची। रस्तेच निसरडे फार झाले । फूलवुनही देहात वसंत सारा। वणव्यातच जगणे फार झाले। सरली प्रतिक्षा हरले शब्द। अनुस्वारात अर्थ निरव झाले। ःःःःःःःःःःः अशोक अर्धापुरे, औरंगाबाद दि. 22.9.19
*पिसारा* फुलतो पिसारा हळुवार भावनांचा विरहात हरविला श्याम कुणाचा धुंद पावसात तो चिंब होऊनिया पावसाच्या बनातील कळा सोसवूया 💐 लोपला जाईजुईचा बहर आज रानोरान फिरला शोधाया पहाट रात्र अमावस्येची झिंगलेली होती अस्फूट फुलविणारी ती स्वप्नमोती होती 💐 उधाणत्या वादळात आरोह आक्रोशाचे पायातील पैंजण वाजे स्वरास्वरांचे वेड्या मनात या स्त्रवली एक गीतमाला मयुरीच्या उठे पंखपिसाºयात ज्वाला 💐 मृग थेंबाची यौवन गंधीत होई धारा किरणाकिरणांतून वाहिल्या काटेरी तारा वृक्ष उन्मळुनी गेलेत या अंधारी रातीत फुललेला पिसाराही विरला पाऊसधारीत *निशिकान्त मायी* विदर्भ/मराठवाडा २२ सप्टेंबर २०१९
*प्रारब्ध* ******** नशीब आपुले कुणा  का सांगायचे?  दुःख आपुले  आपणच सोसायचे. सुख असते आपुल्या सोबती काय माहीत उद्या इथे काय घडती? देवाची किती आराधना करायची जन्म मृत्यूची मात्र तुलना नेहमी करायची? प्रारब्ध हे आपुले प्रत्येकाने भोगायचे उगाचं का त्याला दूषण द्यायचे? सुखात जगायची आस वाटायची दुःखाची मात्र तयारी नसायची. माणूस म्हणून जगायचे जमेल तितके समाधान मानायचे. जीवन मिळते एकदाचं म्हणून आपुले गुणदोष का लपवायचे? अनमोल जीवनाला सामोरे जायचे.   ✍️©® *अनिता कळसकर*   *कल्याण*
*झाड माणूसकीचं आपण* *लावू या दारी* *ममतेच्या मायेने खाऊ* *सगळे सुदाम्याची शिदोरी*.  ✍️©® *अनिता कळसकर*  *कल्याण*
*सुरुवात चारोळीने सर*😊🙏🏻🙏🏻           *कल्पनेतल्या शब्दांना* *असते खुमारी गंधाची* *जपला माणुसकीचा धागा* *गुंफूनी नाळ विश्वासाची*   ◆◆◆  *शब्दगंध* -------------- शब्द शब्द जोडताना धाग्यांनी घट्ट विणले माणुसकीच्या नात्यांत अवघे विश्व सुगंधित झाले. शब्दांना धार असावी फक्त विश्वासाची नकोत नाती ती घासलेल्या भांड्यांच्या कल्हईची. उगाचं लटका तो अट्टाहास नको परीमळाला दरवळण्यास बागेचा हवाला नको. जपली नाती किती वसा घेऊन माणूसकीची ठेव ही सोनेरी अलवार आयुष्याच्या स्वप्नांची. शब्दगंधाना सूर गवसला प्रेमाचा नवा अर्थ उमगला म्हणूनी आज शब्दगंधांनी माणूसकीचा धागा जपला.. ✍️ ©® *अनिता कळसकर*            *कल्याण*            *शुभसांज*
*जिंदगी* ***** रूठ गयी जिंदगी हमसे कबतक किनारा करें हम वक्त ने ये क्या तस्वीर बनायी जिंदादिली याद बनके रूह में समां गयी... जमाना गुजरता गया यादें गहरी आहट में उभर आयी. जिंदगी का आना और यकायक रूठ जाना दीपक किसीका बुझाकर चले जाना ... क्या उसूल है जीवन का....  तकदीर ने अरमानों को  मिटाकर रख दिया..   जिंदगी थोडा और जीना देती जीवन की नैय्या किनारे पार कर लेने देती.. सागर की गहराईयों को आगोश में भरकर समां तो जाती प्यारी जिंदगी...   ✍️©® *अनिता कलसकर*                *कल्याण*
*कफन* ●●●●●●● जिगर हमारा नाजुक था कभी ये इक जमाने की अपनी बात है। आदमी इन्सानियत खोकर जीने लगा ये इस जमाने की उसकी आदत है। पीठ दिखानेवाले अक्सर कोई बहाना बनाकर छिप जाते है। साजीशें गँवारा नही होती कभी जो मुँहपर सरेआम तमाचा मार देते है। क्या लेके जायेंगे इस जहाँसे *कफन*तो ओढकर जी लो *इन्सानियत की*।  कमसे कम जिंदगानी अपनी  कबूल फरमायेगी जन्नत के शामयाने की।     ✍️©® *अनिता कलसकर*  *कल्याण*
*पाच पानें.....*🦚 ☘ अट्टाहास इंद्रायणीचा कसा, स्वदेही अभंग जगण्याचा... वारीत अजूनही तेच, संतत्व नवे शोधण्याचा... ☘ झाले गेले ज्ञाना तुका, झाला मुका हरिपाठ... आळवूनही ओठी ओवी, अंतर्ध्यान शुष्क सपाट... ☘ राधा जगावी, मीरा बोलावी, कृष्णदेही सखी मोहरावी... विस्मृतीतल्या अहिल्येलाही, आभा रामरक्षेची मिळावी.. ☘ हरवले जरी देवत्व, माया तुझीच बरसावी... युगायुगाचे सखीत्व तुझे, चैतन्यात राधा उरावी.... ☘ यावा वसंत फुलांवी पानफूलें, देहवस्त्री सुगंध दरळवावा... आदीअनंताचा कृष्ण पावा, नाद अनाहत तन्मय व्हावा... ःःःःःःःःःःःः🌹 अशोक अर्धापुरे, औरंगाबाद 21.09.2019
*स्मृती...* 🌹 पुरे झाले बोभाटे दुःखांचे, भ्रमभोवय्रात फिरणे झाले फार.. प्राक्तनाला व्रुथा देत दोष, सुखाचे देणे झाले द्रुष्टीपार... 🌹 झेलत व्रुथा असंख्य वार, आपलेच पोसले मी फार... रंगारंगात रंग न रंगले कधी, नाटकेच रंगली येथे रंगतदार.. 🌹 तन मनात बहरुनही वसंत, पानगळच झडली दारोदार... पेटला वणवा अंगांग झेलत, शुष्कपर्णाने झेलला पाऊलभार.. 🌹 दुर वाजते धुन एकतारीची, मीरेच्या जागरा तनमना भार.. आंस न बाळगली राधेची, शोधत जगलो कृष्ण आत्म्यापार.. ःःःःःःःः अशोक अर्धापुरे, औरंगाबाद... दिनांक.. 19.09.2019
*आरसा...* ःःःःःःःःःःःःः तुकड्या तुकड्यात, तोच सूर्य.. तोच चंद्र... सजतो तोच नूर, तेच ते प्रतिबिंब... सख्या रे, तुटक्या तुटक्याही जीवात मावतो... तोच कृष्ण.. राधेचा तोच तो नेत्र चिंब.. चिंब.. ःःःःःःःःःःःःः अशोक अर्धापुरे, औरंगाबाद....
*पाच पानें.....*🦚 ☘ अट्टाहास इंद्रायणीचा कसा, स्वदेही अभंग जगण्याचा... वारीत अजूनही तेच, संतत्व नवे शोधण्याचा... ☘ झाले गेले ज्ञाना तुका, झाला मुका हरिपाठ... आळवूनही ओठी ओवी, अंतर्ध्यान शुष्क सपाट... ☘ राधा जगावी, मीरा बोलावी, कृष्णदेही सखी मोहरावी... विस्मृतीतल्या अहिल्येलाही, आभा रामरक्षेची मिळावी.. ☘ हरवले जरी देवत्व, माया तुझीच बरसावी... युगायुगाचे सखीत्व तुझे, चैतन्यात राधा उरावी.... ☘ यावा वसंत फुलांवी पानफूलें, देहवस्त्री सुगंध दरळवावा... आदीअनंताचा कृष्ण पावा, नाद अनाहत तन्मय व्हावा... ःःःःःःःःःःःः🌹 अशोक अर्धापुरे, औरंगाबाद 21.09.2019
🥁🇬‌ᴳeeᵗ🇹‌ 🕯गुंजन🥁 🎻🎸🎻🎸🎻🎸🎻      *आयुष्य कसे जगावे*     आनंद हा जीवनचा आत्मा मानला जातो, जर आपण आनंदी, ऊत्साही राहिलो तर जीवन कसे बहारदार होईल.शेवटी आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो.आपण जसा विचार करतो,जसे राहतो,तसे च आपले आयुष्य बनते.     खरे तर आयुष्य हे दोन क्षणाचे,म्रुत्यु देखील आपल्या हातात नाही, तो कधी येईल कोणी ही नाही सांगू शकत.      आपण आपल्या आयुष्यातील आनंदी क्षण आपल्या च हाताने गमावतो, पण आपण स्वतः आनंदी राहून इतरांशी ही प्रेमाने वागलो ,आनंद देण्याचा प्रयत्न केला तर या जीवनाचा आनंद दिलखुलास पणे लुटू शकू,हो ना.😊        आनंदाचा खरा शत्रू काळजी व चिंता .काही जण आपल्या आयुष्यातील क्षण काळजी, चिंता यामध्ये घालवतात,  *असे म्हणतात, "चिंता माणसाला चितेपर्यंत घेऊन जाते, न् संपवून टाकते."*  आपण आपल्याला जे आयुष्य मिळाले तो प्रत्येक क्षण हसत -खेळत ,आनंदी राहून, आनंद मानून जगायला हवा, म्हणजे म्रुत्यु ला सुद्धा आनंदाने, समाधानाने सामोरे जाऊ शकू.👍🏻        *आनंदाने जगा...
*स्मृती...* 🌹 पुरे झाले बोभाटे दुःखांचे, भ्रमभोवय्रात फिरणे झाले फार.. प्राक्तनाला व्रुथा देत दोष, सुखाचे देणे झाले द्रुष्टीपार... 🌹 झेलत व्रुथा असंख्य वार, आपलेच पोसले मी फार... रंगारंगात रंग न रंगले कधी, नाटकेच रंगली येथे रंगतदार.. 🌹 तन मनात बहरुनही वसंत, पानगळच झडली दारोदार... पेटला वणवा अंगांग झेलत, शुष्कपर्णाने झेलला पाऊलभार.. 🌹 दुर वाजते धुन एकतारीची, मीरेच्या जागरा तनमना भार.. आंस न बाळगली राधेची, शोधत जगलो कृष्ण आत्म्यापार.. ःःःःःःःः अशोक अर्धापुरे, औरंगाबाद... दिनांक.. 19.09.2019
🥁🇬‌ᴳeeᵗ🇹‌ 🕯गुंजन🥁            *शुभरात्री*     🌃🎆🌌🌃🎆🌌 आज मी एक नाही दोन गीतांसोबत शुभरात्री म्हणतोय.... आपल्या समूहातील सन्मानीय सदस्यां आणि कवयित्री सौ अनिता मॅडम यांनी मला एक कविता पाठवली ती मला आवडली म्हणून आणि मी त्यांच्या परवानगीने माझ्या आवडीच्या अनुषंगिक गीताने शुभरात्री सदर सादर करायचे ठरविले 🙏 *प्रारब्ध* ******** नशीब आपुले कुणा  का सांगायचे? दुःख आपुले आपणच सोसायचे. सुख असते आपुल्या सोबती काय माहीत उद्या इथे काय घडती? देवाची किती आराधना करायची जन्म मृत्यूची मात्र तुलना नेहमी करायची? प्रारब्ध हे आपुले प्रत्येकाने भोगायचे उगाचं का त्याला दूषण द्यायचे? सुखात जगायची आस वाटायची दुःखाची मात्र तयारी नसायची. माणूस म्हणून जगायचे जमेल तितके समाधान मानायचे. जीवन मिळते एकदाचं म्हणून आपुले गुणदोष का लपवायचे? अनमोल जीवनाला सामोरे जायचे.   ✍️©® *अनिता कळसकर*   *कल्याण* यांनी या कवितेतून दिलेला संदेश म्हणजे सुखी व आनंदी जीवन जगण्याची कला शिकवतो... खरचं जिवन क्षणभंगुर आहे, सोबत काही...
🥁🇬‌ᴳeeᵗ🇹‌ 🕯गुंजन🥁 🌲🍁🌲🍁🌲🍁🌲🍁 🌄 * एक सांज विचारांची * 🌄           ♾♾♾♾♾ * सागराला येणाऱ्या भरती ओहोटीचं अन मानवी जीवनाचे नातं फार वेगळं आहे , येणाऱ्या प्रत्येक भरतीने जीवनातील आनंद हा ओसंडून वाहू लागतो तर जेंव्हा ओहोटी येते तेंव्हा भावनांचा आवेग हा ओसरतो पण त्याचवेळी काही सुखद आठवणी अन काही बोचणारी दुःख मागे राहातात जर भरतीच्या वेळी तुमचे सत्कर्म हे ओहोटी ओसरताना मोती शंख शिंपल्याच्या सुंदर आठवणी सोडून जातात तर भरतीत तुम्ही केलेल्या चुका तुम्हाला खडतर अन कठीण काटेरी पाऊलखुणा देऊन जातात म्हणून या भरती अन ओहोटीच्या लाटांवर समजुतीने स्वार झालात तर जीवन आनंदी अन सुखमय होईल ..... * * नात्याचं जे जाळे जगण्यासाठी पूरक असते.... * * ते जीवन खुलवते * * जीवन जगवते * * जीवन सहज होते * * मनुष्य प्राणी हा समाजप्रिय प्राणी आहे तो * * नातेवाईकांशिवाय जगू शकत नाही * * म्हणून सांभाळा नात्यांचे धाग्याचे गुंफण * * ऐकूया..... * * रिश्तो का मांजा * ⏲३:३९ 🌲🍁🌲🍁🌲🍁🌲🍁 * निर्मिती मार्गदर्शन *      * प्रदीप महाजन * ...
🥁🇬‌ᴳeeᵗ🇹‌ 🕯गुंजन🥁 🌲🍁🌲🍁🌲🍁🌲🍁 🌄 * एक सांज विचारांची * 🌄           ♾♾♾♾♾ * आपण जेंव्हा st बस मध्ये प्रवास करतो तेंव्हा समजा खूप गर्दी असेल अन सीटवर आधीच माणसे बसलेली असतील तर ती लगेच तुम्हाला जागा देत नाहीत कधी कधी यातून वादही होतात पण तीच माणसे जेंव्हा थोडया वेळाने त्याच सीटवर बसण्यासाठी तुम्हाला आग्रह करतात अन सोबत बसऊन घेतात आपल्या आयुष्यात देखील असेच घडते जेंव्हा आपण नवीन ठिकाणी कामाला जातो किंवा नवीन नाती निर्माण करतो त्यावेळी त्या प्रत्येकाला थोडा वेळ द्यावा लागेल मगच तुम्ही त्याच्या मनात जागा निर्माण करू शकाल जोवर तुम्ही त्याच्या अंतरंगात डोकावणार नाही अन त्याच्या सुख दुःखात सहभागी होत नाहीत तोवर वेळ द्या .... *      * आणी नात्यांची घडी विस्कटू देऊ नका..... * * जीवनात ही घडी अशीच राहू दे.... * ⏲३:५० 🌲🍁🌲🍁🌲🍁🌲🍁 * निर्मिती मार्गदर्शन *      * प्रदीप महाजन * ♾♾♾♾♾♾♾♾ * संकल्पना आणि सादरीकरण *             ...
🥁🇬‌ᴳeeᵗ🇹‌ 🕯गुंजन🥁 🌲🍁🌲🍁🌲🍁🌲🍁 🌄 *एक सांज विचारांची*🌄           ♾♾♾♾♾ आपण जेंव्हा वर्तमान आयुष्यात जगत असतो नकळत आपल्या भोवती घडणाऱ्या घटना या सुचक संदेश देत असतात फक्त आपल्याला त्यांच्याशी आपलं जीवन जोडता आलं पाहिजे , आज माझ्यासोबत असेच झालं आमच्या BMC ( दुध थंड करण्याचा फ्रिज) मधील सेन्सर काम करत नसल्याने सर्व दुधाचा बर्फ झाला खुप प्रयत्न करून ते दुध काढत होतो जोवर त्या बर्फात पातळ झालेलं दुध होत तो ओलावा ईतर बर्फ़ाला जोडून ठेवत होता जस जसे ते दुध बाहेर येत होतं तो बर्फ वेगळा होऊन वितळू लागला , आपल्या जीवनात सुद्धा जोवर प्रत्येक नात्यात भावनेचा ओलावा असतो तोवर नाती ह्या बर्फ़ासारखी घट्ट धरून असतात जसा का भावनिक ओलावा गैरसमज किंवा अहंकार किंवा ईतर कारणाने सम्पला की मग हळूहळू हे नातं संपायला सुरुवात होते म्हणून नेहमी काळजी घ्या हा ओलावा जपण्याची जोवर तुमच्या संवादाचे सेन्सर चालू असेल तोवर ओलावा टिकून आहे याची खात्री देता येते पण जेंव्हा ते बंद पडते तिथून सुरुवात होते ती नाती विताळायला ,       बघा जमलं तर हा ओलावा टिकून ठेवता आला तर ...
गीत गुंजन हा whats app वरील नामांकित संगीत समूह असून, गुंजन परिवाराचे वेगवेगळ्या विषयाचे अनेक समूह आहेत, समूहाचे संकेतस्थळ ,फेसबुक पेज आणि यु ट्यूब चॅनेल कार्यान्वित होत असून प्राथमिक टप्प्यावर कामकाज सुरू आहे, गुंजन अतिशय परीवार समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत गुणिजणाचा परीवार असून ,समूहात सर्व प्रकारचे संगीत उत्तम सादरकर्ते यांची टीम यामध्ये तेजश्री जोशी, अनिरुद्ध शार्दूल, श्रद्धा संजय, श्रेया गोलीवडेकर, मीनाक्षी साळुंखे, आणि समूहाचे मुख्य प्रशासक प्रदीप महाजन सुमधुर संगीत पोस्ट करीत असतात...समूह फार शिस्तप्रिय असून सर्वच मान्यवर संगीतानंद घेत असतात आणि अभ्यासू प्रतिक्रिया देत असतात, समूहाचे भावी काळात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न असून, हा समूह त्या दिशेने वाटचाल करीत आहे , आज समूहाने blogg वर येवून एक पाऊल प्रगतीकडे टाकले आहे, या blogger च्या माध्यमातून संगीत क्षेत्रातील ऐतिहासिक बाबी गुंजन वाचकांच्या समोर आणण्यासाठी प्रयत्नशील राहील धन्यवाद