Skip to main content

🥁🇬‌ᴳeeᵗ🇹‌ 🕯गुंजन🥁
🌲🍁🌲🍁🌲🍁🌲🍁
🌄 *एक सांज विचारांची*🌄
          ♾♾♾♾♾
*सागराला येणाऱ्या भरती ओहोटीचं अन मानवी जीवनाचे नातं फार वेगळं आहे , येणाऱ्या प्रत्येक भरतीने जीवनातील आनंद हा ओसंडून वाहू लागतो तर जेंव्हा ओहोटी येते तेंव्हा भावनांचा आवेग हा ओसरतो पण त्याचवेळी काही सुखद आठवणी अन काही बोचणारी दुःख मागे राहातात जर भरतीच्या वेळी तुमचे सत्कर्म हे ओहोटी ओसरताना मोती शंख शिंपल्याच्या सुंदर आठवणी सोडून जातात तर भरतीत तुम्ही केलेल्या चुका तुम्हाला खडतर अन कठीण काटेरी पाऊलखुणा देऊन जातात म्हणून या भरती अन ओहोटीच्या लाटांवर समजुतीने स्वार झालात तर जीवन आनंदी अन सुखमय होईल .....*
*नात्याचं जे जाळे जगण्यासाठी पूरक असते....*
*ते जीवन खुलवते*
*जीवन जगवते*
*जीवन सहज होते*
*मनुष्य प्राणी हा समाजप्रिय प्राणी आहे तो*
*नातेवाईकांशिवाय जगू शकत नाही*
*म्हणून सांभाळा नात्यांचे धाग्याचे गुंफण*
*ऐकूया.....*
*रिश्तो का मांजा*
⏲३:३९
🌲🍁🌲🍁🌲🍁🌲🍁
*निर्मिती मार्गदर्शन* 
   *प्रदीप महाजन*
♾♾♾♾♾♾♾♾
*संकल्पना आणि सादरीकरण*
                 *अनिरुद्ध*
                      🦁

Comments

  1. अनिरुद्ध
    *सदर एवढ छान आहे की प्रतिक्रिया आपसूक येते*
    *भरभरून जगण्याचा एक कालावधी,एक टप्पा प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो.आल्हाददायक, मनस्वी,उत्कट,आणि आश्वासक ही.तोच आपल्या आयुष्यातील सोनेरी क्षण!!!*
    *भरभरून जगत असताना आनंद देत-घेत राहणं,आपल्या जीवनात येणाऱ्या कोणासाठी मनःपूर्वक झटण, प्रत्येक नात्यातला उभारीचा काळ अनुभवणं*
    *असे कितीतरी क्षण आयुष्यात येतात ,या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करायला लावतात हे ऋणानुबंध वर्षोनुवर्षे*
    *रिश्तो को बांध कर उनको सजोना ही हमारी परीक्षा है!!*
    ये जिंदगी हसीन होगी जब हम ये maja हम सुलझा देगे!!
    *कल की फिकर छोड के हसीन पल जी ले !!*
    ये जिंदगी ना मिले दो बारा!!!
    Supb song
    Thanks🙏
    सौ मीनाक्षी साळुंखे यांनी दिलेली प्रतिक्रिया

    ReplyDelete
  2. 🙏अनिरुद्ध जी
    खरे आहे नाते संबंधात बऱ्याचदा सुख दुःखाचे अनुभव येतच असतात भरती - आहोटी सुरूच असते पण माणसाने आहोटीत हताश न होता आणि भरतीमध्ये उतू-मातू नजाता समतोल राखून नाते संबंध जपले तर सुखाचे आनंदाचे मोतीच आपल्याला मिळतील, हे मोती धाग्यात बांधले की मग आपले हे नाते संबंध खूप सुखावह वाटतील कधी न तुटणारे.
    अगदी या रिश्तो का मांजा
    या गाण्याप्रमाणे.....

    एक सांज विचारांची या नात्यांच्या संदेशासह छान सादरीकरण....

    👍👍👌👌🌹🌟

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद तेजश्री जी

      Delete
  3. अनिरुद्ध जी... सागराची भरती आणि ओहोटीची गुंफन आपल्या मानवी जीवनाच्या नात्यांची जपणूक करण्याची नवी ताकद निर्माण करते.खुप अप्रतिम विश्लेषण👌✍️🌹🌿

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अनिता मॅडम

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

*भोंडला* 🐘🐘🐘🐘🐘🐘 पर्जन्यराजाची पूजा करण्याचा भारतीय संस्कृतीमधील हा आगळीवेगळा उत्सव.... हत्ती हे वैभवाचं प्रतिक.. हत्तीच्या सोंडेतून पाणी पडल्यासारखा पाऊस झाल्यावर सगळीकडं धनधान्याची समृद्धी होते यासाठी हस्त नक्षत्राच्या पावसाची हि पूजा.. भोंडल्याचा हा सण साजरा करण्या पाठीमागे पावसाबद्दलची कृतज्ञता ,जुन्या काळातील चालीरीती ,देवदेवतांची स्तुती यांचं दर्शन घडविले जातं.         भोंडल्याचा हा उत्सव 16 दिवस साजरा केला जातो याला हातगाही म्हणतात. हत्तीची प्रतिमा अथवा मुर्ती आणून त्याला रोज 16 दिवस रोज फुलांचा आणि 16 प्रकारच्या धान्याच्या लोम्ब्या , मक्याचे कणीस असा हार करून घातला जातो त्यातून या धान्यांची ओळख आणि त्याच महत्व लक्षात याव यासाठी ....16 वर्षांपर्यंतच्या लहान मुलींसाठीचा खर तर हा खेळ , फेर धरून गाणी म्हणायची आणि रोज एक गाणं वाढवत न्यायचं आणि 16 व्या दिवशी 16 गाणी म्हणायची भोंडल्याद्वारे पर्जन्यराजाला निरोप देताना पुढच्या वर्षी असाच वाजत गाजत ये समृद्धी आणअसं निमंत्रण हि या द्वारे दिले जाते .या गाण्यांमध्ये एक लय आणि ताल आहे त्यामुळं त्यातील गोडी आज अ...

ताण तणाव

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ *वि-४* *मुक्त लिखाण* ============= *विषय-"ताण-तणाव"....✍️* 😇😔😟 *नाव- _प्रदीप महाजन_* सहकार अधिकारी श्रेणी-1 नाशिक ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬  ताण तणाव (स्ट्रेस) हा आजकाल अतिशय प्रचलित शब्द झालेला आहे, आपल्या बालपणात वडीलधाऱ्यांकडून हा शब्द फारसा ऐकायला येत नव्हता मात्र आजकाल आपण सर्वच जण असा शब्द नियमित ऐकत असतो किंवा उच्चारत असतो      मग यापूर्वी लोकांना तणाव नसायचा का? किंवा तणाव नावाचा एक प्रकारचा मानसिक आजार असेल तर हा अस्तित्वात नव्हता का? आणि असा आजार अधिक विचार केल्याने किंवा अतिरिक्त दबावामुळे निर्माण होतो तर पूर्वी दबावच नसायचा का? किंवा ती लोकं विचारच करत नव्हती का? तर असे नाही , मनुष्य म्हटला म्हणजे त्याच्या कडे मेंदू आहे, आणि वैचारिक शक्ती आहे तर मेंदू हा अवयव किंवा विचार यापूर्वी चे लोकं सुद्धा करीत असत मग त्यांना तणाव का निर्माण होत नव्हता त्याचं साधं सोपं कारण आहे बदललेली जीवन शैली       पूर्वी लोकं अंग मेहनतीचे खूप जास्त काम करायचे आणि शरीर थकल्यामुळे शांत पूर्ण झोप घेत असत म्हणून तणाव आपोआप निघून जात असे त्यात पूर्वी सकस आहार...

गुंजन काव्य

*अक्षय तृतीयेचे गीत गुंजन..* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 अक्षय गुंजन  अक्षय काव्य  अध्यात्म अक्षय  अक्षय सारं गुंजते...  अक्षय भाव  अक्षय हास्य  अक्षय गीत  अक्षय फुलवते...  अक्षय माणुसकी  अक्षय मिष्टान्न  अक्षय हालहवाल  अक्षय जपते...  अक्षय वनमैत्र  अक्षय आपलंपण  अक्षय माणुसकीने  अक्षय गोंजरते  अक्षय रंजन  अक्षय अध्यात्म  अक्षय शास्त्रीय  अक्षय आलापते...  अक्षय आनंदाचे  अक्षय देणेघेणे  अक्षय चैतन्याचे  अक्षय स्नेहाळते...  अक्षय संस्कृती  अक्षय व्रतसंकल्प  अक्षय उत्सवभाव  अक्षय निभावते...  अक्षय प्रेम  अक्षय आनंदाचे  अक्षय तृतीयेला  अक्षय मंगल दुणावते...  *अक्षय तृतीयेच्या अक्षय मंगल कामना...*  🌹👏🏻🌹👏🏻🌹👏🏻🌹 अशोक अर्धापुरे, औरंगाबाद..