Skip to main content

🥁🇬‌ᴳeeᵗ🇹‌ 🕯गुंजन🥁
🌲🍁🌲🍁🌲🍁🌲🍁
🌄 *एक सांज विचारांची*🌄
          ♾♾♾♾♾
*आपण जेंव्हा st बस मध्ये प्रवास करतो तेंव्हा समजा खूप गर्दी असेल अन सीटवर आधीच माणसे बसलेली असतील तर ती लगेच तुम्हाला जागा देत नाहीत कधी कधी यातून वादही होतात पण तीच माणसे जेंव्हा थोडया वेळाने त्याच सीटवर बसण्यासाठी तुम्हाला आग्रह करतात अन सोबत बसऊन घेतात आपल्या आयुष्यात देखील असेच घडते जेंव्हा आपण नवीन ठिकाणी कामाला जातो किंवा नवीन नाती निर्माण करतो त्यावेळी त्या प्रत्येकाला थोडा वेळ द्यावा लागेल मगच तुम्ही त्याच्या मनात जागा निर्माण करू शकाल जोवर तुम्ही त्याच्या अंतरंगात डोकावणार नाही अन त्याच्या सुख दुःखात सहभागी होत नाहीत तोवर वेळ द्या ....*
     *आणी नात्यांची घडी विस्कटू देऊ नका.....*
*जीवनात ही घडी अशीच राहू दे....*
⏲३:५०
🌲🍁🌲🍁🌲🍁🌲🍁
*निर्मिती मार्गदर्शन* 
   *प्रदीप महाजन*
♾♾♾♾♾♾♾♾
*संकल्पना आणि सादरीकरण*
                 *अनिरुद्ध*
                      🦁

Comments

  1. आदरणीय सौ मीनाक्षी साळुंखे यांची प्रतिक्रिया

    अनिरुद्ध
    🙏
    आयुष्य ,आयुष्य आहे तरी काय??
    एक श्वास घेतला की सोडून देणं परत घेणं
    आहे का एवढं सोपं
    नक्कीच नाही किंवा हो.
    विचारांचा खेळ.
    *सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू जीवनात सहज पणे सामावणार्या या प्रवासात सह प्रवासी अनेक भेटतात पण नाळ जुळते ती माणुसकी आणि आपुलकीची.*

    *आयुष्य एक स्वप्न आहे .
    विविध प्रकारच्या रंगसंगती न नटलेलं*
    आयुष्य जगत असताना वर्तमानात जगून समर्पित करन न गुंतता निखळ आनंद घेत ही जीवनाची घडी अशीच प्रफुल्लित करून जगण्यातल्या आनंद घ्यायचा मनसोक्त मनस्वी.
    प्रितीच्या फुलावर मनाचा वसंत ऋतू बहरत रहावा अलगदपणे सृजनाचा आविष्कार करत.
    सुंदर गीत सुंदर संकलन
    *निर्मिती ची कल्पना देणारे*
    *आ.प्रदीप सर ,सादरकर्ता अनिरुद्ध वेगळा पण मनभावन प्रयत्न👌👌👌
    *धन्यवाद*🙏

    ReplyDelete
  2. कल्पना देणारे आणि त्या कल्पनेला मूर्त स्वरूप देणारे दोघेही अभिनंदनाचे अधिकारी👍😊🙏

    ReplyDelete
  3. प्रतिक्रिया ही तेव्हढी च छान, मिनाक्षी ताई आपण पण अभिनंदनाचे तेव्हढे च अधिकारी 👍🙏

    ReplyDelete
  4. या नविन उपक्रमाद्वारे आपण नविन भरारी घेत आहात मनोगत व्यक्त करण्यासाठी आणि रोज नवीन विचार नवनव्या कल्पना सादर करण्यात प्रदीपजींचा हात कोणी धरु शकत नाही शिवाय आपल्यातील व्यक्त होण्याची आणि सुंदर लिहिण्यासाठी अगदी योग्य माध्यम साधले आहे धन्यवाद

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

*भोंडला* 🐘🐘🐘🐘🐘🐘 पर्जन्यराजाची पूजा करण्याचा भारतीय संस्कृतीमधील हा आगळीवेगळा उत्सव.... हत्ती हे वैभवाचं प्रतिक.. हत्तीच्या सोंडेतून पाणी पडल्यासारखा पाऊस झाल्यावर सगळीकडं धनधान्याची समृद्धी होते यासाठी हस्त नक्षत्राच्या पावसाची हि पूजा.. भोंडल्याचा हा सण साजरा करण्या पाठीमागे पावसाबद्दलची कृतज्ञता ,जुन्या काळातील चालीरीती ,देवदेवतांची स्तुती यांचं दर्शन घडविले जातं.         भोंडल्याचा हा उत्सव 16 दिवस साजरा केला जातो याला हातगाही म्हणतात. हत्तीची प्रतिमा अथवा मुर्ती आणून त्याला रोज 16 दिवस रोज फुलांचा आणि 16 प्रकारच्या धान्याच्या लोम्ब्या , मक्याचे कणीस असा हार करून घातला जातो त्यातून या धान्यांची ओळख आणि त्याच महत्व लक्षात याव यासाठी ....16 वर्षांपर्यंतच्या लहान मुलींसाठीचा खर तर हा खेळ , फेर धरून गाणी म्हणायची आणि रोज एक गाणं वाढवत न्यायचं आणि 16 व्या दिवशी 16 गाणी म्हणायची भोंडल्याद्वारे पर्जन्यराजाला निरोप देताना पुढच्या वर्षी असाच वाजत गाजत ये समृद्धी आणअसं निमंत्रण हि या द्वारे दिले जाते .या गाण्यांमध्ये एक लय आणि ताल आहे त्यामुळं त्यातील गोडी आज अ...

ताण तणाव

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *वि-४* *मुक्त लिखाण* ============= *विषय-"ताण-तणाव"....✍️* 😇😔😟 *नाव- _प्रदीप महाजन_* सहकार अधिकारी श्रेणी-1 नाशिक ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬  ताण तणाव (स्ट्रेस) हा आजकाल अतिशय प्रचलित शब्द झालेला आहे, आपल्या बालपणात वडीलधाऱ्यांकडून हा शब्द फारसा ऐकायला येत नव्हता मात्र आजकाल आपण सर्वच जण असा शब्द नियमित ऐकत असतो किंवा उच्चारत असतो      मग यापूर्वी लोकांना तणाव नसायचा का? किंवा तणाव नावाचा एक प्रकारचा मानसिक आजार असेल तर हा अस्तित्वात नव्हता का? आणि असा आजार अधिक विचार केल्याने किंवा अतिरिक्त दबावामुळे निर्माण होतो तर पूर्वी दबावच नसायचा का? किंवा ती लोकं विचारच करत नव्हती का? तर असे नाही , मनुष्य म्हटला म्हणजे त्याच्या कडे मेंदू आहे, आणि वैचारिक शक्ती आहे तर मेंदू हा अवयव किंवा विचार यापूर्वी चे लोकं सुद्धा करीत असत मग त्यांना तणाव का निर्माण होत नव्हता त्याचं साधं सोपं कारण आहे बदललेली जीवन शैली       पूर्वी लोकं अंग मेहनतीचे खूप जास्त काम करायचे आणि शरीर थकल्यामुळे शांत पूर्ण झोप घेत असत म्हणून तणाव आपोआप निघून जात असे त्यात पूर्वी सकस आहार...

गुंजन काव्य

*अक्षय तृतीयेचे गीत गुंजन..* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 अक्षय गुंजन  अक्षय काव्य  अध्यात्म अक्षय  अक्षय सारं गुंजते...  अक्षय भाव  अक्षय हास्य  अक्षय गीत  अक्षय फुलवते...  अक्षय माणुसकी  अक्षय मिष्टान्न  अक्षय हालहवाल  अक्षय जपते...  अक्षय वनमैत्र  अक्षय आपलंपण  अक्षय माणुसकीने  अक्षय गोंजरते  अक्षय रंजन  अक्षय अध्यात्म  अक्षय शास्त्रीय  अक्षय आलापते...  अक्षय आनंदाचे  अक्षय देणेघेणे  अक्षय चैतन्याचे  अक्षय स्नेहाळते...  अक्षय संस्कृती  अक्षय व्रतसंकल्प  अक्षय उत्सवभाव  अक्षय निभावते...  अक्षय प्रेम  अक्षय आनंदाचे  अक्षय तृतीयेला  अक्षय मंगल दुणावते...  *अक्षय तृतीयेच्या अक्षय मंगल कामना...*  🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹 अशोक अर्धापुरे, औरंगाबाद..