*अंतर्धान..* ओंजळ सुमनांची अविरत गंधारत, उन्मादून कणकण अज्ञात कोणी अवतरते... किरणांचा सोनप्रवाह पुर्वा प्रसन्न नहाते, क्षणक्षण नवलाईचा उरात कोणी पेरते... फुलांची परडी गच्च दुर परिचित भरते.. विरघळत सुगंधात माळ कोणी माळते.. देह भारुन सुवास चाहूल कोण देते, अंधारातून प्रकाशात अद्रुष्य तरी दिसते.... ध्यास प्रगाढ फुलांचा शांतता काही बोलते, उमलत्या स्वरुपात नकळत अंतर्धान पावते... ........ अशोक अर्धापुरे, औरंगाबाद...