Skip to main content
🥁🇬‌ᴳeeᵗ🇹‌ 🕯गुंजन🥁
🌲🍁🌲🍁🌲🍁🌲🍁
🌄 *एक सांज विचारांची*🌄
          ♾♾♾♾♾
आपण जेंव्हा वर्तमान आयुष्यात जगत असतो नकळत आपल्या भोवती घडणाऱ्या घटना या सुचक संदेश देत असतात फक्त आपल्याला त्यांच्याशी आपलं जीवन जोडता आलं पाहिजे , आज माझ्यासोबत असेच झालं आमच्या BMC ( दुध थंड करण्याचा फ्रिज) मधील सेन्सर काम करत नसल्याने सर्व दुधाचा बर्फ झाला खुप प्रयत्न करून ते दुध काढत होतो जोवर त्या बर्फात पातळ झालेलं दुध होत तो ओलावा ईतर बर्फ़ाला जोडून ठेवत होता जस जसे ते दुध बाहेर येत होतं तो बर्फ वेगळा होऊन वितळू लागला , आपल्या जीवनात सुद्धा जोवर प्रत्येक नात्यात भावनेचा ओलावा असतो तोवर नाती ह्या बर्फ़ासारखी घट्ट धरून असतात जसा का भावनिक ओलावा गैरसमज किंवा अहंकार किंवा ईतर कारणाने सम्पला की मग हळूहळू हे नातं संपायला सुरुवात होते म्हणून नेहमी काळजी घ्या हा ओलावा जपण्याची जोवर तुमच्या संवादाचे सेन्सर चालू असेल तोवर ओलावा टिकून आहे याची खात्री देता येते पण जेंव्हा ते बंद पडते तिथून सुरुवात होते ती नाती विताळायला ,
      बघा जमलं तर हा ओलावा टिकून ठेवता आला तर .....
 *शेवटी जीवन क्षणभंगुर असतं,*
*ते एकदाच मिळतं,*
 आणि
*सोबत काहीही येणार नसतं*
म्हणून.....
 *मनसोक्त जगून घ्यावं, अगदी हसून खेळून.....*

*जिंदगी हसने गाने के लिये है, जिंदगी.....*
⏲३:२९
🌲🍁🌲🍁🌲🍁🌲🍁
*निर्मिती मार्गदर्शन*
*श्री प्रदिप महाजन*
                  🦁
संकल्पना आणि सादरीकरण
        🙏 *अनिरुध्द*🙏

Comments

  1. सौ मीनाक्षी साळुंखे मॅडम यांची प्रतिक्रिया


    अनिरुद्ध......
    *नमस्कार*🙏
    खूप छान आणि विचारा ला प्रवाहित करणारी पोस्ट
    *भूत ,भविष्य, आणि वर्तमान या वर आयुष्य अवलंबून असते*
    *रोजच्या आयुष्यात होणारी उलथापालथ नवीन आयाम देत असते
    सुख दुःख ह्या जीवनाच्या दोन बाजू आल्हाददायक तशीच गहिवरलेली**
    *सहज सोपं जगत असताना खूप काही आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीचा परिणाम आपल्या आयुष्यात होत असतो*
    *समज ,गैरसमज यातूनच नाती दुरावतात तेढ निर्माण करतात ,समजून घेतले की गुंता अलगद सुटत जातो पण त्यासाठी समोरच्याचे आणि स्वतः चे प्रयत्न हवेत तरच शक्य होते*
    *मन दुखावलं की माणूस आपोआप बाजूला जातो नकळतपणे मग सावरायची जबाबदारी दोन्ही बाजूची पण kvchit अस घडत आणि मनभेद झालं की नात पण दुरावत ,माफ करावं असं ही वाटत पण मन खूप दुखावलेल असत मग ते प्रेम ,माया सुद्धा बेगडी होते वरकरणी दाखवण्यासाठी अंतर्मनाचा कोलाहल स्वस्थ बसू देत नाही
    *नात्याची वीण घट्ट करताना फुंकर घालण 😟होत*
    *कमी अपेक्षा ,आणि समाधान या दोन गोष्टीवरच आयुष्याचा सारी पाट चालत रहातो*
    *कभी खुशी ,कमी गम*
    म्हणूनच क्रोधावर नियंत्रण आणि जिभेवर गोडवा सहज सुलभ आयुष्य जगायला मदत करतो*
    संकलन ,संकल्पना दोन्ही गोष्टी supb
    *हटके पोस्ट*👌👌
    धन्यवाद अनिरुद्ध🙏🌹🙏

    ReplyDelete
  2. 🙏🏻धन्यवाद ताईसाहेब
    *खूप छान लिहिले आहे*
    *आशा छान छान प्रतिक्रिया आपण देतात म्हणून काही चांगले सादरीकरण आपल्या कडून व्हावे यासाठी प्रयत्नशील असतो*

    ReplyDelete
  3. विचारांना चालना देणारे काही वाचले की बौध्दिक शांतता मिळत जाते.. मननातून अंतर्मुख जातो वाचक... हे लिखाणाचे यश असते...

    अनिरुद्ध सरजी... छानच...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

*भोंडला* 🐘🐘🐘🐘🐘🐘 पर्जन्यराजाची पूजा करण्याचा भारतीय संस्कृतीमधील हा आगळीवेगळा उत्सव.... हत्ती हे वैभवाचं प्रतिक.. हत्तीच्या सोंडेतून पाणी पडल्यासारखा पाऊस झाल्यावर सगळीकडं धनधान्याची समृद्धी होते यासाठी हस्त नक्षत्राच्या पावसाची हि पूजा.. भोंडल्याचा हा सण साजरा करण्या पाठीमागे पावसाबद्दलची कृतज्ञता ,जुन्या काळातील चालीरीती ,देवदेवतांची स्तुती यांचं दर्शन घडविले जातं.         भोंडल्याचा हा उत्सव 16 दिवस साजरा केला जातो याला हातगाही म्हणतात. हत्तीची प्रतिमा अथवा मुर्ती आणून त्याला रोज 16 दिवस रोज फुलांचा आणि 16 प्रकारच्या धान्याच्या लोम्ब्या , मक्याचे कणीस असा हार करून घातला जातो त्यातून या धान्यांची ओळख आणि त्याच महत्व लक्षात याव यासाठी ....16 वर्षांपर्यंतच्या लहान मुलींसाठीचा खर तर हा खेळ , फेर धरून गाणी म्हणायची आणि रोज एक गाणं वाढवत न्यायचं आणि 16 व्या दिवशी 16 गाणी म्हणायची भोंडल्याद्वारे पर्जन्यराजाला निरोप देताना पुढच्या वर्षी असाच वाजत गाजत ये समृद्धी आणअसं निमंत्रण हि या द्वारे दिले जाते .या गाण्यांमध्ये एक लय आणि ताल आहे त्यामुळं त्यातील गोडी आज अ...

श्रीकृष्ण

* श्रीकृष्ण ...*🌹 छबीतला श्रीकृष्ण खुपच मोहक जाणवला.. चिंतनशिलतेकडे नेणारी ही छबी बरेच संवाद साधून गेली.. आमच्या संस्कारी मनावरचा श्रीकृष्ण मला नवीन काही सांगत होता..  श्रीकृष्ण... मानवी मनाचे स्वप्न.. संपन्नत्व शोधायचे असेल तर श्रीकृष्णाइतके त्रुप्त व्यक्तीमत्व दुसरे नसावे..श्रीकृष्णाला ईश्वरीय अवताराची झुल जरी पांघरली असली तरी त्यातले संपन्न पुरुषत्वच मनाला भावणारे आहे.. जन्माचा उद्येशच मुळात मनाला प्रसन्न ठेवणे असावा.. किंबहुना आम्ही धारण करावा असा धर्म म्हणजे "प्रसन्नत्व राखणे" एवढाच.. आता प्रसन्नत्व राखण्यासाठी काय करावे असा प्रश्न मनात आला तर त्याचे उत्तर एकच आणि ते म्हणजे येथे प्रत्येक आत्म्याने श्रीकृष्ण होऊन जगावे..  जगातली सारी मुळ प्रश्नेच ही स्त्री मनाशी निगडित असावीत हे सत्य कदाचित श्रीकृष्णाला उमजलेले असावे.. पुरुषी अंहकाराच्या गर्तेत स्त्री मनांची होणारी कुचंबणा आणि त्यामुळे निर्माण होणारे नात्यातले तणाव हे प्रेमधर्मच विसरून वा प्रेम संकल्पनेची गल्लत करुन जगली जातात.. आणि यातुनच प्रश्नांचा प्रारंभ होतो.. या दुर्मीळ सत्याचे विस्मरण होण्याचा शाप मानव...

ताण तणाव

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *वि-४* *मुक्त लिखाण* ============= *विषय-"ताण-तणाव"....✍️* 😇😔😟 *नाव- _प्रदीप महाजन_* सहकार अधिकारी श्रेणी-1 नाशिक ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬  ताण तणाव (स्ट्रेस) हा आजकाल अतिशय प्रचलित शब्द झालेला आहे, आपल्या बालपणात वडीलधाऱ्यांकडून हा शब्द फारसा ऐकायला येत नव्हता मात्र आजकाल आपण सर्वच जण असा शब्द नियमित ऐकत असतो किंवा उच्चारत असतो      मग यापूर्वी लोकांना तणाव नसायचा का? किंवा तणाव नावाचा एक प्रकारचा मानसिक आजार असेल तर हा अस्तित्वात नव्हता का? आणि असा आजार अधिक विचार केल्याने किंवा अतिरिक्त दबावामुळे निर्माण होतो तर पूर्वी दबावच नसायचा का? किंवा ती लोकं विचारच करत नव्हती का? तर असे नाही , मनुष्य म्हटला म्हणजे त्याच्या कडे मेंदू आहे, आणि वैचारिक शक्ती आहे तर मेंदू हा अवयव किंवा विचार यापूर्वी चे लोकं सुद्धा करीत असत मग त्यांना तणाव का निर्माण होत नव्हता त्याचं साधं सोपं कारण आहे बदललेली जीवन शैली       पूर्वी लोकं अंग मेहनतीचे खूप जास्त काम करायचे आणि शरीर थकल्यामुळे शांत पूर्ण झोप घेत असत म्हणून तणाव आपोआप निघून जात असे त्यात पूर्वी सकस आहार...