*पिसारा*
फुलतो पिसारा हळुवार भावनांचा
विरहात हरविला श्याम कुणाचा
धुंद पावसात तो चिंब होऊनिया
पावसाच्या बनातील कळा सोसवूया
💐
लोपला जाईजुईचा बहर आज
रानोरान फिरला शोधाया पहाट
रात्र अमावस्येची झिंगलेली होती
अस्फूट फुलविणारी ती स्वप्नमोती होती
💐
उधाणत्या वादळात आरोह आक्रोशाचे
पायातील पैंजण वाजे स्वरास्वरांचे
वेड्या मनात या स्त्रवली एक गीतमाला
मयुरीच्या उठे पंखपिसाºयात ज्वाला
💐
मृग थेंबाची यौवन गंधीत होई धारा
किरणाकिरणांतून वाहिल्या काटेरी तारा
वृक्ष उन्मळुनी गेलेत या अंधारी रातीत
फुललेला पिसाराही विरला पाऊसधारीत
*निशिकान्त मायी*
विदर्भ/मराठवाडा
२२ सप्टेंबर २०१९
फुलतो पिसारा हळुवार भावनांचा
विरहात हरविला श्याम कुणाचा
धुंद पावसात तो चिंब होऊनिया
पावसाच्या बनातील कळा सोसवूया
💐
लोपला जाईजुईचा बहर आज
रानोरान फिरला शोधाया पहाट
रात्र अमावस्येची झिंगलेली होती
अस्फूट फुलविणारी ती स्वप्नमोती होती
💐
उधाणत्या वादळात आरोह आक्रोशाचे
पायातील पैंजण वाजे स्वरास्वरांचे
वेड्या मनात या स्त्रवली एक गीतमाला
मयुरीच्या उठे पंखपिसाºयात ज्वाला
💐
मृग थेंबाची यौवन गंधीत होई धारा
किरणाकिरणांतून वाहिल्या काटेरी तारा
वृक्ष उन्मळुनी गेलेत या अंधारी रातीत
फुललेला पिसाराही विरला पाऊसधारीत
*निशिकान्त मायी*
विदर्भ/मराठवाडा
२२ सप्टेंबर २०१९
Mast kavita ahe
ReplyDeleteखूपच सुंदर आणि हृदयस्पर्शी कविता आहे.
ReplyDeleteभावमाधुर्य असलेली कविता..
ReplyDelete